Site icon marathimitranews

kkr vs pbks | दोन वेळचे चॅम्पियन असलेले कोलकत्ता या संघाचा आजचा सामना पंजाब संघाविरुद्ध होणार आहे

kkr vs pbks

kkr vs pbks: कोलकत्ता नाईट रायडर्स हा यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक आहे. दोन वेळचे चॅम्पियन असलेले कोलकत्ता या संघाचा आजचा सामना पंजाब संघाविरुद्ध होणार आहे, या सामन्यात सुद्धा आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा कोलकत्ता संघाचा प्रयत्न असेल.

हा सामना कोलकत्ता संघाचे घरचे मैदान असलेल्या ईडन गार्डन्स येथील मैदानावर होणार असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकत्ता संघ आजच्या सामन्यासाठी फेवरेट मानला जात आहे. मागील बेंगलोर संघाविरुद्धच्या रोमहर्षक लढतीत कोलकत्ता संघाने केवळ एका धावेने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या बाजूला पंजाब संघ सलग चार पराभवानंतर कोलकत्ता संघाचा सामना करण्यासाठी तयार आहे. त्यांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरात संघाविरुद्ध केवळ १४६ धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले होते व हे आव्हान गुजरात संघाने १९ व्या षटकात आरामात पार केले होते.

कोलकत्ता व पंजाब या संघांमध्ये झालेल्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात कोलकत्ता संघाने बाजी मारली असून दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

कोलकत्ता संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असून पाच विजयांसह ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी खेळलेल्या त्याच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

आयपीएल २०२४ च्या हंगामात दोन्ही संघ प्रथमच एकमेकांसमोर येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पंजाब संघाने आठ सामने खेळले असून त्यांना सहा सामन्यात पराभव पत्करावा लागला असून गुणतालिकेत सध्या ते नवव्या क्रमांकावर आहेत. तर गेल्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी केवळ एका सामनात त्यांना विजय मिळवता आला आहे.

अश्याच नवनवीन ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICKकरा.

पंजाब संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज शशांक सिंग व आशुतोष शर्मा यांनी फलंदाजीमध्ये चांगले योगदान दिले असले तरी त्यांना इतर फलंदाजांची पाहिजे तशी साथ मिळालेली नाही त्यामुळे या सामन्यात त्यांना सर्व फलंदाजांकडून चांगल्या फलंदाजीची आशा असेल. पंजाबच्या फलंदाजांपेक्षा त्यांचे गोलंदाज चांगले कामगिरी करताना दिसून येत आहेत.

कोलकत्ता संघाने आतापर्यंत या हंगामात घरच्या मैदानावर चार पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे त्यांचा एकमेव पराभव राजस्थान विरुद्ध च्या सामन्यात आला होता. कोलकत्ता संघाचे सर्व फलंदाज चांगल्या फलंदाजी प्रदर्शन करताना दिसत आहे. परंतु त्यांना त्यांच्या गोलंदाजांनाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

 तुम्हाला माहिती आहे का:

KKR VS PBKS HEAD TO HEAD:

कोलकत्ता व पंजाब संघाने आतापर्यंत एकमेकांविरुद्ध ३२ सामने खेळले असून त्यापैकी २१ सामन्यांमध्ये कोलकत्ता संघाने विजय मिळवला असून ११ सामन्यांमध्ये पंजाब संघाचा विजय झाला आहे.

कोलकत्ता व पंजाब या संघाचे ईडन गार्डन मैदानावरील आकडे

दोन्ही संघांमध्ये या मैदानावर आत्तापर्यंत १२ सामने खेळले असून ९ सामन्यांमध्ये कोलकत्ता संघ विजय झाला असून तीन सामन्यांमध्ये पंजाब संघाचा विजय झाला आहे. ईडन गार्डनच्या मैदानावरील गेल्या दहा सामन्यांचा विचार केला असता प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच सामने तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच सामन्यात विजय मिळवला आहे येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १९४ आहे. येथील सरासरी पावर प्ले स्टोर ५६ पासून ते डेथ ओव्हर मधील सरासरी स्कोर ६१ आहे.

KKR VS PBKS Pitch Report:

आयपीएल २०२४ मध्ये इडन गार्डनची खेळपट्टि ही फलंदाजांसाठी नंदनवन बनली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानी येथे सातत्यपूर्ण आधारावर २०० धावा केल्या आहेत आणि ही एकूण धावसंख्याही पुरेशी नाही कारण अनेक संघांनी २०० हून अधिक धावांचे लक्ष्य सहज पार केले आहे. कोलकात्याची विकेट सामान्यत: त्यांच्या उसळीसाठी ओळखली जाते आणि स्ट्रोक प्लेसाठी अनुकूल असते.

सामन्याच्या सुरुवातीला तापमान ३६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आर्द्रता देखील जवळपास ८० टक्के असण्याची शक्यता आहे, याचा अर्थ सामन्याच्या उत्तरार्धात दव हा एक मोठा घटक बनेल.

KKR VS PBKS सामना कधी होणार:

शुक्रवार, २६ एप्रिल २०२४ संध्याकाळी ७:३० वाजता.

KKR VS PBKS सामना कुठे होणार:

ईडन गार्डन्स, कोलकाता

KKR VS PBKS सामना थेट प्रक्षेपण:

KKR VS PBKS या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

संभाव्य संघ:

KKR: फिल सॉल्ट, सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क/दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, सुयश शर्मा.

PBKS: शिखर धवन, जॉनी बेअरस्टो/रईली रोसो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन, जितेश शर्मा , लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, हर्षल पटेल.

Exit mobile version