SRH vs RR | आजच्या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफ मधील आपले स्थान पक्के करण्यासाठी राजस्थान संघाचा आजचा सामना हैदराबाद संघाविरुद्ध.
काही दिवसापूर्वीपर्यंत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला शेवटच्या काही सामन्यात धावांचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ते टॉप ४ मधून बाहेर गेले आहेत.
आज आयपीएल २०२४ मधील ५० वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये खेळवला जाईल. गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान संघ त्यांच्या सलग पाचव्या विजयासाठी आतुर असेल, जर आजचा सामन्यात राजस्थान संघाने विजय मिळवला तर ते प्ले ऑफ साठी पात्र ठरतील तर दुसरीकडे सलग दोन सामन्यातील पराभवानंतर विजय मिळवण्यासाठी हैदराबाद संघ आतुर असेल. हैदराबाद संघाला त्यांच्या शेवटचा दोन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व चेन्नई सुपर किंग्स या संघांविरुद्ध धावांचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबाद संघाने आतापर्यंत नऊ सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे व दहा गुणांसह ते गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी मिळवलेल्या पाच विजयांपैकी चार विजय हे प्रथम फलंदाजी करताना मिळवले आहेत.
redmi note 13pro+ 5g स्पेशल वर्ल्ड चॅम्पियन एडिशन या तारखेला होणार लॉंच
तर दुसरीकडे राजस्थान संघ या हंगामात चांगले प्रदर्शन करताना दिसून आला आहे. राजस्थान संघाला या हंगामात केवळ एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान संघाने आतापर्यंत नऊ सामने खेळले असून आठ विजय व एक पराभव यासह ते गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहेत. राजस्थान संघाचे सर्वच फलंदाज चांगले प्रदर्शन करत आहेत. तर गोलंदाजी मध्ये चहल, अश्विन व ट्रेंट बोल्ट यासारखे अनुभवी गोलंदाज आहेत तर संदीप शर्मा व आवेश खान यासारखे नवीन युवा वेगवान गोलंदाज आहेत.
तुम्हाला माहिती आहे का:
- राजस्थान रॉयल्सने या आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सहा पैकी सहा जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांचा एकमेव पराभव झाला आहे. तर, सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना पाचपैकी केवळ एकच सामना गमावला आहे. त्यांचा पराभव गुजरात टायटन्सविरुद्धच झाला आहे.
- दोन्ही संघातील फलंदाजांमध्ये संजू सॅमसनची आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक सरासरी ७१.७५ आहे. त्याने १४७.१७ च्या स्ट्राइक रेटने २८७ धावा केल्या आहेत.त्यांच्या मागे फक्त क्लासेन असून त्याच्या ३५१ धावा आहेत, ज्यामध्ये त्याने ५८.५ च्या सरासरीने आणि १९१.८ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
- संजू सॅमसनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २१ डावांमध्ये ४९.४३ च्या सरासरीने ७९१ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २३ डावात ७६२ धावा केल्या असून तो दुसऱ्या स्थानावर आहे.
SRH VS RR Head to Head:
सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल दोन संघांमध्ये आतापर्यंत १८ सामने खेळले गेले आहेत. या १८ सामन्यांपैकी नऊ सामन्यात सनरायझर्स हैदराबाद तर नऊ सामन्यात राजस्थान रॉयल संघ विजय ठरला आहे. हा सामना या दोन संघांमध्ये या हंगामातील पहिला सामना आहे. या दोन संघांमध्ये खेळला गेलेल्या मागच्या हंगामातील शेवटच्या सामन्यात राजस्थान संघाचा धावांनी पराभव केला होता. राजस्थान गाणे दिलेल्या २०४ धावांच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघ २० षटकात केवळ १३१ धावा करू शकला होता.२२ चेंडुमधील ५४ धावांच्या तुफान खेळीसाठी जोस बटलरला सामनावीर घोषित करण्यात आले होते.
SRH VS RR Pitch Report:
हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी ही नेहमीच फलंदाजांसाठी मदतगार ठरली आहे. या खेळपट्टीवर धावा सहज येतात, त्यामुळे उच्च धावसंख्येचा सामना होण्याची शक्यता असते. त्यामुळे येथे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात.
हैदराबाद संघाने मार्च महिन्याच्या शेवटी या हंगामातील पहिला सामना खेळला होता तेव्हा हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २७७ धावांचा डोंगर उभा केला होता तर मुंबई संघाने प्रत्युत्तरात २४६ धावा केल्या होत्या. तर चेन्नई विरुद्ध च्या सामन्यात चेन्नई संघाने दिलेले १६५ धावांचे आव्हान हैदराबाद संघाने केवळ १८.१ षटकात पूर्ण केले होते. तर येथे खेळणे केलेल्या शेवटच्या सामन्यात बंगलोर संघाने दिलेले २०६ धावांचे आव्हान करताना हैदराबाद संघ केवळ १७१ धावा करू शकला होता. परंतु येथे खेळला गेलेल्या शेवटच्या काही सामन्यात फिरकीपटूंना खेळपट्टी मधून मदत मिळाले आहे त्यामुळे हैदराबाद संघापुढे युझवेंद्र चहल व रवी अश्विन यांच्यापुढे खेळण्याचे आव्हान असेल.
SRH VS RR सामना कधी होणार:
गुरुवार, २ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता
SRH VS RR सामना कुठे होणार:
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
SRH VS RR सामना थेट प्रक्षेपण:
SRH VS RR या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.
संभाव्य संघ:
SRH: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
IMPACT SUB: अनमोलप्रीत सिंग/मयांक मार्कंडे
RR: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
IMPACT SUB: रोव्हमन पॉवेल