यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील ३७ वा सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे पंजाब किंग्स या संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असे त्यापैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे तर गतवर्षीचे उपविजेते गुजरात टायटन्स यांनी सात सामने खेळले असून केवळ तीन सामन्यात विजय मिळवला आहे.(pbks vs gt)
पंजाब किंग्स हे गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर तर गुजरात टायटन्स आठव्या क्रमांकावर आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक आहे.
दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभव पत्करावा लागलेला आहे. पंजाब संघाला शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध निसटता पराभव चा सामना करावा लागला होता तर गुजरात संघाला दिल्ली विरुद्ध च्या सामन्यात दारूण पराभव स्वीकारावा लागला होता.
अश्याच ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा.
पंजाब या संघासाठी शशांक सिंग व आशुतोष शर्मा या दोन फलंदाजांनी अफलातून फलंदाजी केलेली आहे त्यामुळे दोघेजण आयपीएल मध्ये एक वेगळेच आकर्षण ठरत आहेत.
हे दोन्ही फलंदाज आपल्या फलंदाजीत कसे सातत्य राहतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. सामन्याचा निकाल काहीही लागू परंतु शशांक व आशुतोष यांच्या फलंदाजीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील विशेष करून आशुतोष शर्मा याच्यावर निवड समितीचे विशेष लक्ष आहे.(pbks vs gt)
गेल्या सामन्यातील फलंदाजी मुळे आशुतोषचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला असणार आहे परंतु गुजरात संघाकडे असणारे गोलंदाज राशिद खान व नूर अहमद यांच्यावर त्याला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे
एकीकडे हे दोन फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असताना पंजाबचे इतर फलंदाज मात्र आपल्या कामगिरीत सातत्य राखू शकले नाहीत. त्यातच कर्णधार शिखर जाऊन ला झालेली दुखापत यामुळे त्यांना फलंदाजी वरती विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
दिल्ली विरुद्धच्या सामन्यात झालेल्या दारूण परभवा नंतर गुजरात संघाला त्यांच्या नेट रनरेटलासुद्धा मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे त्यांना विजय हेच ध्येय ठेवून या सामन्यात घ्यावे लागणार आहे.(pbks vs gt)
गुजरात टायटन्स संघाच्या फलंदाजीची धुरा कर्णधार शुभमन गिल वृद्धिमान सहा, साई सुदर्शन यासारख्या भारतीय खेळाडूंच्या खांद्यावर आहे परंतु फलंदाजी मध्ये पाहिजे तसे यश त्यांना अध्याप मिळालेले नाही. गुजरात संघातील मधल्या फळीतील फलंदाज धावा करण्यासाठी चाचपडत असून मजली फळी फारच कमकुवत वाटत आहे.
गुजरात संघाची गोलंदाजीची धुरा राशीद खान मोहित शर्मा यासारख्या अनुभवी गोलंदाजांच्या खांद्यावर आहे त्यामुळे हेच गुजरात साठी महत्त्वाचे गोलंदाज आहेत.
दोन्ही संघांचे हे चित्र बघता दोन्ही संघांसाठी हा विजय सोपं नसेल परंतु या मोसमातील आपले स्थान टिकवायचे असेल तर दोन्ही संघांसाठी या सामन्यात विजय मिळवणे खूप महत्त्वाचे आहे.(pbks vs gt)
तुम्हाला माहिती आहे का:
- शुभमन गिलला पंजाबविरुद्ध ५०० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त १४ धावांची गरज आहे.
- सॅम करनने आयपीएल २०२४ मध्ये डेथ ओवर्स मध्ये टाकलेल्या आठ ओव्हरमध्ये सात विकेट्स घेतल्या आहेत.
- आयपीएल २०२१ पासून धावाचा पाठलाग करताना डेव्हिड मिलरची सरासरी ६१.१० आणि स्ट्राइक-रेट १४२.७५ आहे
PBKS vs GT HEAD TO HEAD:
पंजाब किंग्स व गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध चार सामने खेळणे असून दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामन्यात विजय मिळवलेला आहे. (pbks vs gt)
PBKS vs GT Pitch Report:
मुल्लापुर येथील मैदानावर आत्तापर्यंत चार सामने खेळवले गेले असून आतापर्यंत कोणत्याही सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात कोणत्या संघाला यश आलेले नाही त्या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या ही १९२ असून येथील ऍव्हरेज स्कोर १७३ आहे गोलंदाजांसाठी येथील पिच मधून मदत मिळू शकते. येथे झालेल्या चार सामन्यां पैकी दोन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला असून दोन सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. या दोन संघांमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात पंजाब संघाने विजय मिळवला होता याच पराभवाचा बदला घेण्यासाठी गुजरात संघ मैदानात उतरेल. (pbks vs gt)
PBKS vs GT सामना कधी होणार:
२१ एप्रिल रोजी संध्याकाळी ७:३० वाजता
PBKS vs GT सामना कुठे होणार:
महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, न्यू चंदीगड
PBKS vs GT सामना थेट प्रक्षेपण:
PBKS vs GT या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.(pbks vs gt)
संभाव्य संघ:
PBKS: रिले रोसोव, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, हरप्रीत सिंग.
GT: शुभमन गिल, साई सुदर्शन, अभिनव मनोहर, वृद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, संदीप वॉरियर, नूर अहमद, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन.
Nicely articulates