Google Pixel 8a | लॉंच होण्याआधीच Google Pixel 8a ची किंमत आणि फीचर्स बाजारात लीक, या तारखेला होऊ शकतो बाजारात लॉंच

Google Pixel 8a | लॉंच होण्याआधीच Google Pixel 8a ची किंमत आणि फीचर्स बाजारात लीक

Google चे Pixel A मालिकेतील स्मार्टफोन त्यांच्या प्राइस टू वॅल्यूसाठी ओळखले जातात कारण ते फ्लॅगशिप सिरीज मधीलच असतात परंतु खूपच कमी किमतीत येतात. Google च्या I/O 2024 डेव्हलपर कॉन्फरन्सच्या आधी कंपनी पुढील काही दिवसांत या मालिकेतील पुढील उत्पादन, Pixel 8A चे लॉंच करेल अशी अपेक्षा आहे.

Google Pixel 8a

महत्वाचे मुद्दे

  • Google Pixel 8a या महिन्यात लॉंच होण्याची अपेक्षा आहे.
  • आगामी फोन कदाचित Tensor G3 चिपसेटने सुसज्ज असेल.
  • हा फोन भारतात ४५,००० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीपासून लॉंच केला जाऊ शकतो.

टेक जायंट Google ने अद्याप Pixel 8a लाँच करण्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु अनुमान असे सुचवते की ते या महिन्यात भारतात आणि जागतिक स्तरावर हा फोन लॉंच करतील. शिवाय, या फोन बद्दल अनेक लीक आणि अफवा जसे कि Pixel 8a ची अपेक्षित किंमत, वैशिष्ट्ये, डिझाइन आधीच ऑनलाइन दिसू लागले आहेत. अद्याप लाँच न केलेल्या Google Pixel 8a च्या अपेक्षित तपशीलांवर एक द्रुत दृष्टीक्षेप आहे.

Google Pixel 8a

Google Pixel 8a अपेक्षित लॉन्च तारीख

Google अध्याप या बाबतीत पुष्टी केली नसली तरी, Google संभाव्यतः आगामी Google I/O 2024 इव्हेंट जो 14 मे रोजी सुरू होणार आहे या इवेंटमध्ये Pixel 8a लॉंच करू शकतो. तसेच, त्यानंतर भारत तसेच जागतिक स्तरावर  प्री-ऑर्डर लवकरच सुरू होऊ शकतात.

Google Pixel 8a

Google Pixel 8a ची भारतात अपेक्षित किंमत, रंग पर्याय

Google Pixel 8a 128GB आणि 256GB स्टोरेज वेरिएंटमध्ये लॉंच केला जाऊ शकतो. Pixel 8a भारतातील Pixel 7a च्या तुलनेत रु. १,०००-२,००० महाग असण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, भारतात याची किंमत ४५,०००  रुपयांपासून सुरू होऊ शकते.

जागतिक स्तरावर, अलीकडील रीपोर्टनुसार, Google Pixel 8a च्या 128GB व्हेरिएंटची किंमत $४९९ आहे, जी अंदाजे ४१,६०० रुपये आहे, तर 256GB मॉडेलची किंमत $५५९, सुमारे ४६,६०० रुपये असू शकते.

आणखी वाचा: महिला T20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत या दिवशी होणार सामना 

गुगल, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन्ससाठी ओळखले जाते, Google Pixel 8a नवीन रंगात सादर केला जाऊ शकतो, ज्यामध्ये ऑब्सिडियन, पोर्सिलेन, बे आणि मिंट यांचा समावेश आहे. कंपनी Pixel 8A साठी रंग-समन्वित कवर्स देखील लॉंच करू शकते, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या प्राधान्यांनुसार त्यांचे फोन वापरता येतील. फोनमध्ये काचेची नक्कल करणाऱ्या प्लास्टिक किंवा पॉली कार्बोनेट बॅकसह मेटल फ्रेम असण्याची शक्यता आहे.

Google Pixel 8a अपेक्षित फीचर्स

Pixel 8a ची अनेक फीचर्स आधीच लीक झाले असून, ज्यात Google Pixel 8 आणि Google Pixel 8 Pro प्रमाणे फीचर्स अपेक्षित आहेत. ज्यामध्ये 6.1-इंचाचा HD डिस्प्ले, Tensor G3 चिपसेट, ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप, IP67 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंग आणि बरेच काही समाविष्ट आहे. इतकंच नाही तर फोनमध्ये सर्कल टू सर्च, लाइव्ह ट्रान्सलेट, मॅजिक इरेजर आणि ऑडिओ मॅजिक इरेजर यासह अनेक एआय फीचर्स देण्यात येऊ शकतात.

डिस्प्ले: Google Pixel 8a मध्ये 6.1-इंचाचा FHD+ 120Hz OLED डिस्प्ले असेल.

चिपसेट: Google Pixel 8 मालिकेतील वैशिष्ट्यांप्रमाणे Pixel 8a Tensor G3 चिपसेटसह सुसज्ज असणे अपेक्षित आहे.

Google Pixel 8a

मागील कॅमेरा: तो 64MP OIS-सक्षम मुख्य कॅमेरा आणि 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर कॅमेरा असू शकतो.

सेल्फी कॅमेरा: Google Pixel 8a मध्ये 13MP फ्रंट कॅमेरा असू शकतो.

स्टोरेज: याआधी लॉंच करण्यात आलेल्या Google Pixel 8 आणि Google Pixel 8 Pro या Google फोनला 128GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट देण्यात आले होते त्यामुळे Google Pixel 8a मध्ये सुद्धा हेच अपेक्षित आहे. 

Google Pixel 8a

OS: आगामी Google Pixel 8a Android 14 वर ऑपरेट करेल तसेच या फोनला सात वर्षांची सुरक्षा अपडेट्स मिळतील, परंतु त्याला केवळ सात वर्षांची सुरक्षा अपडेट्स मिळणार नाहीत तर OS अपग्रेड आणि फीचर ड्रॉप देखील मिळतील असे सूत्रांचे म्हणे आहे.

बॅटरी आणि चार्जिंग: या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी असू शकते, ज्यामध्ये 27W जलद चार्जिंग तंत्रज्ञान आहे.

इतर वैशिष्ट्ये: Pixel 8a मध्ये वायरलेस चार्जिंग, IP67 रेटिंग, AI वैशिष्ट्ये आणि बरेच काही समाविष्ट असेल.

आणखी वाचा: आयपीएल हंगाम २०२४ मधील आजचा सामना मुंबई इंडियन्स संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध

Google Pixel 8a डिझाइन

अलीकडेच लीक झालेल्या फोटोस असे सूचित करतात की या फोन मद्धे गोलाकार कडा असलेल्या पंच-होल डिस्प्लेसह येईल. व्हॉल्यूम आणि पॉवर की Pixel 8a च्या उजव्या बाजूला असतील, तर डाव्या बाजूला सिम पोर्ट आहे. दरम्यान, चार्जिंग पोर्ट तळाशी आहे. फोनच्या मागील पॅनलमध्ये दोन सेन्सर आणि एलईडी फ्लॅश असलेल्या जाड आडव्या पट्ट्यासह कॅमेरा मॉड्यूल आहे.

2 thoughts on “Google Pixel 8a | लॉंच होण्याआधीच Google Pixel 8a ची किंमत आणि फीचर्स बाजारात लीक, या तारखेला होऊ शकतो बाजारात लॉंच”

Leave a Comment