MI VS KKR | आयपीएल २०२४ च्या हंगामातील ५१ वा सामना पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध दोन वेळचे विजेते कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात होणार

MI VS KKR | आयपीएल २०२४ च्या हंगामातील ५१ वा सामना पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध दोन वेळचे विजेते कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.

हार्दिक पांड्या च्या नेतृत्वात खेळणारा मुंबईचा संघ जवळपास प्ले ऑफच्या शर्यती मधून बाहेर झाला आहे तर दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा कोलकत्ता संघ चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे.

कोलकत्ता संघाने आतापर्यंत नऊ सामने खेळून यात सहा विजय व तीन पराभव यासह ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कोलकत्ता संघाने खेळलेल्या शेवटच्या पाच सामन पैकी तीन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे मुंबई संघ दहा सामने खेळला असून तीन सामन्यात विजय मिळवून सहा गुणांसह ते नवव्या क्रमांकावर आहेत. मुंबई संघाला त्यांच्या शेवटच्या पाच पैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

कोलकत्ता संघाने आतापर्यंत मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर दहा सामने खेळले असून या दहा सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. त्यांनी मिळवलेला हा विजय सुद्धा २०१२ रोजी गौतम गंभीरच्या नेतृत्वात खेळताना मिळवला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत या दोन संघांमध्ये सात सामने झाले असून या सातही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Whatsapp | काय बोलता.. भारतात Whatsapp बंद होणार !!

तुम्हाला माहिती आहे का:

  • सुनील नरीन याने सर्व T20 मध्ये मिळून रोहित शर्माला एकूण नऊ वेळा पार केले आहे यामध्ये रोहित ची सरासरी केवळ २०.७ तर स्ट्राईक रेट १०९ चा आहे.
  • या आयपीएलच्या हंगामामध्ये मुंबईच्या गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह याने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. त्याने केवळ ६.४० च्या सरासरीने धावा दिल्या आहेत तर दुसरीकडे इतर वेगवान गोलंदाजांनी ११.३५ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.जसप्रीत बुमराह चा करियर व आयपीएल बेस्ट हा कोलकत्ता संघाविरुद्धच २०२२ मध्ये आला होता. त्या सामन्यात बुमराहने केवळ दहा धावा देऊन पाच विकेट घेतल्या होत्या.

MI VS KKR Head to Head:

मुंबई इंडियन्स व कोलकत्ता नाईट रायडर्स या संघांमध्ये आत्तापर्यंत आयपीएलचे ३२ सामने खेळले आहेत. या ३२ सामन्यांपैकी केवळ ९ सामन्यांमध्ये कोलकत्ता संघ विजय ठरला आहे तर उर्वरित २३ सामन्यांमध्ये मुंबई संघाने बाजी मारली आहे.

कोलकत्ता संघाची मुंबई विरुद्ध २३२ ही सर्वोच्च धावसंख्या आहे तर मुंबईची कोलकत्ता विरुद्ध २१० ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तर ६७ व १०८ या अनुक्रमे कोलकत्ता व मुंबई संघांच्या एकमेकांविरुद्ध निचांकी धावसंख्या आहेत. या हंगामातील दोन संघांमधील हा पहिलाच सामना आहे.

मागील वर्षाच्या हंगामात या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात कोलकत्ता संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ६ गडी गमावून १८५ धावा केल्या होत्या, यामध्ये व्यंकटेश अय्यर याने केवळ ५१ चेंडूंमध्ये १०४ धावांचे योगदान दिले होते.१८६ धावांचा पाठलाग करताना मुंबई संघाने हे आव्हान केवळ १७.४ षटकांमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले होते. यामध्ये ईशान किशन याने २५ चेंडूंमध्ये तुफान फटकेबाजी करत ५८ धावा केल्या होत्या. या सामन्याचा सामनावीर म्हणून व्यंकटेश अय्यर याला सन्मानित करण्यात आले होते.

MI VS KKR Pitch Report:

मुंबईतील वानखेडे स्टेडियम हे नेहमीच फलंदाजी साठी अनुकूल राहिले आहे. छोटे मैदान, रात्रीच्या वेळी पडणारे दव व पाटा खेळपट्टी यामुळे हे मैदान गोलंदाजीसाठी आव्हान राहिले आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये अति उष्णतेमुळे खेळपट्टी संथ होताना दिसले आहे परंतु वानखेडे स्टेडियमवर याचा फार काही परिणाम होईल असे वाटत नाही कारण येथे क्वचितच फिरकी गोलंदाजांना मदत मिळते.

चेन्नई संघाने शेवटचा सामन्यात येथे दिलेल्या आव्हानाच यशस्वी बचाव केला होता परंतु याचे थोडे श्रेय आत्मविश्वास ढासळलेल्या मुंबईच्या फलंदाजांना सुद्धा जाते. या मैदानावर २००-२२० धावासुद्धा कमी ठरतात त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेतात.

MI VS KKR सामना कधी होणार:

शुक्रवार, ३ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता 

MI VS KKR सामना कुठे होणार:

वानखेडे स्टेडियम, मुंबई

MI VS KKR सामना थेट प्रक्षेपण:

MI VS KKR या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

संभाव्य संघ:

MI: इशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

IMPACT SUB: नुवान तुषारा

KKR: फिल सॉल्ट, सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

IMPACT SUB: अनुकुल रॉय

Leave a Comment