Site icon marathimitranews

GT vs RCB | गुजरात टायटन्स संघ या हंगामात प्रथमच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाविरुद्ध भिडणार

GT vs RCB

GT vs RCB | आयपीएलच्या सामना क्रमांक ४५ मध्ये गुजरात टायटन्स संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये होणार आहे.

या हंगामात हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांसमोर येत आहेत.

गुजरात संघाने आतापर्यंत नऊ सामने खेळले असून त्यापैकी चार सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे व ते सध्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. गुजरात संघाने खेळलेला शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटलस् विरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यात गुजरात संघाला केवळ ४ धावांनी पराभूत व्हावे लागले होते.

बेंगलोर संघाने आतापर्यंत नऊ सामने खेळले असून त्यापैकी सात सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे व ते गुणतलिकेत शेवटच्या क्रमांकावर आहेत. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळलेल्या शेवटचा सामन्यात त्यांनी हैदराबाद संघाचा 35 धावांनी पराभव केला होता. व हैदराबाद संघाला त्यांच्या होम ग्राउंड वर या हंगामात पराभूत करणारा पहिला संघ ठरले होते. बेंगलोर संघाला त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

प्ले ऑफ मध्ये जाण्याची आपली आशा जिवंत ठेवण्यासाठी गुजरात व बेंगलोर संघ हे या हंगामात पहिल्यांदा व एकुणात चौथ्यांदा व अहमदाबाद मध्ये पहिल्यांदाच एकमेकांचा सामना करतील.

तुम्हाला माहिती आहे का:

GT vs RCB  HEAD TO HEAD:

आयपीएल मध्ये आतापर्यंत बंगलोर व गुजरात या संघांमध्ये तीन सामने झाले असून यापैकी दोन सामन्यांमध्ये गुजरात संघाने विजय मिळवला आहे तर एका सामन्यांमध्ये बेंगलोरच्या संघाने गुजरात संघाचा पराभव केला आहे.

अश्याच नवनवीन ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICKकरा.

बेंगलोर संघाचे गुजरात विरुद्ध १९७ ही सर्वोच्च धावसंख्या असून १७० ही सर्वात कमी आहे तर त्या विरुद्ध गुजरात संघाची बेंगलोर संघाविरुद्ध १९८ ही सर्वोच्च धावसंख्या असून १६८ ही नीचांकी धावसंख्या आहे.

या दोन संघांमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे पहिल्यांदाच सामना खेळला जाणार आहे.

गुजरात संघाचे नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथील आकडे

नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरात संघाचे होम ग्राउंड असून या मैदानावर गुजरात संघाने आतापर्यंत १४ सामने खेळले असून त्यापैकी आठ सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. या मैदानावरील गुजरात संघाचे सर्वोच्च धावसंख्या २३३ आहे. या आठ सामन्यांपैकी पाच सामने गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत.

बेंगलोर संघाचे नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथील आकडे

बेंगलोर संघाने या मैदानावर आत्तापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यात तर दोन सामन्यात त्यांना पराभव चा सामना करावा लागला आहे. त्यांची या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या १७१ आहे.

GT vs RCB  Pitch Report:

गुजरात मधील अहमदाबाद येथे असलेले नरेंद्र मोदी स्टेडियम या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.

हे मैदान नेहमीच फलंदाजांसाठी अनुकूल राहिले आहे तर गोलंदाजांना येथे मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो.

येथील मैदानावर नाणेफेक जिंकणारे कर्णधार मोठ्या प्रमाणात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतात. सामना जसा जसा पुढे जातो तसा फिरकी गोलंदाजांना खेळपट्टी मधून मदत मिळण्यास सुरुवात होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला येथे एक एडवांटेज असते.

या हंगामात आत्तापर्यंत या मैदानावर चार सामने झाले असून त्यापैकी तीन सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे.

अहमदाबादमध्ये रविवारी तापमान ३८ अंशांच्या आसपास असेल, पावसाची शक्यता नाही आणि हवेत थोडी आर्द्रता राहील.

GT vs RCB सामना कधी होणार:

रविवार २७ एप्रिल, २०२४ दुपारी 3:30 वाजता.

GT vs RCB  सामना कुठे होणार:

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

GT vs RCB सामना थेट प्रक्षेपण:

GT vs RCB या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

संभाव्य संघ:

GT: रिद्धिमान साहा, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, आर साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर

RCB: विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल

 

Exit mobile version