GT VS CSK | गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा संघाचा सामना गुजरात टायटन्सशी शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. सहा वेळा एकमेकांचा सामना केल्यानंतर, दोन्ही संघानी ३-३ सामने जिंकले आहेत, त्यामुळे ही लढत कोण जिंकते हे पाहणे मनोरंजक असेल.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील खेळणारा गुजरात टायटन्स संघ त्यांच्या विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल, कारण सध्या शेवटच्या स्थानावर असलेल्या गुजरात संघासाठी हा सामना करो किंवा मरोचा आहे, कारण ते या सामन्यात विजय मिळवू शकले नाहीत तर मुंबई इंडियन्स नंतर या स्पर्धेतून बाद ठरणारे ते दुसरा संघ ठरतील.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये गुजरात संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे . पहिल्या सामन्यात आरसीबीने अवघ्या १६ षटकांत २०० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता तर पुढच्या सामन्यात, गुजरात संघाची फलंदाजी मध्ये मोठी पडझड झाली आणि १९.३ षटकांतच पूर्ण संघ १४७ गारद झाला. आरसीबीने हे आव्हान फक्त १३.४ षटकात पूर्ण केले होते.
तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जचा संघासाठी हा हंगाम मिक्स राहीला आहे. सध्या चौथ्या स्थानावर असलेला चेन्नई संघ प्लेऑफमधील आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करतील. चेन्नई संघाने धर्मशाला येथे पंजाब किंग्जविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यात पंजाब संघाचा २८ धावांनी पराभव केला होता. परंतु चेन्नई संघाला दुखापतीनी ग्रहण लावले आहे. त्यातच त्यांचा अव्वल वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान देखील राष्ट्रीय कर्तव्यांदरम्यान बांगलादेशला परतला आहे.
दुसरीकडे, फलंदाजीची फळी चांगलीच फॉर्म मध्ये दिसली आहे, ऋतुराज गायकवाड, डॅरिल मिशेल हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तथापि, त्यांच्यासाठी एक मोठी चिंतेची बाब म्हणजे शिवम दुबे हा मागील दोन सामन्यामध्ये शून्यावर बाद झाला आहे, त्याचे पुन्हा एकदा त्याच्या फॉर्ममध्ये परतणे चेन्नई संघासाठी आवश्यक आहे.
GT VS CSK Head-to-Head
चेन्नई सुपर किंग्स व गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले गेले आहेत. या सहा सामन्यापैकी चेन्नई संघ तीन सामन्यात तर गुजरात संघ तीन सामन्यात विजयी ठरला आहे.
चेन्नई व गुजरात या दोन संघांमध्ये २६ मार्च रोजी चेन्नईच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना २०६ ही धावसंख्या उभारली होती. चेन्नई संघाने दिलेल्या २०७ धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातचा संघ निर्धारित २० षटकात केवळ १४३ धावा करू शकला होता. २३ चेंडूत ५१ धावांची खेळी करणारा शिवम दुबेला सामनावीर घोषित करण्यात आले होते.
GT VS CSK Pitch Report
नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादची खेळपट्टी ही फलंदाजी साठी अनुकूल खेळपट्टी मानली जाते, म्हणजे फलंदाज खेळपट्टीवर चांगला वेळ घालवतील. फिरकीपटूंना खेळपट्टी मधून मदत मिळण्याची शक्यता कमी आहे, वेगवान गोलंदाजाना थोड्याफार प्रमाणात येथे मदत मिळू शकते. हे सर्व असले तरी, उत्तरार्धात मैदानात दव पसरल्यानंतर फलंदाजी करणे सोपी होईल, त्यामुळे धावांचा पाठलाग करणे सुद्धा सोपे होईल.नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामना उच्च स्कोअरिंग ठरला होता. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करेल अशी दाट शक्यता आहे.
GT VS CSK सामना कधी होणार
शुक्रवार, १० मे २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता
GT VS CSK सामना कुठे होणार
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
GT VS CSK सामना थेट प्रक्षेपण
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स चॅनल वरती किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.
आणखी वाचा: निवडणूक निकाला आधीच शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी बुडाले.
GT VS CSK संभाव्य संघ
GT: वृद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, मोहित शर्मा, नूर अहमद
Impact Sub: संदीप वारियर, विजय शंकर
CSK: अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, डॅरिल मिचेल, शिवम दुबे, समीर रिझवी, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे.
Impact Sub: महेश थिक्षाना
GT VS CSK Interesting Facts
- गुजरात संघाचा कर्णधार शुभमन गिलने शार्दुल ठाकूरच्या विरोधात ३१ चेंडूत ११६.१२ च्या स्ट्राईक रेटने ३६ धावा केल्या आहेत. तर गिलला शार्दुल ठाकूरने दोनदा बाद केले असून पॉवरप्लेमधील या दोघांमधील लढत खूप महत्त्वाची ठरेल.
- फिरकी गोलंदाजा रशीद खानने शिवम दुबेला आतापर्यंत १८ चेंडू टाकले आहेत आणि एकदा त्याला बाद केले आहे. शिवम दुबेने अफगाणिस्तानच्या या फिरकीपटूविरुद्ध १५५.५५ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
- साई सुदर्शन हा गुजरात टायटन्सच्या काही सातत्यपूर्ण फलंदाजांपैकी एक आहे जो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा आहे. त्याने ११ सामन्यांमध्ये ४२.४० च्या सरासरीने ४२४ धावा केल्या आहेत आणि गुजरात संघाला विजय मिळविण्यासाठी त्याचा फॉर्म असणे अत्यंत महत्वाचे असेल.
GT VS CSK Fantasy Team
शुभमन गिल (c), रुतुराज गायकवाड, एमएस धोनी, रवींद्र जडेजा (vc), डेव्हिड मिलर, मोईन अली, शार्दुल ठाकूर, रशीद खान, दीपक चहर, साई सुदर्शन, मथीशा पाथीराना.