Site icon marathimitranews

loksabha election 2024 first phase election | लोकसभा निवडणूक २०२४ पहिल्या टप्याचे मतदान पार पडले:उष्णतेची लाट असूनही लोकसभा निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्यात उच्चांकी मतदान 

loksabha election 2024 first phase election

उष्णतेची लाट असूनही लोकसभा निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्यात उच्चांकी मतदान (loksabha election 2024 first phase election) 

loksabha election 2024 first phase election | लोकसभा निवडणूक २०२४ पहिल्या टप्याचे मतदान पार पडले

२१ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान मोठ्या शांततेत पार पडले.

बहुतेक ईशान्य कडील राज्यसह १० राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

छत्तीसगढ मधील बस्तर जिल्ह्यातील ५६ गावांनी प्रथमच मतदान केले.

ग्रेट निकोबारच्या शॉम्पेन जमातीनेसुद्धा प्रथमच मतदान केले. 

प्रथम मतदारांनी मोठ्या उत्साहाने या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्याचे मतदान काल पार पडले त्यासाठी २१ राज्यातील १०२ जागांवर विविध पक्षांचे तसेच अपक्ष असे मिळून १६०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.

सकाळी सात वाजता मतदानात सुरुवात झाली हे मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यासाठी देशात ५९.७१% मतदान झाले आहे.

देशाच्या विविध भागात मतदान शांततेत पार पडले तर काही ठिकाणी किरकोळ हिंसाचाराच्या घटना घडल्या छत्तीसगडमध्ये एका सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झालेला आहे.(loksabha election 2024 first phase election) 

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यासाठी ५५.२९% मतदान झाले आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार सर्वाधिक मतदान त्रिपुरा राज्यात झाले असेल तेथे ७९.९०% मतदान झाले आहे तर  दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल मध्ये ७७.५७% मतदान झाले आहे तर बिहारमध्ये सर्वात कमी म्हणजे ४७.४९% मतदान झाले आहे. त्या खालोखाल सर्वात कमी मतदान राजस्थानमध्ये ५०.९५% झाले आहे.

लोकसभा निवडणुकी सोबतच अरुणाचल प्रदेश व सिक्कीम या राज्यात विधानसभा निवडणूक साठी सुद्धा मतदान झाले.

काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मध्ये किरकोळ बिघाड आढळून आला त्यामुळे मतदानाला काही प्रमाणात उशीर झाला परंतु ईव्हीएम मशीन बदलल्यानंतर मतदान सुरळीत पार पडले.

देशात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे काही प्रमाणात त्याचा फरक हा निवडणूक प्रक्रियेवर दिसून आला सामान्यपणे सकाळी मतदानाची टक्केवारी सामान्य होती परंतु हळूहळू हवामानात सुधार झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली.

अंदमान व निकोबार मध्ये 56.87% मतदान झाले येथील शॉम्पेन जमातीच्या आदिवासींनी या निवडणूक प्रक्रियेत प्रथमच सहभाग नोंदवला व आपला मतदानाचा हक्क बजावला निकोबार येथे एकच लोकसभा क्षेत्र आहे.

महाराष्ट्र मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभेच्या पाच जागांसाठी मतदान झाले. पाच जागा पुढील प्रमाणे रामटेक नागपूर भंडारा-गोंदिया गडचिरोली चिमूर व चंद्रपूर.(loksabha election 2024 first phase election) 

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून यावर्षी एकूण पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदान होणार आहे.

यामध्ये नागपूर मधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चंद्रपूर मधून सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या रामटेक या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून शामकुमार बर्वे तर शिवसेना शिंदे गटाकडून राजू पारवे हे रिंगणात आहेत व किशोर गजभिये हे अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत पाहायला मिळत आहे

नागपूर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी कडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर काँग्रेस पक्षाकडून विकास ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इतर कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार येथे रिंगणात उतरवलेला नाही त्यामुळे गडकरी व ठाकरे यांच्यामध्येच ही लढत आहे.(loksabha election 2024 first phase election) 

भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच पुन्हा संधी देण्यात आलेले आहे तर काँग्रेस पक्षातर्फे प्रशांत पडोळे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. वंचित बहुजन आघाडी तर्फे येथे संजय केवट हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर बहुजन समाजवादी पार्टी तर्फे संजय कुंभलकर हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेला गडचिरोली चिमूर हा लोकसभा मतदारसंघ असून येथे भारतीय जनता पार्टी कडून अशोक नेते तर काँग्रेस पक्षाकडून नामदेव किरसान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.(loksabha election 2024 first phase election) 

चंद्रपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टी कडून महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आले असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कै. खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट देण्यात आलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल पटेल यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला व सशक्त व समृद्ध लोकशाही करण्यासाठी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करण्याचे त्यांनी लोकांना आवाहन केले.(loksabha election 2024 first phase election) 

अश्याच ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळेस त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस व त्यांच्या आई सुद्धा उपस्थित होत्या जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे त्यांनी यावेळी आव्हान केले.

विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते तसेच काँग्रेसचे नेते विजय वडेटीवार यांनी सुद्धा सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला.

नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी सुद्धा मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क आहे.(loksabha election 2024 first phase election) 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

पहिल्या टप्प्यातील महत्त्वाचे नेते

१) नागपूर महाराष्ट्र : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

२) अरुणाचल प्रदेश:  केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू

३) दिब्रुगड आसाम: सर्वानंद सोनवल केंद्रीय मंत्री

४) मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश: संजीव बालियान केंद्रीय मंत्री

५) उधमपूर जम्मू : जितेंद्र सिंग केंद्रीय मंत्री

६) अलवर राजस्थान: भूपेंद्र सिंग केंद्रीय मंत्री

७) बिकानेर राजस्थान: अर्जुन राम मेघवाल केंद्रीय मंत्री

८) निलगिरी तमिळनाडू: एल मुरुगन केंद्रीय मंत्री.

विविध राज्यातील पहिल्या टप्यातील मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे: 

अनु. क्रमांक  राज्य  टक्केवारी 
अंदमान व निकोबार ५६.८७
अरुणाचल प्रदेश ६५.४६
आसाम ७१.३८
बिहार ४७.४९
छत्तीसगढ ६३.४१
जम्मू व काश्मीर ६५.०८
लक्षदीप ५९.०२
मध्य प्रदेश ६३.३३
महाराष्ट्र ५५.२९
१० मणीपुर ६८.६२
११ मेघालय ७०.२६
१२ मिजोराम ५४.१८
१३ नागालँड ५६.७७
१४ पुडुचेरी ७३.२५
१५ राजस्थान ५०.९५
१६ सिक्कीम ६८.०६
१७ तामिळनाडू ६२.१९
१८ त्रिपुरा ७९.९०
१९ उत्तर प्रदेश ५७.६१
२० उत्तराखंड ५३.६४
२१ पश्चिम बंगाल ७७.५७

 

Exit mobile version