chinmay mandlekar | छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी आज एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.

chinmay mandlekar: छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी आज त्यांच्या मुलांच्या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगमुळे आज एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया वरती एक विडियो टाकून यापुढे मी छत्रपती शिवाजी महाराजाची भूमिका करणार नाही अशी घोषणा केली आहे. 

चिन्मय मांडलेकर यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतात ते प्रसिद्ध झाले आहेत. 

chinmay mandlekar यांनी विडियो पोस्ट करत दिली माहिती:

चिन्मय मांडलेकर हे मराठी सिनेसृष्टीतील एक उत्तम लेखक दिग्दर्शक तसेच अभिनेता आहेत परंतु ते ओळखले जातात त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी. आत्तापर्यंत त्यांनी सहा सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराय अष्टक मधील आत्तापर्यंत आलेल्या सर्व सिनेमांमध्ये त्यांनी शिवरायांची भूमिका साकारली आहे मात्र यापुढे आपण छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही अशी त्यांनी घोषणा केली आहे.

काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्ट मध्ये त्यांनी आपल्या मुलाचे नाव जहांगीर असल्याचे सांगितले होते तेव्हापासून त्यांच्यावर चाहते टीका करू लागले ही टीका फक्त त्यांच्यापूर्वी मर्यादित न राहता त्यांची पत्नी व मुलावरही टीका होऊ लागली, ही टीका सहन न झाल्यामुळे काल चिन्मय ची पत्नी नेहा यांनी सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ शेअर करून आपला संताप व्यक्त केला होता परंतु त्यांच्यावर टीका होतच होत होती, त्यामुळे आज चिन्मय मांडलेकर यांनी सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ पोस्ट करत यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार नाही अशी घोषणा केली आहे.(chinmay mandlekar)

विडियो मध्ये काय म्हणाला चिन्मय मांडलेकर??:

नमस्कार माझे नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायाने मी एक अभिनेता आहे,लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. काल माझ्या पत्नीने नेहाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला होता. 

तो व्हिडिओ होता माझ्या मुलाला जहांगीर त्याच नाव आहे त्याच्या नावावरून आम्हाला होणार ट्रोलींग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल केल्या जाणाऱ्या अत्यंत घाणेरड्या कमेंट्स याबद्दल आणि हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सुद्धा या कमेंट मध्ये काही कमी झाले का तर अजिबात नाही इन्फॅक्ट त्या वाढल्यात.(chinmay mandlekar) 

आणि आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चरित्र पासून सगळ्यावर शंका घेऊ लागले आहेत.

एक व्यक्ती म्हणून मला त्याचा खूप त्रास होतो. मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला सोशल मीडियावरून कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर होत असेल त्याच्यासाठी मी बांधल नाही.

माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता तुम्हाला ते आवडलं, नाही आवडलं पर्सनली भेटून किंवा सोशल मीडियावर, पण माझे वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही.(chinmay mandlekar)

मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक प्लॅटफॉर्मन्सवर मी यापूर्वी बोललेलो आहे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी ते व्हिडिओ जाऊन पहावेत.कारण नेहाने सुद्धा जेव्हा व्हिडिओ बनवला तर तिने सुद्धा त्याची कारण केली त्यामुळे ती करण्यात मी आता वेळ वाया घालणार नाही.

मला इतकाच सांगायचं मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो मी आत्तापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगिर का? असा त्या ट्रोलींगचा प्रमुख सूर आहे.

कारण माझ्या मुलाचा जन्म 2013 साली झाला, आणि हे ट्रॉलिंग मला तेव्हा नाही झालं हे आत्ता होत आहे. 

मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेमुळे आत्तापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्र बाहेरच्या, देशाबाहेरच्या लाखो लोकांच प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही तर मराठी लोकांचा सुद्धा प्रेम दिल. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी भूमिका करणार नाही.(chinmay mandlekar)

कारण मी करत असलेलं काम, मी करत असलेली भूमिका, याचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर एक वडील म्हणून एक नवरा म्हणून आणि कुटुंबप्रमुख म्हणून मला माझ कुटुंब संपन्न असण जास्त महत्त्वाचं आहे. 

मला याच वाईट वाटतंय का?

हो, मला खूप वाईट वाटतंय.

