The kapil sharma show | कॉमेडियन कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक दुःखाची बातमी आहे. नवा सेट, कोट्यावधीचा खर्च, मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेला ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा पहिला सीझन केवळ दोन महिन्यातच बंद करण्यात येत आहे. हा कपिल शर्मा साठी मोठा धक्का असल्याचे मानले जाते. कपिल शर्मा गेल्या काही वर्षांपासून विविध वाहिन्यांवरती प्रेक्षकाचे मनोरंजन करत आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ ३० मार्च रोजी Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. आत्तापर्यंत या शोचे केवळ पाच भाग प्रदर्शित झाले असून या शोमध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून या शोच्या शेवटच्या भागाच्या शूटिंग नंतर रॅपअप पार्टीचे नुकतेच काही फोटो समोर आले आहेत.(The kapil sharma show)
The kapil sharma show:
Netflix या ओटीपी प्लॅटफॉर्मवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ ची 30 मार्च रोजी सुरुवात करण्यात आली होती. आत्तापर्यंत या शोचे फक्त पाच भाग प्रदर्शित झाले असून पहिल्या भागामध्ये प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर, ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर व रिद्धिमा कपूर यांनी हजेरी लावली होती.
त्यानंतर प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या भागामध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी हजेरी लावली होती. त्यानंतरच्या भागांमध्ये चमकीला चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेता व गायक दिलजीत दोसांझ, अभिनेत्री परिणीती चोप्रा व दिग्दर्शक इम्तियाज अली हे उपस्थित होते. अभिनेता विकी कौशल व त्याचा भाऊ सनी कौशल यांनी चौथ्या तर पाचव्या भागात आमिर खान यांनी हजेरी लावली आहे. तर येत्या शनिवारी प्रदर्शित होणाऱ्या भागामध्ये प्रसिद्ध अभिनेते सनी देवोल व बॉबी देओल हजेरी लावणार आहेत.(The kapil sharma show)
अन्य बातम्या
- vicky kaushal new movie | विकी कौशल चा आगामी चित्रपट छावा च्या सेट वरील त्याचा लुक सोशल मीडियावर व्हायरल
- Rajnikanth | सुपरस्टार रजनीकांत यांच्या लोकेश कनागराजसोबतच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘कुली’ दिग्दर्शकाने केले जाहीर
या कार्यक्रमांमध्ये काम करणारा अभिनेता किकु शारदाने दिलेल्या माहितीनुसार ‘आम्ही १३ भागांचे शूटिंग पूर्ण केले असून या कार्यक्रमाचा दुसरा सीझन लवकरच प्रदर्शित होईल. या कार्यक्रमाचे आधीपासून असेच नियोजन होते व याचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. यापूर्वी हा कार्यक्रम बऱ्याच काळासाठी टीव्ही वरती येत होता परंतु काही वेगळे करण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाला ओटीटी वरती घेऊन आलो आहे. असे किकू म्हणाला.
द ग्रेट इंडियन कपिल शो कुठे पाहू शकता.
द ग्रेट इंडियन कपिल शो हा कार्यक्रम Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या शोचा नवीन भाग दर शनिवारी रात्री आठ वाजता प्रदर्शित होतो.(The kapil sharma show)
द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये काम करणारे कलाकार व त्यांचे मानधन
सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेता व कॉमेडियन कपिल शर्मा हा त्याचा नवीन शो द ग्रेट इंडियन कपिल शो यासाठी मोठी फी घेताना दिसून येत आहे. कपिल शर्मा हा एका भागासाठी पाच करोड पेक्षा जास्त फी घेत आहे. तर दुसरीकडे सहा वर्षानंतर कपिल शर्मा सोबत काम करणारा सुनील ग्रोवर एका भागासाठी २५ लाख रुपयांची फी आकारात आहे. या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत असलेली अर्चना पुरन सिंह प्रत्येक भागासाठी १० लाख रुपये मानधन घेत आहे. तर कृष्णा अभिषेक हा सुद्धा तेवढेच मानधन घेत आहे.(The kapil sharma show)
अभिनेता किकु शारदा व राजीव ठाकूर हे प्रत्येकी सात लाख रुपये इतके मानधन घेत आहेत. परंतु या सर्वांची पुष्टी Netflix कडून करण्यात आली नाही.
द ग्रेट इंडियन कपिल शो चा दुसरा सिझन कधी येणार
अभिनेता किकू शारदा याने दिलेल्या माहितीनुसार उर्वरित भाग लवकरच प्रदर्शित होतील. व त्यानंतर एका छोट्याशा ब्रेकनंतर दुसरा सिझन सुद्धा लवकरच प्रदर्शित होईल.