CSK VS PBKS | चेन्नई की पंजाब कोणता संघ ठरणार वरचढ??

CSK VS PBKS | चेन्नई सुपर किंग्स संघ पंजाब किंग्स सोबत १ मे रोजी चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर एकमेकांचा सामना करतील.

चेन्नईच्या संघाने आतापर्यंत नऊ सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे व दहा गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर दुसरीकडे पंजाब संघाने त्यांच्या नऊ सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. व ते गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहेत.

चेन्नई संघाने त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे तर पंजाब संघाला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.

गेल्या हंगामात हे दोन संघ एकमेकांना शेवटचे भेटले होते तेव्हा त्या सामन्यात चेन्नई संघाने २० षटकात ४ बाद २०० धावा केल्या होत्या, त्याच्या प्रत्युत्तरात पंजाब संघाने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पार केले होते व चार गडी राखून विजय मिळवला. चेन्नई संघाचे सलामीवीर डेवोन कॉनवे याने केलेल्या ५२ चेंडूतील नाबाद ९२ धावासाठी त्याला सामनावीर घोषित करण्यात आले होते.

महत्वाची बातमी 

चेन्नई सुपर किंग्स व पंजाब किंग्स या दोन्ही संघांनी त्यांच्या शेवटच्या सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. पंजाब किंग्स संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकत्ता संघाविरुद्ध विक्रमी धावांचे आव्हान पार केले होते. कोलकत्ता संघाने २६१ ही जबरदस्त धावसंख्या उभारूनही पंजाब संघाने हे आव्हान केवळ १८.४ षटकात यशस्वीपणे पार केले होते. जॉनी बैरस्टोचे नाबाद शतक व प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंग यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर पंजाब संघाने हे आव्हान पार केले होते. तर दुसरीकडे चेन्नई संघाने जबरदस्त कामगिरी करणाऱ्या हैदराबाद संघाचा ७८ धावांनी पराभव केला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या ९८ धावांच्या प्रभावी खेळीने चेन्नई संघाने २१२ ही धावसंख्या उभारली होती याच्या प्रत्युत्तरात हैदराबाद संघ केवळ १३४ धावा करू शकला.

तुम्हाला माहिती आहे का:

  • महेंद्रसिंग धोनीला आयपीएल मध्ये २५० षटकार पूर्ण करण्यासाठी केवळ तीन षटकारांची आवश्यकता आहे तर शिवम दुबे ला १०० षटकार पूर्ण करण्यासाठी केवळ एका शेतकऱ्याची आवश्यकता आहे.
  • महेंद्रसिंग धोनीने एक खेळाडू म्हणून आत्तापर्यंत आयपीएल मध्ये १५० सामने जिंकले आहेत जे एका खेळाडूसाठी सर्वाधिक आहेत.
  • २०२१ पासून पंजाब किंग संघाने चेन्नई विरुद्ध खेळलेला पाच सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे तर शेवटच्या चारही सामन्यात ते विजयी ठरले आहेत.
  • ऋतुराज गायकवाड विरुद्ध कगिसो रबाडा याने आत्तापर्यंत ४८ चेंडू टाकले असेल त्यात त्यांनी ५६ धावा देऊन त्याला तीन वेळा बाद केले आहे.
  • महेंद्रसिंग धोनी विरुद्ध कगिसो रबाडा हा आतापर्यंत सर्वात यशस्वी ठरला आहे. त्याने महेंद्रसिंग धोनीला आतापर्यंत 22 चेंडू टाकले असून यामध्ये फक्त दहा धावा दिल्या आहेत व एक वेळा बात करण्यात यशस्वी झाला आहे.

CSK VS PBKS HEAD TO HEAD:

आत्तापर्यंत चेन्नई व पंजाब या संघांमध्ये एकूण २८ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये चेन्नईचा संघ पंजाब संघ वरती थोडा वरचढ ठरला आहे. २८ सामन्यांपैकी पंधरा सामन्यात चेन्नई संघ विजय ठरला आहे तर १३ सामन्यांमध्ये पंजाब संघाने विजय मिळवला आहे.

या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या पाच सामन्यापैकी चार सामन्यात पंजाब संघाने विजय मिळवला आहे. या दोन संघांमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यांमध्ये चेन्नई संघाचे २०० धावांचे आव्हान जोरदार फलंदाजीच्या जोरावर पार केले होते.

चेन्नई मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सात सामन्यांमध्ये चार सामन्यात चेन्नई संघ तर तीन सामन्यात पंजाब संघ विजयी ठरला आहे.

CSK VS PBKS Pitch Report:

चेपौक वर खेळला गेलेल्या शेवटच्या चार सामन्यात येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरली आहे. प्रत्येक सामन्यात संघ २०० धावा पार करत आहेत. चार सामन्यांपैकी दोन सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ तर दोन सामन्यात धावांचा पाठलाग करणार संघ विजय ठरला आहे. दव हा एक विचारात घेणारा घटक असून नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देतो. सामन्याच्या वेळी तापमान ३७°c पर्यंत जाऊ शकते.

CSK VS PBKS सामना कधी होणार:

बुधवार, १ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता 

CSK VS PBKS  सामना कुठे होणार:

एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

CSK VS PBKS सामना थेट प्रक्षेपण:

CSK VS PBKS या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

संभाव्य संघ:

CSK: ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथीराना, मुस्तफिजुर रहमान

IMPACT SUB: शार्दुल ठाकूर/समीर रिझवी.

PBKS: प्रभसिमरन सिंग/शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम करन, जितेश शर्मा, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग

IMPACT SUB: राहुल चहर.

Leave a Comment