Shreyas talpade | आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे त्याला गेल्या वर्षी मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान चित्रपटाचे शूटिंग आवरून घरी परतताना त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याची पत्नी दीप्तीने वेळीच प्रसंगावधान दाखवून त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याच्यावर अंधेरीतील एका रुग्णालयात एन्जोप्लास्टी करण्यात आली होती. आता त्याची प्रकृती एकदम उत्तम असून त्याने पुन्हा एकदा आपल्या कामास सुरुवात केली आहे.
Shreyas talpade
अलीकडेच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये shreyas talpade ला त्याच्या प्रकृती बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
तेव्हा त्याने असे सांगितले की की तो धूम्रपान करत नाही किंवा मोठ्या प्रमाणात मद्यपान सुद्धा करत नाही तो क्वचितच महिन्यातून एकदा मद्यपान करतो. तंबाखू सुद्धा खात नाही परंतु त्यावेळेस त्याचे कोलेस्ट्रॉल थोडेसे वाढले होते जे आता कमी झाल्याचे कळते. त्याला डायबिटीस नाही आणि बीपीचा सुद्धा त्रास नाही तर मग हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण काय असा प्रश्न करत तो पुढे म्हणाला की जर एवढी खबरदारी घेऊन सुद्धा असे होत असेल तर यामागे नक्कीच दुसऱ्या काहीतरी कारण असावे.
त्यातच काही दिवसापूर्वी कोरोनावरती लस तयार करणाऱ्या कंपनीने असा खुलासा केला की या लसमुळे काही प्रमाणात माणसाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
आणखी वाचा: प्रसिद्ध वेब सिरीज पंचायत लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला
त्यावेळेस श्रेयस पुढे मुलाखतीत म्हणाला की कोरोनाची लस घेतल्यानंतर मला थोडया फार प्रमाणात थकवा जाणवत होता. यामध्ये काही सत्य असेल किंवा नाही किंवा कदाचित हे कोरोनामुळे झाले असावे किंवा लस घेतल्यामुळे परंतु आपण याचा संबंध नाकारू शकत नाही कारण मला हृदयविकाराचा झटका कोविड नंतरच आलेला आहे.(shreyas talpade)
यानंतर श्रेयस म्हणाला की खरं बोलायचं झालं तर आपण आपल्या शरीरात काय टाकले आहे हे आपल्याच माहीत नाही सगळे सांगत होते तेच आपण केलेला आहे आपण मोठ्या कंपन्यांवर विश्वास ठेवला परंतु या अशा घटना आपण या आधी ऐकलेल्या नाहीत कोरोना नंतरच अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे आपण पाहू शकतो की लोक खेळताना पडत आहेत व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचे झटके येतात या सर्वांमुळे हे खूपच भीतीदायक आहे.
तो पुढे म्हणाला की मला हे सर्व जाणून घ्यायला आवडेल की या लस मुळे आपल्या शरीरात नेमका कोणता बदल झाला परंतु माझ्याकडे पुरेसे पुरावे असल्याशिवाय यावर कोणती विधान करणे गैर ठरेल.(shreyas talpade)
त्याच्या आजारपणात कुटुंबाची व त्यांच्या चाहत्यांची त्याला मोठ्या प्रमाणात साथ मिळाली आहे. त्यांचेही त्याने आभार मानले आहेत.
श्रेयस म्हणाला की मी त्यादरम्यान खूप घाबरलो होतो हे सर्व खूप अनिकेत होते मला माहित होते की मी आरोग्याची चांगली काळजी घेत आहे, माझा आहार चांगला आहे, रोज व्यायाम करतो पण हे माझ्यासोबतच का घडले. साहजिकच या लस चे काही दुष्परिणाम असू शकतात.(shreyas talpade)
मुलाखती दरम्यान तो असेही म्हटला की हृदयविकाराच्या झटक्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदललेले आहे. मी पूर्वीपेक्षा खूप शांत व रिलॅक्स चालू आहे पूर्वी मी घोड्यासारखा पळायचो, प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष द्यायचो. माझे करिअर चांगले करण्यासाठी प्रयत्न करायचो. परंतु या घटनेनंतर मी माझा कुटुंबाला व आरोग्याला प्राधान्य देऊ लागलो आहे. विशेषतः मी माझ्या मुली सोबत जास्त वेळ घालवतो. या घटनेनंतर एक कुटुंब म्हणून आम्ही अधिक जवळ आलो आहोत.
आणखी वाचा: Google ला टक्कर देण्यासाठी ओपनएआय मायक्रोसॉफ्टच्या मदतीने तयार करणार सर्च इंजिन.
श्रेयसच्या करिअर बद्दल बोलायचे झाले तर त्याने अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपट जसे की ओम शांती ओम, गोलमाल चित्रपटाची सिरीज, हाउसफुल २. आँखे हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट होता.(shreyas talpade)
तर मराठी मध्ये पछाडलेला, सावरखेड एक गाव, बाजी यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे.
‘रेशमगाठ’ या चित्रपटासाठी त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मराठी मालिकेसाठी झी मराठी कडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार सुद्धा त्याने २०२१ मध्ये मिळवला आहे. तर २०२२ मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘कोण प्रवीण तांबे’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता याचे नामांकन त्याला मिळाले होते.(shreyas talpade)
त्याचा आगामी चित्रपट ‘वेलकम टू जंगल’ हा यावर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच त्याला अस्वस्थ वाटू लागले होते.