srh vs rcb | आयपीएल २०२४ या हंगामातील ४१ व्या सामन्यात हैदराबाद व बेंगलोर संघ भिडणार

srh vs rcb: आयपीएल २०२४ या हंगामातील ४१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये खेळवला जाणार आहे.

सध्या सनरायझर्स हैदराबाद हे गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाने या हंगामात एकूण सात सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. हैदराबाद संघाने खेळलेल्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे तर एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्याचविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने एकूण आठ सामने खेळले असून त्यांना केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यांनी खेळलेल्या शेवटच्या पाचही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. शेवटच्या सामन्यात त्यांना कोलकत्ता संघाविरुद्ध केवळ एका धावेने पराभव पत्करावा लागला आहे.(srh vs rcb)

या दोन संघांमध्ये बेंगलोर येथील एम चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने २८७ धावांची टीट्वेंटी प्रकारातील सर्वोच्च धावसंख्या उभारली होती तर या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबी संघाने सुद्धा २६२ धावा केल्या होत्या. परंतु त्यांना २५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

अश्याच नवनवीन ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा.

या सामन्यामध्ये एकूण ५४९ धावा करण्यात आल्या होत्या जी आतापर्यंत एका टी-ट्वेंटी सामन्यातील सर्वाधिक धावसंख्या आहे. हैदराबाद संघाचा सलामीवीर ट्रविस हेड त्याने या सामन्यात अवघ्या ३९ चेंडू मध्ये आपले शतक पूर्ण केले होते. आयपीएलच्या इतिहासातील हे चौथे वेगवान शतक ठरले होते. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या हेनरी क्लासेनने सुद्धा २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना बेंगलोर संघाचे सलामीवीर फाफ डुप्लेसिस व विराट कोहली यांनी आक्रमक सुरुवात केली होती, मात्र विराट कोहली बाद झाल्यानंतर बेंगलोर संघाच्या झटपट विकेट गेल्या. दिनेश कार्तिकने केवळ ३५ चेंडू ८३ धावा करत एकांकी झुंज दिली परंतु त्याला संघाला विजय करण्यात यश आले नाही.(srh vs rcb)

सनरायझर्स हैदराबाद संघाने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात दिल्ली संघाचा ६७ धावांनी पराभव केला आहे त्याच विरुद्ध दुसऱ्या बाजूला कोलकत्ता संघाविरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात बेंगलोर संघाला केवळ एका धावेने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

तुम्हाला माहिती आहे का:

  • विराट कोहलीने गेल्या मोसमात या ठिकाणी ६३ चेंडूत १०० धावा केल्या होत्या आणि त्याच्या येथे खेळलेल्या शेवटच्या तीन T२० सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. एकूणच T२० प्रकारामध्ये मध्ये त्याची या ठिकाणी सरासरी ५९.२० आहे.
  • सनरायझर्स संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने कोहलीला T२० मध्ये १५ सामन्यामध्ये चार वेळा बाद केले आहे.(srh vs rcb)
  • या मोसमात सनरायझर्स च्या फलंदाजांनी १७७.७९ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये एकाच संघातील फलंदाजांच्या एकत्रित स्ट्राइक रेटने १७० चा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

SRH VS RCB HEAD TO HEAD:

आयपीएल मध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये एकूण २४ सामने खेळले गेले असून त्यापैकी १३ सामन्यांमध्ये हैदराबाद संघाने विजय मिळवला आहे तर १० सामन्यांमध्ये बेंगलोरच्या संघाने बाजी मारली आहे व १ सामना अनिर्णीत राहिला आहे.(srh vs rcb)

SRH VS RCB Pitch Report:

हा सामना याच मैदानावर या मोसमाच्या पहिल्या सामना ज्या खेळपट्टीवर खेळला गेला त्याच खेळपट्टीवर खेळला जाईल, जिथे सनरायझर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्स विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २७७ धावांची विक्रमी खेळी केली होती, व या धावाचा पाठलाग करताना मुंबई संघाने सुद्धा ५ बाद २४६ धावा केल्या होत्या. त्यामुळे मोठ्या धावाच्या सामन्याची अपेक्षा आहे.(srh vs rcb)

SRH VS RCB सामना कधी होणार:

गुरुवार, २५ एप्रिल २०२४ संध्याकाळी ७:३० वाजता.

SRH VS RCB सामना कुठे होणार:

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद.

SRH VS RCB सामना थेट प्रक्षेपण:

SRH VS RCB या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

संभाव्य संघ:

SRH: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर

RCB: फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज, सुयश प्रभुदेसाई

Leave a Comment