Site icon marathimitranews

t20 world cup | टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर.

T20 world cup

T20 world cup | आयपीएल संपल्यानंतर एक जून पासून चालू होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्य संघाची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांच्यात झालेल्या अनौपचारिक बैठकीनंतर भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघामध्ये काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत.

आयपीएल मधील खराब प्रदर्शनानंतर हार्दिक पांड्याची T20 संघासाठी निवड होणार की नाही याची जोरदार चर्चा होती परंतु निवड समितीने हार्दिक पांड्यावर विश्वास दाखवला असून त्याची संघात निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर त्याला संघाचा उप कर्णधार सुद्धा करण्यात आले आहे.(t20 world cup)

राष्ट्रीय निवड समितीने काही कठोर निर्णय घेतले असून यामध्ये सर्वात मोठा निर्णय म्हणजे विकेटकीपर फलंदाज के एल राहुल याला संघात स्थान न देण्याचा, निवड समितीने विकेट कीपर म्हणून प्रथम पसंती ऋषभ पंत व संजू सॅमसन यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तसेच युवा सलामीवीर शुभमन गिल यालासुद्धा पंधरा खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही, त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे त्यासोबतच रिंकू सिंग, खलील अहमद व आवेश खान यांचा समावेश राखीव खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे. या राखीव खेळाडूंचा वापर मुख्य स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाली किंवा अन्य कोणत्या कारणामुळे तो चांगला बाहेर गेला तर या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते.(t20 world cup)

अश्याच नवनवीन ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICKकरा.

एक जून पासून सुरु होणारा टी ट्वेंटी वर्ल्ड कप वेस्टइंडीज व अमेरिकेमध्ये संयुक्तपणे खेळवला जाणार आहे. यासाठी संघनिवड करण्यासाठी आयसीसीने एक मेपर्यंत ची सर्वांना वेळ दिली होती त्यानुसार आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी एकूण २० संघ पात्र ठरले असून भारतीय संघ अ गटात आहे, भारतीय संघासोबत या गटात पाकिस्तान आयर्लंड कॅनडा व अमेरिका या संघांचा समावेश आहे. भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये नऊ जून रोजी न्यूयॉर्क येथे सामना होणार आहे.

भारतीय संघामध्ये कर्णधार रोहित शर्मा यासोबत उपकर्णधार म्हणून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची निवड करण्यात आली तर फलंदाजांमध्ये या दोन खेळाडू व्यतिरिक्त युवा सलामी वीर यशस्वी जयस्वाल, अनुभवी फलंदाज विराट कोहली, सूर्यकुमार यादव या फलंदाजांची निवड करण्यात आली आहे.(t20 world cup)

तर यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत व संजू सॅमसन यांच्यावर निवड समितीने विश्वास दाखवला आहे. ऋषभ पंत हा डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या अपघातानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करत आहे. ऋषभ पंत याने आतापर्यंत या आयपीएल हंगामात ११ सामन्यांमध्ये १५८.५७ च्या स्ट्राईक रेट ने धावा केल्या आहेत तर दुसरीकडे संजू सॅमसन याने दाखवलेल्या सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे संघात निवड करण्यात आली आहे.

फिरकी गोलंदाजांमध्ये रवींद्र जडेजा अक्षर पटेल व कुलदीप यादव या तीन त्रिकुटांसोबत युझवेंद्र चहल याचे सुद्धा संघात पुनरागमन झाले आहे. चहल याने शेवटचा टी ट्वेंटी सामना ऑगस्ट २०२३ मध्ये खेळला होता. त्याने या आयपीएल हंगामात ९ च्या इकॉनोमी रेटने तेरा गडी बाद केले आहेत.(t20 world cup)

चेन्नई सुपर किंग संघासाठी धमाकेदार फलंदाजी करणारा शिवम दुबे याची सुद्धा संघात निवड करण्यात आली आहे.

वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व अर्शदीप सिंग यांचे निवड करण्यात आली आहे.(t20 world cup)

भारतीय संघ- 

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, शिवम दुबे, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदिप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

राखीव खेळाडू- आवेश खान,शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद.

T20 World cup साठी पात्र ठरलेले संघ: 

अमेरिका, वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्युझीलँड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेदरलँड, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.

T20 वर्ल्ड कप मधील चार गट

अ – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका

ब – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

क – न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

ड – बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेदरलँड्स, नेपाळ

भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी न्यूयॉर्क येथील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये होईल. त्यानंतर ९ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यासोबत याच मैदानावर सामना होईल व पुढील सामना १२ जून रोजी याच ठिकाणी अमेरिका संघाशी होईल. त्यानंतर १५ जून रोजी लॉडरहिल्ल येथे कॅनडा संघासोबत सामना होईल.(t20 world cup)

वर्ल्ड कप मधील पहिला सामना यजमान अमेरिका व कॅनडा यांच्यामध्ये एक जून रोजी ग्रँड प्रेअरी क्रिकेट स्टेडियम,डल्लास येथे खेळवला जाईल. व अंतिम सामना २९ जून रोजी खेळवला जाईल.

 

Exit mobile version