csk vs lsg | पाच वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सला शेवटच्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सकडून ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता

पाच वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सला शेवटच्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सकडून ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु आता चेन्नईचा संघ आपल्या घरी म्हणजे चेन्नईच्या मैदानावर परतत आहे आणि त्यांना येथे पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपे आव्हान नाही. लखनौने यापूर्वी चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते, मात्र आज त्यांच्या समोर चेन्नईचा गड फोडण्याचे आव्हान असेल.(csk vs lsg)

CSK VS LSG:

आज खेळला जाणारा आयपीएलच्या हंगामातील ३९ वा सामना ऋतुराज गायकवाडच्या चेन्नईच्या संघाचा के एल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट संघासोबत होणार आहे. आजचा सामना हा चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे हा येथे खेळवला जाणारा या हंगामातील चौथा सामना असणार आहे.

चेन्नईच्या संघाने या मोसमात आतापर्यंत ७ सामने खेळले असून त्यापैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. जरी त्यांनी त्यांना शेवटच्या पाच पैकी तीन सामन्यात पराभव पत्करला असला तरी ते गुणतालिकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहेत.

लखनऊ च्या संघाने सुद्धा सात सामने खेळले असून त्यापैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे लखनऊने त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे व ते गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहेत.(csk vs lsg)

या मोसमात या दोन संघात झालेल्या शेवटच्या सामन्यात लखनऊ संघाने चेन्नई संघाचा आठ गडी राखून पराभव केला होता. चेन्नईच्या संघाने दिलेले १७७ धावांचे लक्ष लखनऊ संघाने १९ षटकातच पूर्ण केले होते. सलामी ला येऊन ८२ धावा करणारा के एल राहुल या सामन्याचा सामनावीर ठरला होता.

अश्याच ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा.

सलामीवीर म्हणून आतापर्यंत तीन सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा केल्यामुळे, चेन्नई संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडसाठी कोणत्या स्थानावर खेळावे ही एक डोकेदुखी असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनऊ संघाचा तरुण वेगवान गोलंदाज मयांक यादव याच्या पुनरागमनाची आशा असेल कारण शेवटच्या काही सामन्यामध्ये तो दुखापती मुळे खेळू शकला नाही.

चेन्नई संघाची आपली पुढची नजर पुढील तीन सामने जिंकून प्लेऑफ मधील आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न असेल. चेन्नई साठी या हंगामात कर्णधार ऋतुराज गायकवाड व शिवम दुबे यांनी चांगल्या धावा केल्या असल्या तरी सलामीवीर रचिन रविंद्र चा फॉर्म हा चेन्नई संघासाठी चिंतेचा विषय आहे परंतु चेन्नईच्या संघाने गेल्या काही सामन्यांपासून अजिंक्य रहाणेला सलामीला पाठवले आहे.(csk vs lsg)

लखनऊ संघाचे सलामीवीर के एल राहुल व क्विंटन डी कॉक यांनी गेल्या सामन्यात चेन्नई विरुद्ध चांगले प्रदर्शन केले होते परंतु तो सामना लखनऊ येथे खेळवला गेला होता. आजचा सामना चेपॉक येथे खेळवला जात असल्यामुळे त्यांना चेन्नईचा वेगवान गोलंदाज पथिराना पासून सावध राहावे लागणार आहे. पथिराना व्यतिरिक्त चेन्नईचे वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे दीपक चहर व मुस्ताफिजूर रहमान यांच्याकडून चेन्नईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. 

तुम्हाला माहिती आहे का:

  • केल राहुलने २०१८ पासून पॉवरप्लेमध्ये १५० च्या स्ट्राइक रेट धावा केल्या आहेत. शिवाय त्याचा चेन्नई संघाविरुद्ध परफॉर्मेंस सुद्धा चांगला राहील आहे. त्याने चेन्नई संघाविरुद्ध आठ डावात चार अर्धशतके झळकावली आहेत.
  • शार्दुल ठाकूरने सर्व प्रकारच्या T२० मध्ये निकोलस पूरनला १८ चेंडू टाकले असून त्यामध्ये त्याला पाच वेळा बाद केले आहे.(csk vs lsg)

CSK VS LSG HEAD TO HEAD:

चेन्नई आणि लखनऊ या संघानी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध ४ आयपीएलचे  सामने खेळले आहेत. या ४ सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये चेन्नई च्या संघाने विजय मिळवला असून तर २ सामन्यामध्ये लखनऊ संघाने विजय मिळवला आहे तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. लखनऊ विरुद्ध चेन्नईच्या संघाची सर्वोच्च धावसंख्या २१७ आहे. चेन्नई विरुद्ध लखनऊ ची सर्वोच्च धावसंख्या २११ आहे.(csk vs lsg)

CSK VS LSG Pitch Report:

चेपॉक येथे आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या तिन्ही संघांनी वेगवेगळ्या धावसंख्या उभारल्या आहेत. त्यामुळे आज दोन्ही संघांची नजर २०० धावा उभारण्यावर असेल. 

CSK VS LSG सामना कधी होणार:

मंगळवार २३  एप्रिल रोजी संध्याकाळी ७:३० वाजता. 

CSK VS LSG सामना कुठे होणार:

एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेपॉक. चेन्नई.(csk vs lsg) 

CSK VS LSG सामना थेट प्रक्षेपण:

CSK VS LSG या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

संभाव्य संघ:

CSK: ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

LSG: केल राहुल, क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मोहसीन खान

Leave a Comment