LSG VS KKR IPL | प्ले ऑफ मधील अव्वल ४ मधील आपले स्थान भक्कम करण्यासाठी रविवारी लखनऊ सुपर जायंट्स व कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आजचा सामना

LSG VS KKR IPL | आयपीएल २०२४ मधील प्ले ऑफ मधील आपले स्थान भक्कम करण्यासाठी रविवारी लखनऊ सुपर जायंट्स व कोलकत्ता नाईट रायडर्स हे दोन संघ लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियम मध्ये एकमेकांचा सामना करतील.

लखनऊचा संघ २०२२ मधील पदार्पनापासून चांगले प्रदर्शन करताना दिसून येत आहे. २०२२ मध्ये हा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. तसेच त्यानंतर २०२३ मध्ये सुद्धा हा संघ तिसऱ्या स्थानावर होता.

लखनऊच्या संघाने आतापर्यंत या हंगामात दहा सामने खेळले असून त्यापैकी सहा सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. व सध्या ते बारा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. लखनऊ संघाला त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यापैकी तीन सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव सामना करावा लागला आहे.

तर दुसरीकडे कोलकत्ता संघाने त्यांनी खेळलेल्या दहा सामन्यांपैकी सात सामन्यात विजय मिळवला आहे व चौदा गुणांसह ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कोलकत्ता संघाने सुद्धा त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे.(LSG VS KKR IPL)

लखनऊ व कोलकत्ता या दोन संघांमध्ये या हंगामातील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये कोलकत्ता संघाने लखनऊ संघाने दिलेले १६२ धावांचे आव्हान केवळ १५.४ षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले होते. ४७ चेंडूत नाबाद ८९ धावा करणारा कोलकत्ता संघाचा सलामीवीर फलंदाज फिल सॉल्ट याला सामनावीर पुरस्काराने घोषित करण्यात आले होते.

आणखी वाचा: आयपीएल 2024 चेन्नई संघासाठी प्ले ऑफ अगोदर धक्कादायक बातमी, स्टार गोलंदाज टीम मधून बाहेर

कोलकत्ता संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात मुंबई संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर तब्बल बारा वर्षानंतर पराभव केला आहे. कोलकत्ता संघाने हा सामना २४ धावांनी जिंकला होता. ५२ चेंडूत ७० धावा करणारा वेंकटेश अय्यर याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर दुसरीकडे लखनऊ संघाने सुद्धा त्यांच्या शेवटच्या सामन्यात मुंबई संघाचा ४ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्याचा सामनावीर म्हणून मार्कस स्तोईनीस याला पुरस्कार देण्यात आला होता.

तुम्हाला माहिती आहे का:

  • केल राहुलने कोलकाता संघाविरुद्ध खेळलेल्या १४ डावापैकी सहा डावात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, त्याने दोन वेळचे चॅम्पियन कोलकाताविरुद्ध १३८.४१ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
  • सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी मिळून १० सामन्यांमध्ये ७७ षटकात २६ विकेट्स घेतल्या, फक्त ७.६५ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.
  • केएल राहुलला (३९२) आयपीएलमध्ये ४०० चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी आठ चौकारांची गरज आहे.
  • मिचेल स्टार्कला (४५) आयपीएलमध्ये ५० बळींचा टप्पा गाठण्यासाठी आणखी पाच विकेट्सची गरज आहे.
  • क्विंटन डी कॉकला (९९४) टी-20 मध्ये १००० चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी सहा चौकारांची गरज आहे.

LSG VS KKR IPL Head to Head:

कोलकत्ता व लखनऊ या दोन संघांमध्ये आतापर्यन्त चार सामने खेळले गेले आहेत. या चार सामन्यांपैकी तीन सामन्यात लखनऊ संघ तर एका सामन्यात कोलकत्ता संघ विजयी ठरला आहे. हे दोन्ही संघ प्रथमच या मैदानावर एकमेकांचा सामना करतील.लखनऊ व कोलकत्ता या दोन संघांमध्ये या हंगामातील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये कोलकत्ता संघाने लखनऊ संघाने दिलेले १६२ धावांचे आव्हान केवळ १५.४ षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले होते.

LSG VS KKR IPL Pitch Report:

एकना स्टेडियम, इतर आयपीएल खेळपट्ट्यांप्रमाणे, फलंदाजांना मोठ्या प्रमाणात धावा करण्याच्या संधी देत ​​नाही. १७०-१८० च्या आसपास कोणतीही धावसंख्या प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघासाठी विजयी धावसंख्या मानली जाते. या ठिकाणी फिरकीपटूंना गोलंदाजी करताना थोडीफार मदत मिळते.

LSG VS KKR IPL सामना कधी होणार:

रविवार, ५ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता 

LSG VS KKR IPL सामना कुठे होणार:

भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ 

LSG VS KKR IPL सामना थेट प्रक्षेपण:

LSG VS KKR या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

आणखी वाचा: प्रसिद्ध वेब सिरीज पंचायत लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला

संभाव्य संघ:

LSG:केएल राहुल, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, यश ठाकूर

Impact Sub: अर्शीन कुलकर्णी

KKR: फिलिप सॉल्ट, सुनील नारायण, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

Impact Sub: अंगकृष्ण रघुवंशी/मनीष पांडे

LSG VS KKR Fantasy Team:

केएल राहुल (c,wk), क्विंटन डी कॉक, श्रेयस अय्यर (vc), आंद्रे रसेल, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, मोहसिन खान, रवी बिश्नोई, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क. 

Leave a Comment