Share market news today | निवडणूक निकाला आधीच शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी बुडाले.

Share market news today | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मतदानानंतर आता शेअर बाजारात सट्टेबाजी सुरू झाली आहे शेअर बाजारातील प्रचंड घसरण आणि भविष्यात बाजार कोणत्या दिशेने जाईल याविषयी वेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या टप्प्यात झालेल कमी मतदान यामुळे शेअर मार्केट मध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे.

Share market news today

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी लोकसभेच्या ९३ जागांवर मतदान होत आहे, परंतु यावेळी निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्याने पहिल्या दोन टप्प्यातील एकूण मतदान २०१९ च्या लोकसभेच्या तुलनेत कमी झाले आहे भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जिथे याआधी दोन टप्प्यात मतदान झाले आहे, तेथे २०१९  च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्याच जागांवर मतदानाची टक्केवारी ७९.४१ होती. तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू होते तेव्हा, मंगळवारी शेअर बाजाराची स्थिति सांगणारा प्रमुख निर्देशांक हा 50 DMA च्या खाल्ली आला होता, DMA म्हणजे डेली मूव्हिंग एव्हरेज हे एक technical analysis इंडिकेटर आहे ज्याचा उपयोग शेअर मार्केट मधील लोक ट्रेंड समजून घेण्यासाठी करतात दैनंदिन चढउतारांवर आधारित आर्थिक मालमत्तेच्या किमतींमध्ये चढ उतार बघण्यासाठी याचा वापर केला जातो.(Share market news today)

अहवालात असे दिसून आले आहे की, गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर लिसटेड असलेल्या सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप ५ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. म्हणजेच ५ लाख कोटीं रुपयानी संपतीत घट झाली आहे. भारतीय शेअर बाजार, ज्याला दलाल स्ट्रीट असेही म्हणतात, तो अमेरिकन शेअर म्हणजे वॉल स्ट्रीटच्या विरुद्ध वागत आहे,, म्हणजेच वॉल स्ट्रीटच्या वाढीच्या उलट, भारतीय शेअर बाजारांमध्ये घसरण होत असल्याचे दिसून आले आहे.

भारत विक्स, जो शेअर बाजारातील चढउतार आणि अस्थिरता दर्शवितो, त्याने सलग नऊ ट्रेडिंग सत्रांमध्ये ६६  टक्क्यांनी झेप घेतली आहे आणि सध्या तो त्याच्या ५२ आठवड्यांच्या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला, सध्या सुरू असलेली ही अस्थिरता ४ जून रोजी निकाल जाहीर होईपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.Share market news today)

आणखी वाचा: लखनऊ कि हैदराबाद,आजचा सामना जिंकून कोणता संघ प्ले ऑफ मधील स्थान पक्के करणार ??

एका रिपोर्टच्या नुसार शेअर बाजार मधील या पडझडी मागे महत्त्वाची चार कारणे आहेत याचे पहिले कारण म्हणजे लोकसभा निवडणूक, एका रिपोर्टनुसार असे मानले जात होते की मोदी सरकार या निवडणुकीमध्ये अगदी सहज विजय मिळवेल व सत्तेत पुन्हा परत येईल पण लोकांना आता त्यामध्ये थोडे अनिश्चितता वाटत आहे. शेअर मार्केट याने याआधीच भाजप प्रणित एनडीए सरकार सत्तेत येईल हे मानून उच्चांकी पातळी गाठली होती परंतु आता यामध्ये अनिश्चितता दिसून येत आहे त्यामुळे हे सुद्धा एक पडझडीचे प्रमुख कारण असू शकते.Share market news today)

शेअर मार्केट कोसळण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे कंपन्यांच्या व्हॅल्यू बाबत लोकांच्या मनात असलेली साशंकतता. या कारणामुळे सुद्धा शेअर बाजारामध्ये १००० ते ४००० घट आपल्याला बघायला मिळू शकते. कारण मार्केट सध्या त्याच्या पीई व प्राइस टू बुक रेशो नुसार ओव्हरव्हॅल्यू आहे. जर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत चांगले निकाल बघायला मिळाले तर मार्केट थोड्या काळासाठी खूप चांगली पातळी पार करू शकते.

