Site icon marathimitranews

RCB VS PBKS | बेंगळुरू कि पंजाब कोण मारणार बाजी ?? कोणता संघ या स्पर्धेतील आपले आव्हान जीवंत ठेवणार.

RCB VS PBKS

RCB VS PBKS | सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या औरंगाबाद आजचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांमध्ये हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाळा येथील मैदानावर होणार आहे.

पंजाब किंग्स संघाने त्यांचा शेवटचा सामना याच मैदानावर चेन्नई सुपर किंग्स या संघाविरुद्ध खेळला होता या सामन्यात त्यांना चेन्नईच्या संघाकडून २८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

पंजाब किंग्ज संघ या हंगामात अकरा सामने खेळला असून यामध्ये चार विजय मिळवून ते गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहेत. तर दुसरीकडे बेंगळुरू संघाने देखील अकरा सामन्यात चार विजय मिळवले आहेत, व ते गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहेत. पंजाब व बेंगलोर या दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वपूर्ण आहे कारण स्पर्धेतील आपले आव्हान टिकवायचे असेल तर दोन्ही संघांसाठी हे दोन महत्त्वपूर्ण गुण ठरतील.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने आपला शेवटचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला होता. व या सामन्यात त्यांनी गुजरात संघाचा चार गडी राखून पराभव केला होता. बेंगलोर संघाने त्यांच्या शेवटच्या तीनही सामन्यात विजय मिळवला आहे.

पंजाब किंग्ज संघाला त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यापैकी केवळ दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे तर दुसरीकडे बेंगलोरच्या संघाने आपल्या प्रदर्शनात सुधारणा करत शेवटच्या पाच सामन्यापैकी तीन सामन्यात तर शेवटच्या तीनही सामन्यात विजय मिळवला आहे.

आणखी वाचा : आयपीएल मध्ये सर्वाधिक शतक करणारे भारतीय खेळाडू, सूर्यकुमार कितव्या क्रमांकावर ??

दोन्ही संघांसाठी हा सामना वर्चुल एलिमेशन सामना आहे. पराभूत होणाऱ्या संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

RCB VS PBKS Head to Head

पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांमध्ये आतापर्यंत ३२ सामने खेळले गेले आहेत या ३२ सामन्यांपैकी १५ सामन्यात बंगलोर संघ तर उर्वरित १७ सामन्यात पंजाब संघ विजय ठरला आहे.

बेंगलोर संघाचे पंजाब विरुद्ध २२६ ही सर्वोच्च धावसंख्या आहे तर ८४ ही निचांकी धावसंख्या आहे. तर दुसरीकडे पंजाब संघाची रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध २३२ ही सर्वोच्च तर ८८ ही निचांकी धावसंख्या आहे.

या दोन संघांमध्ये या हंगामात बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १७६ धावा केल्या होत्या. १७७ धावांचे लक्ष्य बंगळुरू संघाने १९.२ षटकात यशस्वीपणे पूर्ण केले होते. ४९ चेंडूत ७७ धावा करणारा विराट कोहली या सामन्याचा सामनावीर ठरला होता.

RCB VS PBKS Pitch Report

धर्मशाळाची खेळपट्टी ही वेग, उसळी आणि चेंडूच्या स्विंग साठी ओळखली जाते. धर्मशाळाची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी चांगला बाऊन्स व स्विंग गोलंदाजांसाठी स्विंग मिळवू शकते. तसेच येथील आऊटफिल्ड  फास्ट असून फलंदाजी करताना याचा फायदा होऊ शकतो.

येथील खेळपट्टी मुख्यतः वेगवान गोलंदाजांना अनुकूल असते. पॉवर प्ले दरम्यान मिळणारे स्विंग व पाऊस यामुळे गोलंदाजांना मदत मिळू शकते.

धर्मशाळा चे मैदान हे नेहमीच उच्च धावसंख्येसाठी ओळखले जाते. फिरकी गोलंदाजांना येथे फार कमी प्रमाणात मदत मिळते. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ सामान्यत: प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात.

RCB VS PBKS सामना कधी होणार

गुरुवार, ९ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता

RCB VS PBKS सामना कुठे होणार

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला

RCB VS PBKS सामना थेट प्रक्षेपण

पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

RCB VS PBKS संभाव्य संघ

RCB: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विल जॅक्स, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, यश दयाल, विजयकुमार वैशाख, मोहम्मद सिराज

Impact Sub: रजत पाटीदार

आणखी वाचा : निवडणूक निकाला आधीच शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी बुडाले.

PBKS: जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम करन, जितेश शर्मा, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

Impact Sub: प्रभसिमरन सिंग

RCB VS PBKS Interesting Facts

RCB VS PBKS Fantasy Team

फाफ डू प्लेसिस (vc), विराट कोहली (c), जितेश शर्मा (डब्ल्यूके), लियाम लिव्हिंगस्टोन, रिली रोसो, सॅम कुरन, अर्शदीप सिंग, कॅमेरॉन ग्रीन, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल.

Exit mobile version