vicky kaushal new movie | विकी कौशल चा आगामी चित्रपट छावा च्या सेट वरील त्याचा लुक सोशल मीडियावर व्हायरल

vicky kaushal new movie: विकी कौशल चा आगामी चित्रपट छावा च्या सेट वरील त्याचा लुक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे लांब दाढी व लांब केसांसह विकीचा डॅशिंग लुक पाहून चाहत्यांना देखील त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.(vicky kaushal new movie)

बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने आपली प्रतिभा व अभिनयाच्या कौशल्यावर फार कमी वेळात बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपला मजबूत ठसा उमटवला आहे. विकी कौशल सध्या त्याच्या आगामी चित्रपट छावा यामुळे खूप चर्चेत आहे. आता छावाच्या सेट वरून विकी कोशलच्या डॅशिंग लुकचे काही फोटो व्हायरल झालेत जे पाहून त्याच्या  चाहत्यांची उत्सुकता गगनाला भिडली आहे कारण वायरल झालेल्या फोटोमध्ये विकी कौशल मोठी दाढी मोठे केस असलेल्या अवतारात असून त्याने कुर्ता व धोती घातलेले दिसत आहे.

छावाचा सेटवरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये विकी कौशलचा अवतार बघण्यासारखा आहे मोठी दाढी, लांब केस गळ्यात कवड्याच्या माळा आणि कुर्ता धोती घालून अभिनेता जंगलात फिरताना दिसत आहे छावाच्या सेट वरील विकी कौशल च्या छायाचित्रांनी इंटरनेटवर खळबळ उडून दिली आहे. प्रत्येक जण त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल व त्याच्या वायरल लूक बद्दल बोलताना दिसत आहे.(vicky kaushal new movie)

रिपोर्टनुसार विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र व स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र छावाच्या कथेबाबत निर्मात्यांकडून कोणती पुष्टी करण्यात आलेली नाही.

vicky kaushal movies: 

विकी कौशल च्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याचा शेवटचा सिनेमा सॅम बहादुर होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी विकीचे खूप कौतुक झाले होते सॅम बहादुर नंतर विकी कौशलच्या बकेट लिस्ट मध्ये “छावा” आणि संजय लीला भन्साळीचा “लव्ह अँड वॉर” या चित्रपटांचा समावेश आहे.

vicky kaushal new movie

छावा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते लक्ष्मण उत्तेकर यांनी दिग्दर्शित केला आहे जे मिमी(२०२१), लुका छूपी(२०१९) या त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी ओळखले जातात.(vicky kaushal new movie)

अश्याच नवनवीन ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा. 

दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर व अभिनेता विकी कौशल यांनी यापूर्वी जरा हटके जरा बचके (२०२३) या चित्रपटात एकत्र काम केलेले आहे, या चित्रपटात विकी सोबत सारा अली खान, सुष्मिता मुखर्जी, आकाश खुराना, व अतुल तिवारी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

विकी चा आगामी चित्रपट छावा हा एक ऐतिहासिक चित्रपट असल्याचे कळते. या चित्रपटामध्ये तो अभिनेत्री रश्मिका मंदांना सोबत काम करताना दिसणार आहे.

vicky kaushal new movie charactor: 

रिपोर्ट नुसार विकी कौशल मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात संभाजी महाराजांचे शौर्य बलिदान आणि युद्ध काळातील रणनीती यांचा समावेश असणे अपेक्षित आहे.(vicky kaushal new movie)

विकी कौशल बरोबर या चित्रपटात प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत रश्मिका मंदाना दिसून येणार आहे. तिचा सर्वात अलीकडे आलेला चित्रपट म्हणजे  ‘Animal’ ज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर मोठा धुमाकूळ घातला होता. या ब्लॉकबस्टर चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीला सर्वत्र प्रशंसा मिळाली आहे. विकी कौशलने सांगितले होते की त्याला ॲक्शन हिरो बनायचे आहे.(vicky kaushal new movie) 

छावा या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर करत आहेत या चित्रपटात रश्मिका “महाराणी येसूबाई भोसले” यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटात अक्षय खन्ना सुद्धा असून ते औरंगजेबाची भूमिका साकारताना दिसणार आहेत तसेच या चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि प्रदीप सिंह रावत यासारख्या दिग्गज कलाकारांचा सुद्धा समावेश आहे.

दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांची महाराणी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेसाठी रश्मिका ही पहिली पसंती होती. सध्या ती या व्यक्तीला मूर्त स्वरूप देण्यासाठी आवाजाचे प्रशिक्षण घेत आहे तसेच विकी कौशल तलवारबाजी घोडेस्वारी व तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत आहे.(vicky kaushal new movie)

छावा हा “Maddock फिल्मस्” चा आतापर्यंतचा सगळ्यात महागडा व मोठा प्रोजेक्ट असण्याची शक्यता आहे.  आतापर्यंत त्यांनी हिंदी मिडीयम, लुका चुप्पी व भेडिया यासारख्या कमी बजेटच्या चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. या चित्रपटामुळे मॅडॉक फिल्म ऐतिहासिक चित्रपट श्रेणीमध्ये सुद्धा प्रवेश होत आहे. तसेच विकी कौशल व रश्मिका मंदाना प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत.

छावा चित्रपटातून विकी पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात काम करत आहे त्यामुळे या चित्रपटातील व्यक्तिरेखेला साजेशी भूमिका करण्यासाठी विकी कोणती कसर सोडताना दिसून येत नाही अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान या चित्रपटाविषयी विकी म्हणाला होता की “हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे आणि ही माझी ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची पहिलीच वेळ आहे त्यात भरपूर ॲक्शन आणि भरपूर ड्रामा तुम्हाला बघायला मिळणार आहे.”(vicky kaushal new movie)

vicky kaushal new movie release date: 

छावा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी सिनेमा गृहात प्रदर्शित होणार आहे.

1 thought on “vicky kaushal new movie | विकी कौशल चा आगामी चित्रपट छावा च्या सेट वरील त्याचा लुक सोशल मीडियावर व्हायरल”

Leave a Comment