SRH vs LSG | आयपीएल २०२४ मध्ये सध्या ही वेळ आहे जेव्हा प्रत्येक सामन्याचा निर्णय हा केवळ खेळणाऱ्या दोन संघाच्या पुढील वाटचालीवर प्रभाव पडत नसून तर इतर आठ संघांवर सुद्धा प्रभाव पाडतात. आपण जसजसे आयपीएलचे शेवटच्या टप्प्यात जात आहोत तर आपण बघू शकतो की राजस्थान रॉयल्स व कोलकत्ता नाईट रायडर्स हे दोनच संघ प्ले ऑफ साठीच्या पात्रतेसाठी भक्कम स्थितीत आहेत. तर उर्वरित दोन जागांसाठी चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद व लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये चुरस आहे.
बुधवारी हैदराबाद मध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात हैदराबाद व लखनऊ या दोन संघांमध्ये जिंकणारा संघ प्ले ऑफ मधील आपले स्थान अजून भक्कम करेल. हैदराबाद व लखनऊ या दोन्ही संघांनी आतापर्यंत अकरा सामने खेळले असून दोन्ही संघांनी सहा सामन्यात विजय तर पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. हैदराबाद संघ निव्वळ रन रेटच्या आधारावर गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत तर लखनऊचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
हैदराबाद संघाने या आयपीएल हंगामात चांगली सुरुवात केली होती त्यांनी सुरुवातीच्या सात सामन्यांपैकी पाच सामन्यात विजय मिळवला होता. परंतु घरच्या मैदानावर खेळलेल्या शेवटच्या चार सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे तो विजय सुद्धा राजस्थान संघाविरुद्ध केवळ एका धावेने मिळवला होता. ट्रॅवीस हेड वगळता इतर फलंदाज धावा करताना चाचपडताना दिसत आहेत.
तर गोलंदाजी मध्ये कर्णधार पॅट कमिन्स याला भुवनेश्वर कुमार व टी नटराजन चांगली साथ देताना दिसून येत आहेत. जर गोलंदाजांना फलंदाजांची साथ मिळाली तर हैदराबाद संघाला हैदराबाद मध्ये रोखणे अवघड आहे.
आणखी वाचा: इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये नवीन फीचर्स सादर केले आहेत, ते कसे वापरायचे जाणून घेऊया या पोस्ट मध्ये
लखनऊ संघाने सुद्धा या हंगामात चांगली सुरुवात केली होती त्यांनी सुरुवातीच्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला होता परंतु त्यानंतर त्यांना अपयश आले आहे. कर्णधार के एल राहुल जरी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असला तरी त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे त्याचबरोबर इतर फलंदाज अपेक्षित प्रभाव पाडू शकले नाहीत. दुखापतीमुळे लखनऊ संघाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. वेगवान गोलंदाज मयांक यादव तर केवळ तीन सामने खेळू शकला. लखनऊ संघाला फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही भागांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव जाणवला आहे. जर ते ही गोष्ट करू शकले तर ते नक्कीच या सामन्यात विजयी ठरतील.
SRH VS LSG Head to Head
सनरायझर्स हैदराबाद व लखनऊ सुपर जॉइंट्स या दोन संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळलेले आहेत. या तीनही सामन्यात लखनऊ सुपर जायंटस या संघाने बाजी मारली आहे. तर सनरायझर्स हैदराबाद हा संघ लखनऊ या संघाविरुद्ध अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत आहे. या दोन संघांमध्ये खेळले गेलेले तीनही सामने तीन वेगवेगळ्या मैदानावर झालेले आहेत.
गेल्या वर्षी राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊ संघाने हैदराबाद संघाने दिलेले १८३ धावांचे आव्हान केवळ तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले होते. लखनऊ संघासाठी ४५ चेंडूत ६४ धावांची खेळी करणारा प्रेरक मंकड याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
SRH VS LSG Pitch Report
हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम मधील खेळपट्टी ही नेहमीच फलंदाजीसाठी अनुकूल ठरली आहे. येथील खेळपट्टीमधून वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे तर फिरकी गोलंदाजांना थोड्याफार प्रमाणात खेळपट्टी मधून मदत मिळू शकते.
आणखी वाचा: Google Pixel 8a ची किंमत आणि फीचर्स बाजारात लीक, या तारखेला होऊ शकतो बाजारात लॉंच
गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या विश्वचषकापासून ते आत्तापर्यंत या मैदानावर नेहमीच मोठ्या धावसंख्येचे सामने झाले आहेत. या आयपीएल हंगामात या मैदानावरील सरासरी धावसंख्या ही २१२ आहे. तर येथे खेळल्या गेलेल्या चार सामन्यापैकी तीन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनशे धावांचा टप्पा पार केला आहे.
SRH VS LSG सामना कधी होणार
बुधवार, ८ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता
SRH VS LSG सामना कुठे होणार
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
SRH VS LSG सामना थेट प्रक्षेपण
सनरायझर्स हैदराबाद व लखनऊ सुपर जायंट्स या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.
SRH VS LSG संभाव्य संघ
SRH: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट.
Impact Sub: उमरान मलिक, टी नटराजन.
LSG: केल राहुल, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, दीपक हुडा, आयुष बदोनी, कुणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर.
Impact Sub: अर्शीन कुलकर्णी
SRH VS LSG Intresting Facts
- नितीश रेड्डी हा सनरायझर्स हैदराबाद संघासाठी मोस्ट underrated खिळाडू ठरला असून, मधल्या षटकांच्या दरम्यान तो सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात यशस्वी ठरला आहे. त्याने या टप्प्यात आठ चौकार आणि अकरा षटकारांसह १६४.४ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
- मार्कस स्टॉइनिसने या मोसमात वेगवान गोलंदाजाविरुद्ध १६१.५४ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने तेवीस चौकार आणि आठ षटकारांसह १०५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
SRH VS LSG Fantasy Team
हेनरिक क्लासेन, निकोलस पूरन, अभिषेक शर्मा, केल राहुल (c), ट्रॅव्हिस हेड, पॅट कमिन्स, नितीश कुमार रेड्डी, मार्कस स्टॉइनिस (vc), भुवनेश्वर कुमार, नवीन-उल-हक, टी नटराजन.