Womens t20 world cup | आयसीसी ने आज महिला टी ट्वेंटी विश्वचषक २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी होणारी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये खेळवली जाणार आहे. बांगलादेश या स्पर्धेचे दुसऱ्यांदा यजमानपद भूषवत आहे याआधी २०१४ मध्ये सुद्धा बांगलादेश ने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेसाठी एकूण दहा संघ पात्र ठरणार आहेत या दहा संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ चार गट सामने खेळतील प्रत्येक गटातील प्रथम दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. उपांत्य फेरीचे सामने १७ व १८ ऑक्टोंबर रोजी खेळवले जाणार आहेत. तर २० ऑक्टोंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल.
सध्या अबुधाबी मध्ये महिला T20 विश्वचषकासाठी क्वालिफायर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दहा संघ सहभागी झाले असून या दहा संघांमधून दोन संघ या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील. हे दोन संघ कोणते आपल्याला सात मे रोजी कळेल.(womens t20 world cup)
भारतीय महिला संघाला अ गटात स्थान देण्यात आला असून भारतीय संघासोबत अ गटात असणारे दुसरे संघ म्हणजे पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान, सहा वेळेचे विश्वविजेते ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड व क्वालिफायर १ संघ तर ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्टइंडीज, बांगलादेश, आणि क्वालिफायर २ संघ या संघांचा समावेश आहे.
३ ऑक्टोंबर रोजी या स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ढाका येथे खेळवला जाईल. त्याच दिवशी दुपारी बांगलादेश यांचा सामना क्वालिफायर २ या संघाशी ढाका येथे होईल.(womens t20 world cup)
भारतीय महिला संघाचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध ४ ऑक्टोंबर ला सिल्हेट येथे खेळवला जाईल. त्यानंतर भारतीय संघाचा दुसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाशी ६ ऑक्टोंबर रोजी होईल. भारतीय संघाचे सर्व सामने सिल्हेट येथेच होतील. तर तिसरा सामना ९ ऑक्टोंबर रोजी क्वालिफायर १ संघाशी होईल. त्यानंतर १३ ऑक्टोंबर रोजी भारतीय संघाचा सामना गतवेळीचे विजेते ऑस्ट्रेलिया संघाशी होईल.(womens t20 world cup)
या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना १७ ऑक्टोंबर तर दुसरा उपांत्य सामना १८ ऑक्टोंबर रोजी खेळवला जाईल. तर अंतिम सामना २० ऑक्टोबर रोजी ढाका येथे खेळवला जाईल.
या स्पर्धेमध्ये एकूण १९ दिवसांमध्ये २३ सामने खेळले जातील. जर कोणताही व्यत्यय आला तर उपांत्य व अंतिम सामन्यासाठी रिझर्व्ह दिवस ठेवण्यात आले आहेत.
आत्तापर्यंत या स्पर्धेचे आठ वेळा आयोजन करण्यात आले आहे त्यापैकी पहिल्या स्पर्धेत इंग्लंड तर पाचव्या स्पर्धेत वेस्टइंडीज संघ विजय ठरला होता तर उर्वरित सहा ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली आहे. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिका मध्ये खेळवल्या गेलेल्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाचा १९ धावांनी पराभव करून विक्रमी सहाव्यांदा विश्वविजेतेपद जिंकले होते.(womens t20 world cup)
Womens t20 world cup groups
गट अ: ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, क्वालिफायर १ संघ
गट ब: दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, क्वालिफायर संघ २
महिला T20 विश्वचषक वेळापत्रक
३ ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ढाका
३ ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध क्वालिफायर २, ढाका
४ ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर १, सिल्हेट
४ ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
५ ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
५ ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, ढाका
६ ऑक्टोबर: न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर १, सिलहट
६ ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान, सिल्हेट
७ ऑक्टोबर: वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालिफायर २, ढाका
८ ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, सिल्हेट
९ ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
९ ऑक्टोबर: भारत विरुद्ध क्वालिफायर १, सिलहट
१० ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर २, ढाका
११ ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
११ ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर १, सिल्हेट
१२ ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
१२ ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ढाका
१३ ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
१३ ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिल्हेट
१४ ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर २, ढाका
१७ ऑक्टोबर: पहिली उपांत्य फेरी, सिलहट
१८ ऑक्टोबर: दुसरी उपांत्य फेरी, ढाका
२० ऑक्टोबर: अंतिम सामना, ढाका
भारतीय संघाने या स्पर्धेचे २०१६ मध्ये यजमानपद भूषवले होते. भारतीय संघाला अद्याप एकदाही ही स्पर्धा जिंकता आली नाही तर केवळ एक वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा ८५ धावांनी पराभव केला होता.(womens t20 world cup)
आणखी वाचा: