New delhi | दिल्ली शहर हे केवळ बोलण्यासाठी हिरवे व स्वच्छ व सुंदर शहर परंतु याची हकीकत वेगळीच आहे हे आम्ही नाही तर डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे.
डेन्मार्क व ग्रीस या दोन अम्बेसी मध्ये असलेल्या सर्विस रोड वरील साचलेल्या कचऱ्याच्या ढिगार्यांबद्दल हा व्हिडिओ आहे. त्यांनी या व्हिडिओमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री कार्यालय, डेन्मार्क ॲम्बेसी व नायब राज्यपाल दिल्ली यांना टॅग केले आहे. तसेच हा परिसर स्वच्छ करण्याची या व्हिडिओमध्ये त्यांनी मागणी केली आहे.
New delhi स्वच्छ व सुंदर शहर
खूप छान हिरवेगार आणि कचऱ्याने भरलेल्या New delhi मध्ये आपले स्वागत आहे, डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर ८ मे रोजी एक व्हिडिओ शेअर केला आहे,या विडियो मध्ये ते असे म्हणाले कि, आम्ही new delhi त आहोत आणि हा रस्ता कचऱ्याने भरलेला आहे. हा रोड दिल्लीतील डेन्मार्क आणि ग्रीसच्या दूतावासांच्या मध्ये आहे.
या व्हिडीओमध्ये त्यानी डेन्मार्कच्या भारतातील दूतावासाच्या X अकाउंटला, दिल्लीचे सीएम ऑफिस आणि लेफ्टनंट गव्हर्नर ऑफिस यांना या विडियो मध्ये टॅग केले आहे. या व्हिडीओमध्ये फ्रेडी खूप काही बोलताना ऐकू येत आहे, त्याशिवाय त्यांनी new delhi ला हिरवेगार शहर व त्याचबरोबर कचऱ्याने भरलेले शहरही म्हटले आहे. हा एक सर्विस रोड होता, पण तो आता कचऱ्याने भरून गेला आहे. ते पुढे असेही म्हणाले कि लोक इथे येतात आणि त्यांच्या मनात येईल ते करतात. फ्रेडीने आशा व्यक्त केली आहे कि लोक त्यांचा हा विडियो बघतील आणि जबाबदार लोक योग्य ती कारवाई करतील. व्हिडिओच्या शेवटी, स्वाने म्हणतात, “मला आशा आहे की कोणीतरी हे ऐकेल आणि कृती करेल. आणखी छान शब्द नाहीत! फक्त कृती, माझ्या मित्रांनो. धन्यवाद!”.
आणखी वाचा : बेंगळुरू कि पंजाब कोण मारणार बाजी ?? कोणता संघ या स्पर्धेतील आपले आव्हान जीवंत ठेवणार.
फ्रेडी स्वेन यांच्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या की, केवळ राजनैतिक क्षेत्रातच नाही तर सामान्य लोकानी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर संपूर्ण new delhi च्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे अनेक युजर्सनी हा व्हिडिओ देशासाठी लज्जास्पद असल्याचेही लिहिले आहे, तर अनेकांनी या व्हिडिओवर केंद्रापासून दिल्ली सरकारला मनापासून दाद मागितली आहे.
ANI च्या अहवालानुसार, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, NDMC कडून तत्काळ या भागात साफसफाईचे काम करण्यात आले व हा परिसर स्वच्छ करण्यात आला. या तात्काळ कारवाईबाबत, भारतातील डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन यांनी AI शी बोलताना सांगितले की, येथे हा सर्विस रोड आहे आणि काही तासांपूर्वी मी इथली अस्वच्छता दाखवण्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि एनडीएमसीने आमचे म्हणणे ऐकून घेतले व येथे त्वरित कारवाई केली आपण एवढ्या सुंदर रस्त्यावर कचरा कसा टाकू शकतो?. ते पुढे म्हणतात, “मला खूप अभिमान आहे की एनडीएमसीने काही मिनिटांत कारवाई केली. मी येथे ११ वर्षे राहिलो आहे. आम्हाला भारतावर प्रेम आहे.
यापूर्वी ६ मार्च रोजी new delhi चे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनीही त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर काही छायाचित्रे शेअर करत राष्ट्रीय राजधानीतील नागरी समस्यांवर वर प्रकाश टाकला होता.
नायब राज्यपाल सक्सेना यांनी केवळ शहरातील नागरी समस्यांवर प्रकाश टाकला नाही तर लोकांच्या समस्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.
“दिल्लीचा उपराज्यपाल या नात्याने, माझ्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांसमोर लोकांच्या समस्या मांडणे आणि दिल्लीतील लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे तुमचे लक्ष वेधणे ही माझी घटनात्मक जबाबदारी आणि कर्तव्य आहे,” असे दिल्लीचे नायब राज्यपाल एक्सवर पोस्ट केले आहे.
त्याच पोस्टमध्ये, दिल्लीच्या नायब राज्यपालांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी त्यांना सांगितले की येथे ४ हजार घरांमध्ये सुमारे ३५ ते ४० हजार लोक अत्यंत हलाखीचे व दयनीय जीवन जगत आहेत.
आणखी वाचा : निवडणूक निकाला आधीच शेअर बाजारात मोठी पडझड
प्रत्युत्तरादाखल,new delhi चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दक्षिण दिल्लीतील संगम विहारमधील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधल्याबद्दल लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) व्हीके सक्सेना यांचे आभार मानले आणि राज्यपाल जे काम करत होते ते विरोधकांनी करायला हवे होते असेही सांगितले.
“एलजी साहेब, तुम्ही आमच्या उणिवा निदर्शनास आणून दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. यापूर्वी सुद्धा तुम्ही किरारी आणि बुराडी भागातील लोकांच्या समस्या अधोरेखित केल्या होत्या. आता मी मुख्य सचिवांना या सर्व समस्या सात दिवसांत दूर करण्याचे आदेश देत आहे.” सीएम केजरीवाल यांनी तेव्हा ‘X’वरील पोस्टमध्ये म्हटले होते.
1 thought on “New delhi | स्वच्छ व सुंदर नाही तर कचऱ्याच्या शहरात तुमचे स्वागत आहे, असे का म्हणाले डेन्मार्कचे भारतातील राजदूत ??”