Site icon marathimitranews

loksabha election | आज देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान, देशात ८८ तर राज्यात ८ मतदारसंघात आज मतदान होणार आहे. एकूण १३ राज्यात आज मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार

loksabha election

loksabha election: आज देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. देशात ८८ तर राज्यात ८ मतदारसंघात आज मतदान होणार आहे. एकूण १३ राज्यात आज मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात आज बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ,हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होईल

आज लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदार संघांमध्ये मतदान होत असून हे ८८ मतदार संघ तेरा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे जवळपास १ लाख ६७ हजार मतदान केंद्रांवर सुमारे १६ कोटी लोक आज मतदान करतील.

या ८८ मतदारसंघांमध्ये एकूण १२०२ उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये १०९८ पुरुष तर १०२ महिला, व दोन ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक उमेदवार बहुजन समाजवादी पार्टीचे आहेत त्यांनी एकूण ७४ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यानंतर भाजपने ६९ तर काँग्रेसने ६८ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

ही ८८ लोकसभा क्षेत्र खालील प्रमाणे केरळ मधील सर्व २० लोकसभा क्षेत्र कर्नाटकातील १४ राजस्थान मधील १३,उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र मधील प्रत्येकी आठ, मध्य प्रदेशातील सहा, आसाम बिहारमध्ये प्रत्येकी पाच, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी तीन जागा, मणिपूर त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एक जागा यांचा समावेश आहे.

मध्यप्रदेशातील बैतूल लोकसभा क्षेत्रातील मतदान हे येथील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अशोक बलवी यांच्या निधनामुळे सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात हलवण्यात आले आहे.(loksabha election)

अश्याच नवनवीन ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICKकरा.

सर्वांचे लक्ष केरळमधील वायनाड या लोकसभेच्या जागेवर असून येथून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी मैदानात आहेत.तसेच केरळमधील अजून एक लोकसभा क्षेत्र असलेले तिरुवंतपुरम तसेच उत्तर प्रदेशातील मथुरा व मेरठ या हायप्रोफाईल जागांवर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

टीव्ही मालिका रामायण मध्ये प्रभू श्रीरामांची भूमिका करणारे अरुण गोविल हे मेरठ मधून भाजपाच्या तिकिटावर पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत तर मथुरा मधून प्रसिद्ध सिने अभिनेत्री हेमामालिनी या आपल्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

loksabha election दुसऱ्या टप्पातील महत्वाच्या लढती 

वायनाड: वायनाड येथील जागेवर राहुल गांधी यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अँनी राजा व भारतीय जनता पार्टीचे केरळमधील प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. २०१९ च्या loksabha election मध्ये राहुल गांधी यांनी येथून सात लाख पेक्षा जास्त मतांनी ही जागा जिंकली होती.

तिरुवंतपुरम: केरळमधील अजून एक महत्त्वाची लोकसभा जागा म्हणजे तिरुवंतपुरम येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे निवडणुकीच्या मैदानात असून त्यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे निवडणूक लढवत आहेत. शशी थरूर ही जागा चौथा जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. 

कोटा बुंदी, राजस्थान: लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष ओम बिर्ला हे राजस्थान मधील कोटा बुंदी या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रल्हाद गुंजाळ यांचे आव्हान असेल या लोकसभा क्षेत्रातून ओम बिर्ला यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये विजय मिळवला आहे यापूर्वी हे लोकसभा क्षेत्र काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे.(loksabha election)

राजनांदगाव छत्तीसगड: राजनांदगाव छत्तीसगड ही सुद्धा लोकसभेची एक हायप्रोफाईल सीट असून या जागेवरून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार भूपेश बघेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात येथील भाजपाचे विद्यमान खासदार संतोष पांडे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. गेल्या तीन दशकांपासून अधिक काळ राजनांदगाव हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे.

बेंगलोर दक्षिण: येथून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २०१९ मध्ये तेजस्वी सूर्य यांनी तीन लाखापेक्षा अधिकच्या मतधक्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता.(loksabha election)

बेंगलोर ग्रामीण: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे बंधू डि के सुरेश काँग्रेसचे तिकिटावर या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे असून २०१९ च्या loksabha election मध्ये कर्नाटक मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणारे ते एकमेव खासदार होते. डी के सुरेश यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने देवेगौडा यांचे जावई, व एस डी कुमार स्वामी यांचे मेव्हणे सी एन मंजुनाथ यांना उमेदवारी दिली आहे मंजुनाथ हे पेशाने सर्जन आहेत.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील जागा

 बुलढाणा:महाराष्ट्रातील आठ जणांसाठी लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असून बुलढाण्यातून शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा सामना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना यांच्या पक्षाच्या नरेंद्र खेडकर यांच्याशी होणार आहे.

यवतमाळ वाशिम: यवतमाळ वाशिम मध्ये शिवसेनेने विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापून हिंगोली चे माजी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट दिले आहे त्यांचा सामना ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांच्याशी होणार आहे.

हिंगोली: हिंगोली मधून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे तिकीट कापण्यात आले असून त्यांच्या जागी शिवसेनेने बाबुराव कोहळीकर यांना तिकीट दिले आहे त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.(loksabha election)

परभणी: येथून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे निवडणूक लढत असून त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महादेव जानकर यांना भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पाठिंबा आहे.

अकोला: या लोकसभा क्षेत्रातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर काँग्रेस पक्षाकडून अभय पाटील हे ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

अमरावती: गेल्या loksabha election मध्ये अपक्ष लढलेल्या नवनीत राणा यावर्षीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे तर प्रहार जनशक्ती पार्टीकडून दिनेश बुब हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

वर्धा: या लोकसभा क्षेत्त्रातून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यांची लढत येथील विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या विरोधात होणार आहे.

नांदेड: नांदेड मधून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे वसंत चव्हाण निवडणूक लढवत आहेत.

Exit mobile version