कारण माझ्या मनात महाराजाबद्दलची भक्ती किंवा श्रद्धा आहे, म्हणजे माझी भूमिका होती आणि तशी पर्सनल आयुष्यात खूप एक्सप्रेशन्स आहेत आणि माझ्या गाडीत सुद्धा जिथे लोकं नॉर्मली गणपतीची मूर्ती ठेवतात तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि हा केवळ दिखावा नाही, तर हे प्रेम आहे ही श्रद्धा आहे. 

अश्याच ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा. 

आपल्या श्रद्धेचे जस्टिफिकेशन लोकांना मी का द्यावं आणि लोकांना तरी ते का ऐकावं त्यांना काय दिसतं मुलाचं नाव जहांगीर ठेवलं. 

माझं एकच म्हणणं आहे माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे तर मग जहांगीर या आर्ट गॅलरीचे नाव बदलणार आहे का? 

जहांगीर टाटा यांनाच आपल्या देशाने भारतरत्न दिला आहे. 

भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभोई टाटा (जे आर डी टाटा) त्याच जेआरडी टाटा यांनी उभे केलेली एअर इंडिया ज्यातून आपण अभिमानाने प्रवास करतो आणि त्यांनी उभे केलेले अनेक उद्योग ज्याचा फायदा भारतातल्या प्रत्येक नागरिकांना होतो, त्यांचा वापर करताना आपण हा विचार करतो का?(chinmay mandlekar)

टायटनच्या घड्याळ पासून ते जे लोक त्यांच्या कंपनी मधे काम करतात. आपण विचार ही नाही करत की ह्यांचं नाव जहांगीर होत.

पण ठीक आहे मी एक अभिनेता आहे, आणि अभिनेते नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात.

इथे अजून एक मी गोष्ट सांगू इच्छितो अनेक लोकांनी त्या ट्रॉलिंग मध्ये असंही म्हटलं आहे की तुम्ही एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला खत पाणी घातलंत मग आता तुम्हाला हे होणारच.

तर माझे चॅलेंज मला दाखवून द्यावं की मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार केलाय? मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर गेलोय? किंवा मी आज पर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या अधिपत्याखाली वावरलोय?(chinmay mandlekar)

असं कधीच नाही झाल.

हे माझे राजकीय विचार स्वतंत्र आहे. किंबहुना ज्या पॉडकास्टमुळे हे सगळं सुरू झालं होतं त्या पॉडकास्ट मध्ये सुद्धा मी हे नमूद केलं होतं. 

दर निवडणुकीत ठरवून वेगळ्या पक्षाला मतदान करणारा मी एक सुजन मतदार आहे या सगळ्याच स्पष्टीकरण कोणाला देण्यात काहीही अर्थ नाही. 

महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम केलं पण जर मी महाराजांची भूमिका केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या अकरा वर्षाच्या मुलाला या मानसिक त्रासाला समोर जावं लागत असेल तर त्यांची माफी मागून मी तुम्हाला सांगू इच्छितो इथून पुढे महाराजांची भूमिका मी करणार नाही नमस्कार!(chinmay mandlekar)

दिग्दर्शक सुहृद गोडबोले याने ही सोशल मीडिया वरती चिन्मय मांडलेकरचा विडियो शेअर करत “फार दुर्देवी. लाज वाटली पाहिजे आपल्याला समाज म्हणून” असे म्हणत दिला पाठिंबा(chinmay mandlekar) 

WhatsApp Image 2024 04 22 at 12.02.00 AM 1

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व तिची बहीण गौतमी देशपांडे यांनी सुद्धा अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना पाठिंबा दिला आहे. “Is this the way an Artist should be treated ??? अस सॉफ्ट टार्गेट बनवायच असेल तर लोकांची लायकी नाही काही चांगल मिळवायची.. very very disappointed by this” असे म्हणत गौतमी देशपांडे हिने चिन्मय मांडलेकर यांना पाठिंबा दिला आहे.(chinmay mandlekar) 

WhatsApp Image 2024 04 22 at 12.01.59 AMWhatsApp Image 2024 04 22 at 12.02.01 AM 1

लेखक व निर्माते समीर विद्वांस यांनी सुद्धा सोशल मीडिया वर चिन्मय मांडलेकर यांना पाठिंबा दिला आहे. 

WhatsApp Image 2024 04 22 at 12.02.00 AM

बिग बॉस फेम अभिनेता अक्षय वाघमारे याने सुद्धा सोशल मीडिया वरती पोस्ट शेअर करून चिन्मय मांडलेकर यांना पाठिंबा दिला आहे.(chinmay mandlekar) 

WhatsApp Image 2024 04 22 at 12.01.59 AM 1

Leave a Comment