LSG VS RR | लखनऊ सुपर जायंट्स आज त्यांच्या घरच्या मैदानावर आयपीएलच्या ४४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना करण्यार

लखनऊ: लखनऊ सुपर जायंट्स आज त्यांच्या घरच्या मैदानावर आयपीएलच्या ४४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना करण्यार आहेत.(LSG VS RR)

LSG सध्या आठ सामन्यांत पाच विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर राजस्थान संघ आठ सामन्यांत सात विजयांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. रियान परागची धडाकेबाज फलंदाजी आणि यशस्वी जैस्वालच्या व जॉस बटलर यांच्या शतकाच्या जोरावर, सलग तीन विजयानंतर राजस्थान या सामन्यात फेव्हरेट म्हणून खेळतील.

राजस्थान संघाने त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे त्यांचा या हंगामातील एकमेव पराभव गुजरात संघ विरुद्ध झाला होता.

लखनऊ संघाने त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांनी शेवटचा सामना चेन्नई संघाविरुद्ध खेळला होता या सामन्यात त्यांनी चेन्नई संघाचा सहा गडी राखून पराभव केला आहे. तर राजस्थान संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात मातब्बर मुंबई संघाला नऊ गडी राखून पराभूत केले आहे.

या दोन संघांमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात राजस्थान संघाने लखनऊ संघाचा २० धावांनी पराभव केला होता. या सामन्यात राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसन याला त्याच्या ५२ चेंडू मधील धडाकेबाज ८२ धावाच्या खेळीसाठी सामनावीर घोषित करण्यात आले होते.

अश्याच नवनवीन ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICKकरा.

राजस्थान संघाचे सलामवीर यशस्वी जयस्वाल व जॉस बटलर यांनी या हंगामात राजस्थान संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुंबई विरुद्ध झालेल्या शेवटचा सामन्यात यशस्वी जयस्वाल ६० चेंडूत नाबाद १०४ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला जोस बटलर याने सात सामन्यांमध्ये आत्तापर्यंत २८५ धावा केल्या आहेत. तर कर्णधार संजू सॅमसन सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तसेच युवा फलंदाज रियान पराग यांने सुद्धा या आयपीएल हंगामात उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. दुसरीकडे लखनऊ संघाकडे उच्च दर्जाचे फलंदाज असू नये त्यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. चेन्नई विरुद्ध च्या शेवटचा सामन्यात मार्कस स्तोईनिस याने शानदार शतक झळकावले आहे.

राजस्थान संघाकडे फार अनुभवी गोलंदाजांचा भरणा आहे यामध्ये ट्रेंन्ट बोल्ट, आर अश्विन, युझवेंद्र चहल यांचा समावेश आहे. चहल याने राजस्थान संघासाठी आठ सामन्यांमध्ये १३ गडी बाद केले आहेत.

तुम्हाला माहिती आहे का:

  • निकोलस पूरनने या आयपीएल हंगामात डेथ ओव्हर्समध्ये ९ चौकार आणि ११ षटकार मारले आहेत.
  • संजू सॅमसनने या मोसमात घरच्या मैदानावर सर्वाधिक आणि चांगल्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. परंतु अवे सामन्यात त्याने ३ डावात फक्त ४२ धावा केल्या आहेत.
  • रवी बिश्नोईने लखनऊमध्ये ११ सामन्यात १३ विकेट घेतल्या आहेत आणि फक्त ७.४० चा इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत.

LSG VS RR HEAD TO HEAD:

आतापर्यंत आयपीएलमध्ये या दोन संघांमध्ये चार सामने झाले असून चार सामन्यांपैकी तीन सामन्यात राजस्थानच्या संघाने विजय मिळवला आहे तर फक्त एका सामन्यात लखनऊ संघाला विजय मिळवता आला आहे. या दोन संघांमध्ये राजस्थान संघाचाच वरचष्मा दिसून येतो.

लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियम यापूर्वी एकना आंतरराष्ट्रीय स्टेडियम म्हणून ओळखले जात असे.

येथे खेळल्या गेलेल्या सामन्यांचा विचार केला असता प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी सहापैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे नाणेफेक जिंकणाऱ्या संघांपैकी केवळ दोन सामन्यात विजय मिळवला आहे.

LSG VS RR  Pitch Report:

आयपीएल २०२४ मध्ये इतर ठिकाणी होणाऱ्या सामन्यांच्या तुलनेत लखनऊ येथील खेळपट्टी संथ आहे. नवीन चेंडूवर मोठे फटके मारताना कसला ही त्रास होत नाही पण जुन्या चेंडूवर धावा करताना अडचण होऊ शकते. फिरकीपटूंना पुरेशी मदत मिळण्याची अपेक्षा आहे त्यामुळे मधला षटकांमध्ये फलंदाजी करणे थोडे आव्हानात्मक असू शकते.

लखनऊ मध्ये आत्तापर्यंत झालेल्या दहा सामन्यांपैकी सहा सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला यश मिळाले आहे, त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय संघ घेऊ शकतात.

LSG VS RR  सामना कधी होणार:

शनिवार २७ एप्रिल रोजी संध्याकाळी ७:३० वाजता 

LSG VS RR  सामना कुठे होणार:

भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम लखनऊ. 

LSG VS RR सामना थेट प्रक्षेपण:

LSG VS RR या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

संभाव्य संघ:

LSG: केल राहुल, क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मोहसीन खान

RR: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन/संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

 

Leave a Comment