आयपीएल मध्ये एका मॅच मध्ये सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांमध्ये दहाव्या क्रमांकावर संदीप शर्मा आहे त्याने २०१४ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळताना चार षटकांमध्ये ६५ धावा दिल्या होत्या.
या लिस्टमध्ये नवव्या क्रमांकावर उमेश यादव असून त्यांनी २०१३ साली बेंगलोर संघाविरुद्ध ६५ धावा दिल्या होत्या.
आठव्या क्रमांकावर अर्शदीप सिंग असून त्याने २०२३ साली मुंबई संघाविरुद्ध खेळताना ६६ धावा दिल्या होत्या.
मुजीब उर रेहमान याने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळताना २०१९ साली ४ शतकात ६६ धावा दिल्या होत्या.
ईशांत शर्मा याने चेन्नई संघाविरुद्ध खेळताना चार षटकांमध्ये ६६ धावा दिल्या होत्या.
कवेना माफका याने याच वर्षी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळताना ४ षटकांमध्ये ६६ धावा दिल्या होत्या.
रिस टोपले या बेंगलोरच्या गोलंदाजाने याच वर्षी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध चार षटकांमध्ये ६८ धावा दिल्या आहेत.
यश दयाल याने गेल्या वर्षीच्या हंगामात कोलकत्ता संघाविरुद्ध ४ षटकांमध्ये ६९ धावा दिल्या होत्या.
बसिल थंपी याने २०१८ साली बेंगलोर संघाविरुद्ध ४ षटकांमध्ये ७० धावा दिल्या होत्या.
आता या यादीत मोहित शर्माचे नाव अग्रस्थानी जोडले गेले आहे, ज्याने काल दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ४ षटकात ७३ धावा दिल्या.