Site icon marathimitranews

CSK VS RR | चेन्नई संघासाठी आज करो वा मरो, राजस्थान विरुद्ध च्या आजच्या सामन्यात विजय आवश्यक

CSK VS RR

CSK VS RR | आयपीएल मधील आजचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. शेवटचा सामन्यात गुजरात विरुद्ध झालेल्या पराभवानंतर प्ले ऑफ मधील आपले स्थान भक्कम करण्यासाठी चेन्नई संघाला उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

आजचा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. राजस्थान संघाचे तीन सामने शिल्लक असताना त्यांना केवळ एका सामन्यात विजय आवश्यक आहे तर दुसरीकडे चेन्नई संघाला आजचा सामना तसेच त्यानंतर होणार बेंगलोर विरुद्ध च्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. परंतु यापैकी एकही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर चेन्नई संघासाठी मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

चेन्नई संघाने या आईपीएल हंगामात आत्तापर्यंत बारा सामने खेळले असून बारा गुणांसह ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत. चेन्नई संघाला त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात त्यांना गुजरात संघाकडून ३५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरीकडे राजस्थान संघाला प्ले ऑफ मधील आपले स्थान पक्के करण्यासाठी केवळ एका सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. राजस्थान संघाने त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर शेवटच्या दोन्ही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे आवश्यक असल्यामुळे हा सामना बघणे रोमांचक ठरेल.

CSK VS RR एकमेकाविरुद्ध (Head-to-Head)

चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स दोन संघांनी आत्तापर्यंत एकमेकांविरुद्ध २८ सामने खेळले आहेत. या २८ सामन्यांपैकी पंधरा सामन्यात चेन्नई संघाने तर उर्वरित तेरा सामन्यात राजस्थान संघाने विजय मिळवला आहे.

या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सात सामन्यांपैकी सहा सामन्यात राजस्थान संघ वरचढ ठरला आहे तर शेवटच्या चारही सामन्यात राजस्थान संघाने बाजी मारली आहे. गेल्या हंगामात या दोन संघांमध्ये येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान संघाने चेन्नईचा तीन धावांनी पराभव केला होता. या सामन्यात आर अश्विन सामनावीर ठरला होता.

आणखी वाचा: स्वच्छ व सुंदर नाही तर कचऱ्याच्या शहरात तुमचे स्वागत आहे

CSK VS RR पीच रिपोर्ट (Pitch Report)

एम ए चिदंबरम स्टेडियम मधील खेळपट्टी ही नेहमीच फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरली आहे. या मोसमात येथे खेळल्या गेलेल्या सहा-सामन्यांपैकी चार सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. परंतु येथे दुपारी तापमान ३५°c पर्यंत जाऊ शकते त्यामुळे धावांचा पाठलाग करण्याचा विचार करणारा कर्णधार एका वेगळ्याच पेचात पडू शकतो. आजचा सामना गुजरात टायटन्स व लखनऊ सुपर सायन्स यांच्याविरुद्ध खेळण्यासाठी वापरलेल्या खेळपट्टीवर होणार आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करून २०० पेक्षा जास्त धावा धावफलकावर लावल्या होत्या. व या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवला होता.

या मैदानावर खेळल्या गेलेल्या ८२ सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४८ सामने जिंकले आहेत तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी ३४ सामने जिंकले आहेत.

CSK VS RR सामना कधी होणार

रविवार, १२ मे २०२३ रोजी दुपारी ३:३० वाजता 

CSK VS RR सामना कुठे होणार

एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

CSK VS RR सामना थेट प्रक्षेपण

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

CSK VS RR संभाव्य संघ

CSK: ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, एमएस धोनी, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग.

Impact Sub: अजिंक्य रहाणे, समीर रिझवी

RR: यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.

Impact Sub: जॉस बटलर. 

CSK VS RR महत्वाचे मुद्दे 

CSK VS RR DREAM TEAM

संजू सॅमसन(c), ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, रियान पराग, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, जॉस बटलर.

Exit mobile version