Panchayat season 3 | ओटीटी प्लॅटफॉर्म वरील प्रसिद्ध वेब सिरीजपैकी एक असलेल्या ‘पंचायतच्या’ तिसऱ्या सीझनची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करून मालिकेच्या तिसऱ्या सीझनबाबत सस्पेंस निर्माण केला होता. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली असून निर्मात्यांनी Panchayat season 3 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ही मालिका ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पंचायत या सिरीजचा पहिला सीझन २०२० मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता, ज्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. त्यानंतर, त्याचा दुसरा सीझन २०२२ मध्ये रिलीज झाला होता. त्याला सुद्धा प्रेक्षकानी भरपुर प्रेम दिले होते.
आता पंचायतचा तिसरा सीझन २०२४ मध्ये प्रदर्शित होत आहे. Panchayat season 3 २८ मे २०२४ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ यावर प्रदर्शित होईल. खरंतर, दुसरा सीझनच्या शेवटी निर्मात्यांनी सस्पेन्समध्ये ठेवला होता, त्यानंतर तिसऱ्या सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. काही काळापूर्वी प्राइम व्हिडिओने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये पंचायत मालिकेतील संपूर्ण कलाकार दिसत आहेत. हे पोस्टर पाहून अंदाज बांधता येतो की Panchayat season 3 ची कहाणी खूप रंजक असणार आहे. पंचायत ३ ची प्रदर्शनाची तारीख या पोस्टमध्ये लिहिलेली आहे.
Panchayat season 3
- पंचायत ही मालिका ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
- पहिला सीझन २०२० मध्ये आला होता.
- दुसरा सीझन २०२२ मध्ये रिलीज झाला होता.
- प्रेक्षक विविध प्रकारच्या कमेंट्स करून आपला आनंद व्यक्त करत आहेत.
कोटा फॅक्टरी फेम ‘जितेंद्र कुमार’ आणि प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या ‘पंचायत’ या वेबसिरीजचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत आणि दोन्ही सीझन सुपरहिट ठरले आहेत. चाहते आतुरतेने Panchayat season 3 ची वाट पाहत होते आणि आता त्याची रिलीज डेट समोर आली आहे.
जितेंद्र कुमारने प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत आणि मग जर नीना गुप्ता त्याच्यासोबत दिसली तर प्रेक्षकासाठी एक वेगळीच पर्वणी बनते. जितेंद्र आणि नीना गुप्ता यांनी अनेक वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यातील एक वेब सिरीज होती ‘पंचायत’. पंचायत ही ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ च्या लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक आहे. या मालिकेचे दोन सीझन आले असून दोन्ही हिट ठरले आहेत. पंचायतीच्या तिसऱ्या हंगामाबाबत लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. त्याची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाची वाट बघत होते. आता ही प्रतीक्षा संपणार आहे. Panchayat season 3 ची रिलीज तारीख उघड झाली आहे.
अधिक वाचा : Google ला टक्कर देण्यासाठी ओपनएआय मायक्रोसॉफ्टच्या मदतीने तयार करणार सर्च इंजिन.
ॲमेझॉन प्राइमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली आहे. यानंतर चाहते खूप उत्साहित झाले आहेत. आता त्यांना फक्त काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
Panchayat season 3, २८ मे रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. पंचायत या वेब सिरीजचे पोस्टर शेअर करताना ॲमेझॉनने लिहिले कि – ‘you moved the laukis, we unlocked your reward’. पंचायत सीजन 3 २८ मे पासून. या पोस्टला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
ॲमेझॉन प्राइमच्या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत. ते द फॅमिली मॅन 3, ‘पाताल लोक 3,’ आणि ‘मिर्झापूर 3’ च्या रिलीजच्या तारखाबद्दल देखील विचारत आहेत. एकाने लिहिले- विनोद भैया शेवटी येत आहेत. एकाने लिहिले- बिनोद तुम्ही पाहत आहात. एकाने लिहिलं- बघ बिनोद, मे म्हटल्यावर मे महिन्याच्या शेवटच्या महिन्यात दिला.
जितेंद्र कुमार स्टारर पंचायत वेब सीरिज ही प्रेक्षकांची मोठी आवडीची मानली जाते. पंचायत या वेबसिरीजची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. जितेंद्र कुमार व निना गुप्ता यांच्या या मालिकेने पहिल्या दोन सीझनमध्ये लोकांची मने जिंकली आहेत. पंचायतच्या सीझन ३ बाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. नुकतीच या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.
आता Panchayat season 3 या वेब सिरीजचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये पंचायत वेब सीरिजचे कलाकार प्रल्हाद पांडे (फैसल खान), विकास (चंदन रॉय) आणि भूषण (दुर्गेश कुमार) यांचा उल्लेख करताना दिसत आहेत आणि नवीन सीझनमध्ये तीनपट मजा मिळेल याची हमीही दिली आहे.तो रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागला आहे.
पंचायत या वेब सिरीजबद्दल बोलायचे झाले तर त्याची कथा फुलेरा गाव व त्यांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. जितेंद्र कुमार येथे पंचायतीचे काम करण्यासाठी येतात. शहराचा मुलगा गावात येऊन कसा जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला किती अडचणींना तोंड द्यावे लागते हे या वेब सिरीज मध्ये दाखवण्यात आले आहे. याशिवाय येथून बाहेर पडण्यासाठी तो दुसऱ्या नोकरीसाठी अभ्यासही करतो.
1 thought on “Panchayat season 3 | ओटीटी प्लॅटफॉर्म वरील प्रसिद्ध वेब सिरीज पंचायत लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला”