Site icon marathimitranews

dc vs mi | वानखेडेवरील पहिल्या रणसंग्रामानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स शनिवारी, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पुन्हा एकदा एकमेकाना भिडणार

dc vs mi

DC VS MI | आयपीएलच्या २०२४ च्या या हंगामातील वानखेडेवरील पहिल्या रणसंग्रामानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स शनिवारी, २७ एप्रिल रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पुन्हा एकदा एकमेकाना भिडणार आहेत.

मुंबईच्या संघाने या आयपीएलच्या हंगामात आत्तापर्यंत आठ सामने खेळले असून त्यांना केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. मुंबई संघाने खेळलेल्या त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे तर दोन सामन्यात त्यांना पराभव सामना करावा लागला आहे.

या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात मुंबईच्या संघाने २३४ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावसंख्येत रोमारियो शेफर्ड यांने १० चेंडूत केलेल्या ३९ धावांचा समावेश आहे. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने प्रत्युत्तरात २०५ धावा केल्या होत्या, व मुंबई संघाने २९ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्याचा सामनावीर म्हणून रोमारियो शेफर्ड याला घोषित करण्यात आले होते.

जसा जसा हा हंगाम पुढे जात आहे तसतसे दिल्लीच्या संघाने मोठ्या दुखापती, फॉर्ममध्ये नसलेले खेळाडू यामध्ये सुधारणा करत गेल्या काही सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. दिल्लीच्या संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरात विरुद्ध २२४ धावांचे आव्हान दिले होते. यामध्ये कर्णधार ऋषभ पंत याच्या ४३ चेंडू मधील ८८ धावांचे महत्वपूर्ण योगदान होते. हा सामना दिल्लीच्या संघाने चार धावांनी जिंकला होता. दिल्ली संघाचे गेल्या काही सामन्यातील प्रदर्शन बघता दिल्लीचा संघ मुंबई संघावरती वरचढ ठरेल असे वाटते.

दुसरीकडे नवीन कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई संघासाठी आयपीएलचा हा हंगाम भयपटच ठरलेला आहे. मुंबई संघाला त्यांच्या शेवटचा सामन्यात गुणतालिकेत प्रथम क्रमांक वर असलेल्या राजस्थान संघाकडून नऊ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अश्याच नवनवीन ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICKकरा.

दिल्ली कॅपिटल संघाला काही सामन्यांपूर्वी दुखापतीचे ग्रहण लागत होते आधी डेव्हिड वॉर्नर त्यानंतर मिचेल मार्श. डेव्हिड वॉर्नर दुखापतीतून सावरला असला तरी त्याला त्याचे संघातील स्थान गमवावे लागले आहे. जॅक फ्रेझर मॅकगर्ग याने त्याला मिळालेल्या संधीचा फायदा उचलला आहे. तर दिल्लीच्या संघाने दुखापतग्रस्त मार्शच्या जागी अफगाणिस्तानचा खेळाडू गुलब्दीन नईब याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. दिल्लीच्या संघाने शेवटच्या सामन्यात रसिक सलाम याला प्रभावशाली खेळाडू म्हणून संघात सामील करून घेतले होते.

तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा संघ संघर्ष करताना दिसून येत आहे त्यांना शेवटच्या सामन्यात मोठ्या मानहानीकारक प्रभावाला सामोरे जावे लागले होते. शेवटच्या सामन्यात नेहाल वडेराने त्याला मिळालेल्या संधीचा चांगला फायदा उचलला आहे. त्यामुळे त्याचे संघातील स्थान कायम राहण्याची शक्यता आहे.

तुम्हाला माहिती आहे का:

DC VS MI  HEAD TO HEAD:

आयपीएल मध्ये आतापर्यंत दिल्ली व मुंबई हे संघ एकमेकांविरुद्ध ३४ सामने खेळले आहेत. यापैकी दिल्ली संघाने १५ सामन्यात तर मुंबई संघाने १९ सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबई विरुद्ध दिल्ली संघाची सर्वोच्च धावसंख्या २१३ तर दिल्ली विरुद्ध मुंबईची सर्वोच्च धावसंख्या २३४ आहे जी सात एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात करण्यात आली होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली संघाने २०५ धावा केल्या होत्या.

दिल्ली व मुंबई संघाचे अरुण जेटली स्टेडियम दिल्ली या मैदानावरील आकडे 

दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे ११ सामने खेळले आहेत. या खेळल्या गेलेल्या अकरा सामन्यांपैकी सहा सामन्यात दिल्लीच्या हंगामी बाजी मारली आहे पाच सामन्यात मुंबई इंडियन्स संघ विजय ठरला आहे

DC VS MI  Pitch Report:

अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे या मोसमात आतापर्यंत दोन सामने खेळण्यात आले आहेत. या दोन सामन्यात मिळून आतापर्यंत ७९.१ षटकात ९०९ धावा झाल्या आहेत. अशाप्रकारे दिल्लीतली ही खेळपट्टी फलंदाजांना स्वर्गीय आहे त्यामुळे या सामन्यातही मोठ्या धावसंख्या उभारल्या जातील अशी अपेक्षा आहे.

DC VS MI  सामना कधी होणार:

शनिवार, २७ एप्रिल, २०२४ दुपारी 3:30 वाजता.

DC VS MI  सामना कुठे होणार:

अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

DC VS MI सामना थेट प्रक्षेपण:

DC VS MI या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

संभाव्य संघ:

DC: पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर मॅकगर्क, शाई होप, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार

MI: रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

Exit mobile version