Rcb vs Dc | रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) रविवारी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल २०२४ च्या ६२ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध सामना करतील. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० पासून सुरू होईल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सध्या १२ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यांनी मागील चार सामन्यांपैकी प्रत्येकी सामन्यात विजय मिळवला आहे. बेंगळुरूने त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जचा (PBKS) ६० धावांनी पराभव केला होता.
तर दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स १२ सामन्यामध्ये ६ विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्यांनी राजस्थान संघाचा 20 धावांनी पराभव केला होता. त्यांनी शेवटच्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघाना त्यांचे दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स त्यांचा कर्णधार ऋषभ पंतशिवाय उतरेल कारण या मोसमात तिसऱ्यांदा दिल्ली संघाच्या स्लो ओव्हर रेट झाल्यामुळे त्याला काल BCCI ने एका सामन्यासाठी निलंबित करण्यात केले आहे. त्यामुळे या त्याच्या जागी अक्षर पटेल संघाचे नेतृत्व करेल.
दोन्ही संघ कोणत्या ना कोणत्या बाबतीत एकमेकांपेक्षा आघाडीवर किंवा पिछाडीवर आहेत. दिल्ली संघासाठी जमेची बाजू म्हणजे त्यांचे सध्या १२ गुण असून त्यांनी त्यांच्या उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवल्यास व इतर संघांपेक्षा रन रेट चांगला ठेवल्यास त्याची प्ले ऑफ मध्ये खेळण्याचे शक्यता आहे.
दिल्लीचा संघ त्यांचे सलामीवीर फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्ग व अभिषेक पोरेल यांच्या फलंदाजीवर तर फिरकीपटू कुलदीप यादव याच्या गोलंदाजीतील कमालीसाठी आतुरलेले असतील. तर दुसरीकडे बेंगलोर चा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर विराट कोहली कडून आणखी एका चांगल्या खेळीची अपेक्षा करतील. तर गोलंदाजी मध्ये मोहम्मद सिराज व लॉकी फर्ग्युसन यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
तथापि, जर पावसाने खराब खेळ केला तर प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आधीच गोंधळलेल्या शर्यतीत अतिरिक्त मेट्रिक टाकले जाईल. वॉशआउट झाल्यास दिल्लीला अजूनही संधी असू शकते, परंतु निकाल न लागल्यास आरसीबी या हंगामातून बाहेर पडेल.
RCB VS DC एकमेकाविरुद्ध (Head-to-Head)
आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये आतापर्यंत ३० सामने झाले आहेत. त्यामध्ये १८ सामन्यांमध्ये बेंगलोर संघाने तर ११ सामन्यात दिल्ली संघ विजय ठरला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.
या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात दिल्ली संघाने बेंगलोर संघाचा पराभव केला होता.
बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर या दोन संघांमध्ये ११ सामने खेळले गेले आहेत. या ११ सामन्यांपैकी सहा सामन्यात बेंगलोर संघ तर चार सामन्यात दिल्ली संघ विजय ठरला आहे तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.
RCB VS DC पीच रिपोर्ट (Pitch Report)
एम. चिन्नास्वामी हे निःसंशयपणे त्याच्या लहान बाऊंडरी मुळे भरपूर धावा देणारे फलंदाजीचे ठिकाण आहे. यामुळे या खेळपट्टीवर संघांनी दुसऱ्यांदा फलंदाजीला प्राधान्य दिले आहे. या मैदानावर खेळल्या गेलेल्या ९३ सामन्यांपैकी ५० सामने दुसऱ्यादा फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत आणि ३९ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले तर उर्वरित चार सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही.
RCB VS DC सामना कधी होणार
रविवार, १२ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता
RCB VS DC सामना कुठे होणार
एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
RCB VS DC सामना थेट प्रक्षेपण
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.
RCB VS DC संभाव्य संघ
RCB: फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल.
Impact Sub: महिपाल लोमरोर.
DC: जेक फ्रेझर-मॅकगर्क, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, रसिक सलाम, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद.
Impact Sub: इशांत शर्मा
RCB VS DC महत्वाचे मुद्दे
- मोहम्मद सिराजने सर्व T20 प्रकारामध्ये ऋषभ पंतला आतापर्यंत चार वेळा बाद केले आहे
- विराट कोहलीने आयपीएल २०२४ च्या हंगामात फिरकीविरुद्ध १५ चौकार आणि १३ षटकार मारले आहेत.
- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा दोन संघांपैकी एक आहे (पंजाब किंग्ज दुसरा आहे) ज्यांनी आयपीएल २०२४ मध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर सामने जिंकल्यापेक्षा जास्त गमावले आहेत.
RCB VS DC DREAM TEAM
दिनेश कार्तिक, ट्रिस्टन स्टब्स(c), विराट कोहली, रजत पाटीदार, जेक फ्रेझर-मॅकगर्क, विल जॅक्स, अक्षर पटेल, कॅमेरून ग्रीन(vc), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, खलील अहमद.