DC vs RR | आयपीएल २०२४ च्या हंगामातील ५६ वा सामना टेबल टॉपर राजस्थान रॉयल्स विरुद्ध प्ले ऑफ मधील आपले स्थान जिवंत ठेवण्यासाठी धडपडणारा दिल्ली कॅपिटल्स यांच्याविरुद्ध दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम मध्ये होणार आहे.
दिल्ली संघाने या हंगामात ११ सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यात विजय तर सहा सामन्यात त्यांनी पराभव स्वीकारला आहे. सध्या दिल्लीचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे जर त्यांना अव्वल चार संघात स्थान मिळवून प्ले ऑफ साठी पात्र ठरायचे असेल तर उर्वरित तीनही सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागेल. तर दुसरीकडे राजस्थान संघाने दहा सामने खेळले असून आठ विजय व दोन पराभव यासह ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात राजस्थान संघाला केवळ एका धावेने पराभव स्वीकारावा लागला होता. हा राजस्थान संघाचा या हंगामातील केवळ दुसराच तर धावांचा पाठलाग करताना पहिलाच पराभव होता.
दिल्ली कॅपिटल्स संघाने त्यांचा शेवटचा सामना कोलकत्ता नाईट रायडर्स या संघविरुद्ध ईडन गार्डन्स येथे खेळला होता या सामन्यात कोलकत्ता संघाने दिल्लीचा सात गडी राखून पराभव केला होता.
दिल्ली संघाने त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय व दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्याविरुद्ध राजस्थान संघाने त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यापैकी केवळ एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे.
जर राजस्थान संघाने या सामन्यात विजय मिळवला तर प्ले ऑफ साठी पात्र ठरणारा ते पहिला संघ ठरतील.
DC VS RR Head to Head
दिल्ली कॅपिटल्स व राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये आत्तापर्यंत २८ सामने खेळले गेले आहेत. या २८ सामन्यांपैकी १५ सामन्यात राजस्थान रॉयल संघ तर उर्वरित १३ सामन्यात दिल्ली कॅपिटल संघ विजय ठरला आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम वर या दोन संघांमध्ये आठ सामने खेळले गेले असून या आठ सामन्यांपैकी पाच सामन्यात दिल्ली संघाने बाजी मारली आहे तर उर्वरित तीन सामन्यात राजस्थान संघ विजय ठरला आहे.
आणखी वाचा : इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये नवीन फीचर्स, कसे वापरायचे ते जाणून घेण्यासाठी क्लिक करा
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२४ च्या यापूर्वीच्या सामन्यात राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित वीस षटकात १८५ धावा केल्या होत्या या धावांच्या प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ केवळ १७३ धावा करू शकला होता. ४५ चेंडूत ७ चौकार व ६ षटकार यांच्या साह्याने नाबाद ८४ धावा करणारा रियान पराग याला सामनावीर घोषित करण्यात आले होते.
या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यात राजस्थान संघ विजयी ठरला आहे.
DC VS RR Pitch Report
या आयपीएलच्या मोसमात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम वरील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूल ठरले आहे. येथे खेळल्या गेलेल्या तीनही सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २१० धावाचा आकडा पार केला आहे. जर येथे दव पडले नाही तर फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. दिल्ली संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांनी सांगितले की दिल्ली व राजस्थान यांचा सामना हा त्याच खेळपट्टीवर खेळवला जाईल ज्या खेळपट्टीवर दिल्ली व मुंबई सामना खेळवला गेला होता.
DC VS RR सामना कधी होणार
मंगळवार, ७ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता
DC VS RR सामना कुठे होणार
अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
आणखी वाचा : Google Pixel 8a ची किंमत आणि फीचर्स लीक, या तारखेला होऊ शकतो लॉंच
DC VS RR सामना थेट प्रक्षेपण
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.
DC VS RR संभाव्य संघ
DC: डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश यादव.
Impact Sub: रसिक सलाम
RR: यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा.
Impact Sub: युझवेंद्र चहल
DC VS RR Intresting Facts
- आयपीएल २०२४ मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर प्रत्येक आठ चेंडूंवर एक षटकार मारला गेला आहे
- आयपीएल २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन युवा फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या तब्बल ८८.८% धावा षटकार-चौकारांमध्ये आल्या आहेत.
- या मोसमात दिल्लीमध्ये खेळले गेलेले तिन्ही सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत.
DC VS RR Fantasy Team
ऋषभ पंत (WK), जॉस बटलर (C), अभिषेक पोरेल, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, मिचेल मार्श, ॲनरिक नॉर्टजे (VC), ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल.