आज आयपीएल मध्ये rr vs mi सामना असून दोन्ही संघांमध्ये काटे कि टक्कर बघायला मिळू शकते. संजू सॅमसन च्या नेतृत्वात खेळणार राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत प्रथम राहण्याचा प्रयत्न करेल तर दुसऱ्या बाजूला हार्दिक पांड्या च्या नेतृत्वात खेळणार मुंबई इंडियन्सचा संघ विजयासाठी आतुरलेला आहे.(rr vs mi)
टेबल टॉपर्स राजस्थान रॉयल्स यांचा आजचा सामना मुंबई इंडियन्स या संघाविरुद्ध त्यांच्या होम ग्राउंड वर म्हणजेच जयपूरच्या सवय मानसिंग स्टेडियम वर होणार आहे.
राजस्थान रॉयल्स या संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यातील सहा सामने जिंकून या क्षणी ते गुणतालिकेत प्रथम क्रमांक वर आहेत तर दुसरीकडे प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणारा मुंबई इंडियन्स संघ सात सामने खेळला असून केवळ तीन सामन्यात त्यांना विजय मिळवता आला असून गुणतालिकेत ते सहाव्या क्रमांकावर आहेत.
सलग दोन विजय नंतर प्रथम क्रमांक असलेले राजस्थान संघ त्यांचा यावर्षीचा सवाई मानसिंग स्टेडियम मधून शेवटचा सामना खेळण्यासाठी परतले आहेत. या मोसमात या मैदानात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यात राजस्थानच्या संघाने विजय मिळवला आहे.
राजस्थान रॉयल्स या संघाचा आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध असेल ज्यांनी एक चांगली लय पकडले असून अजून विजय मिळवण्याच्या तयारीत असलेल्या मुंबई विरुद्ध आहे.(rr vs mi)
या मोसमाच्या पहिल्या लढत जी मुंबई येथील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवली गेली होती तेथे राजस्थान संघाचे वर्चस्व दिसून आले होते राजस्थान संघाच्या भक्कम गोलंदाजी पुढे मुंबईचा संघ केवळ १२५ धावा करू शकला होता जे आव्हान राजस्थान संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात पार केले होते.जो मुंबई संघाचा या मोसमातील सलग तिसरा पराभव होतो परंतु त्या सामन्यानंतर मुंबईच्या संघाने चार पैकी तीन सामन्यात विजय मिळवला असून हीच विजयाची मालिका चालू ठेवण्यासाठी मुंबईचा संघ आतुर असेल.
अश्याच ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा.
जोस बटलर याने कोलकत्ता संघाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात २२४ धावांचा पाठलाग करताना मिळून दिलेला आकर्षक विजय, रियान परागचे मोक्याच्या क्षणी आलेले धावांचे योगदान ही राजस्थान संघासाठी जमेची बाजू आहे परंतु इतर फलंदाजांकडून विशेषतः यशस्वी जयस्वाल व ध्रुव जुरेल यांच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
शेवटच्या काही सामन्यांमध्ये जरी फिरकीपटू धावांच्या बाबतीत महाग ठरले असले तरी जयपूर येथील सामन्यात त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील
शेवटच्या सामना मुंबईच्या संघाने पंजाब विरुद्ध शेवटच्या षटकात विजय मिळवला असला तरीही मुंबई संघासाठी फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही गोष्टी चिंतेच्या आहेत. रोहित शर्माचा परत आलेला फॉर्म त्याला मिळणारी सूर्यकुमार यादव टिळक वर्माचे साथ या मुंबई संघासाठी जमेच्या बाजू आहेत, परंतु ईशान किशन कडून मुंबईच्या संघाला मोठा अपेक्षा असते तसेच कर्णधार हार्दिक पांड्या कडूनही फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.(rr vs mi)
गोलंदाजी मध्ये भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली आहे. शेवटच्या सामन्यात जरी जेराल्ड कॉस्त्झे यांनी चांगली कामगिरी केली असली तरी इतर गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. फिरकी विभाग हा मुंबई संघासाठी चिंतेचा विषय आहे, श्रेयस गोपाल व मोहम्मद नबी यांच्यावर फिरकी गोलंदाजीची मदार असेल
तुम्हाला माहिती आहे का:
- आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ४०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये, जोस बटलर हा पन्नासपेक्षा जास्त सरासरी असलेल्या दोन खेळाडूंपैकी एक आहे. मुंबई संघाविरुद्ध त्याने ४९८ धावा नऊ डावात केल्या आहेत, त्यात एक शतक आणि चार अर्धशतकं यांचा समावेश आहे. आणि मुंबई संघाविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट १४८.६५ आहे.
- मुंबई आणि राजस्थान मधील सध्याच्या खेळाडूंमध्ये, श्रेयस गोपाल हा जयपूरमध्ये १६.६६ च्या सरासरीने १५ विकेट्स आणि ४-१६ च्या सर्वोत्कृष्ट ७.३५ च्या इकॉनॉमीसह आघाडीवर आहे. या यादीत युजवेंद्र चहल १४ बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे.
- मुंबई संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी आयपीएल २०२४ मध्ये पॉवरप्लेमध्ये १७६.७२ च्या एकत्रित स्ट्राइक रेटने ३३४ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे राजस्थान चे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी याच टप्प्यात १३६.९१ च्या एकत्रित स्ट्राइक रेटने केवळ २०४ धावा केल्या आहेत.
RR VS MI HEAD TO HEAD:
मुंबई आणि राजस्थान या संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकमेकांविरुद्ध २९ सामने खेळण्यासाठी राजस्थानच्या संघाने १३ तर मुंबईच्या संघाने १५ सामने जिंकले आहेत तर एका सामन्याचा निकाल लागला नाही मुंबई संघाविरुद्ध राजस्थानचे सर्वोच्च धावसंख्या २१२ तर राजस्थान विरुद्ध मुंबई संघाची सर्वोच्च धावसंख्या २१४ आहे. तर राजस्थानची मुंबई विरुद्ध निच्यांकी धावसंख्या ९० तर मुंबईची ९२ अशी आहे.(rr vs mi)
मुंबईने राजस्थान विरुद्ध जिंकलेल्या जयपूर चा शेवटचा सामना हा 20 मे 2012 रोजी खेळला गेला होता
- जेव्हा मुंबई संघाने एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नव्हती.
- सचिन तेंडुलकर अद्याप इंटरनॅशनल क्रिकेट खेळत होते.
- रोहित शर्माने एकही द्विशतक झळकावले नव्हते.
- विराट कोहलीचे टेस्टमध्ये फक्त एकच शतक होते.
RR VS MI Pitch Report:
सवाई मानसिंग स्टेडियम मध्ये खेळल्या गेलेल्या चारही सामन्यांमध्ये फलंदाजी व गोलंदाजी साठी येथील पिच अनुकूल ठरले असून, प्रत्येक सामन्यांमध्ये संघांनी १८० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
पहिल्या 2 सामन्यामध्ये राजस्थान रॉयल संघाने १८५ व १९३ या धावांचा सफल बचाव केला होता तर त्यांना गुजरात विरुद्ध १९६ धावा करून सुद्धा पराभव पत्करावा लागला होता तर चौथ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाने दिलेले १८३ धावांचे आव्हान राजस्थान संघाने सहज पार केले होते.
RR VS MI सामना कधी होणार:
सोमवार २२ एप्रिल रोजी संध्याकाळी ७:३० वाजता
RR VS MI सामना कुठे होणार:
सवाई मानसिंग स्टेडियम,जयपुर
RR VS MI सामना थेट प्रक्षेपण:
RR VS MI या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.(rr vs mi)
संभाव्य संघ:
RR: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (c&wk), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन/संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
MI: रोहित शर्मा, इशान किशन (wk), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (c), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.
Thanks for giving that much information for us 🫂❤️