शेअर बाजारातील चिंतेचे तिसरे कारण म्हणजे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भारतीय बाजाराबद्दल असलेला खराब मूड. FII ने मे महिन्यात आत्तापर्यंत तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये ५५५२५ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स विकले आहे कारण भारत अमेरिकेतील रोखे उत्पन्नात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. तसेच तेथे व्याजदर कपातीची मुदतही पुढे ढकलण्यात आली आहे.

आणखी वाचा: Google Pixel 8a ची किंमत आणि फीचर्स लीक, या तारखेला होऊ शकतो बाजारात लॉंच

याशिवाय शेअर बाजारामध्ये घसरणीचे चौथे प्रमुख कारण म्हणजे चौथ्या तिमाहीचे कंपन्यांचे निकाल, कंपन्यांनी काही आश्चर्यकारक निकाल दिलेले असले तरीही काही कंपन्यांनी निगेटिव्ह रिझल्ट दिले आहेत. उत्पादन व आऊटसोर्सिंग हे कमकुवत बनले आहे तर कंपन्यांची वित्तीयस्थिती मजबूत आहे. तर कमाईची मर्यादित वाढ बाजाराच्या अपेक्षा आणि मूल्यमापनाचा अगदी विरुद्ध आहे.Share market news today)

शेअर बाजाराच्या घसरणीच्या इतर कारणांबद्दल बोलायचे झाल्यास नफा वसुली हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे त्यासाठी आरपीजी इंटरप्राईजेस चे प्रमुख हर्ष गोइंका यांनी शेअर बाजार मध्ये हर्षद मेहता व केतन पारीख यासारख्या घोटाळ्याचा शक्यता असल्याचे म्हटले होते. हे प्रामुख्याने कोलकत्ता येथे घडत असून यामध्ये गुजराती व्यावसायिक व मारवाडी यांचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हटलं तरी या बाबतीत सेबी व अर्थ मंत्रालयाने हस्तक्षेप करून लहान गुंतवणूकदारांचे नुकसान टाळावे असे म्हटले होते. अद्याप यावर सेबी किंवा अर्थ मंत्रालयाची कोणती प्रतिक्रिया आली नाही. परंतु ANMI यांनी हे आरोप निराधार ठरवले असून जर गोयंका यांच्याकडे या बाबतीत कोणतेही पुरावे असतील तर त्यांनी सेबी किंवा वित्त मंत्रालयाला सादर करावेत असेही त्यांनी म्हटले आहे.Share market news today)

NSE चा Nifty हा निर्देशांक २०२४ या आर्थिक वर्षात जवळपास २८ टक्के नी वाढला आहे तर दुसरीकडे BSE चा Sensex या निर्देशांकाने याच कालावधीत सुमारे २५ टक्के परतावा दिला आहे. निफ्टी २५० स्मॉल कॅप मध्ये जवळपास ६६-२०० टक्क्यांची वाढ बघायला मिळाली आहे. एका वर्षात झालेली ही वाढ इतर मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत खूपच जास्त आहे.Share market news today)

मंगळवारी NSE चा Nifty १४० अंकांनी घसरून २२३०२ च्या पातळीवर बंद झाला तर BSE sensex ३८४ अंकांनी घसरून ७३,५११ पातळीवर बंद झाला. त्यामुळेच मंगळवारी गुंतवणूकदारांचे जवळपास पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मिडकॅप इंडेक्स १.६% घसरून बंद झाला तर पावर ग्रिड चे शेअर्स ३.६२% घसरले तर दुसरीकडे हिंदुस्तान युनिलिव्हर च्या शेअरमध्ये ५% वाढ बघायला मिळाली.

1 thought on “Share market news today | निवडणूक निकाला आधीच शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी बुडाले.”

Leave a Comment