Site icon marathimitranews

whatsapp new features | Whatsapp च्या ह्या ८ नवीन फीचर्स आणि ट्रिक्स बद्दल तुम्हाला माहीत होत का ?

whatsapp new features

whatsapp new features: आज मी तुम्हाला सांगणार आहे. व्हॉट्सअँपच्या नवीन ट्रिक्स आणि फीचर्स बद्दल. या ब्लॉगमध्ये आपण व्हॉट्सअँपच्या नवीन फीचर्स व ट्रिक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

यामध्ये दोन तीन ट्रिक्स तर अशा असणार आहेत त्या तुम्हाला माहितीही नसतील त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.

Text Styles and Fonts

सर्वात आधी जर तुम्हाला नॉर्मल टेक्स्टला बोल्ड करायचे असेल, italics करायचे असेल किंवा फाँट बदलायचा असेल तर तुम्हाला त्याच्या आधी किंवा नंतर काही ना काही करावे लागते हे सर्व मी तुम्हाला सांगणार नाही, तर त्याचा स्क्रीन शॉट मी तुम्हाला खाली देत असून हे नक्की एकदा वापरून बघा. यामध्ये बुलेट पॉईंट्स नंबर लिस्ट हे सर्व सुद्धा करता येते त्यामुळे हे नक्की वापरून बघा. व आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा कि तुम्हाला कसे वाटले.(whatsapp new features) 

स्वतः च्या फोटोचे स्टिकर बनवणे

आता तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तुमच्या किंवा तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्या फोटोचे स्टिकर बनवू शकता. यासाठी एक खूप सोपी पद्धत असून, सर्वात आधी इमोजी आयकॉन सिलेक्ट करा त्यानंतर स्टिकर मध्ये जावा त्यानंतर क्रियेट स्टिकर व त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही फोटो सिलेक्ट करा त्यानंतर काही क्षणात तुमचा स्टिकर बनलेला तयार असेल एवढेच नाही तर तुम्ही त्या टेक्स्ट ला कलर सुद्धा ऍड करू शकता. जर वेगवेगळ्या दोन्ही इमेजेस असतील तर त्या सुद्धा एकत्रित करून त्याचे स्टिकर तुम्ही बनवू शकता.

whatsapp new features पिन मेसेज

पिन मेसेज हे एक खूप महत्त्वाचे फीचर्सस् आहे कारण बऱ्याच वेळा काही व्यक्ती किंवा काही ग्रुप यामधील मेसेज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात व ते तुम्हाला केव्हाही अचानक लागू शकतात, तर आता तुम्ही ते मेसेज व्हॉट्सअँपमध्ये पिन करू शकता त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचा असलेला मेसेज तुम्ही क्षणात शोधू शकता.(whatsapp new features) 

सर्च चॅट

सर्च चॅट हे व्हॉट्सअँप मधील एक महत्वाचे फीचर्स आहे. दररोज आपण अनेक लोकांना मेसेज पाठवत असतो किंवा बरेच वेळा आपल्याला महत्त्वाचे मेसेजेस येत असतात. आणि जर हे मेसेजेस सहा महिने किंवा वर्ष किंवा दोन वर्ष जुने असतील तर तुम्ही काय करणार तर त्यासाठी एक महत्त्वाचे फिचर आहे व्हॉट्सअँप मध्ये आता तुम्ही तारीख व वर्षानुसार एखादा जुना मेसेज शोधू शकता.

आयपी ऍड्रेस

व्हॉट्सअँप मध्ये सिक्युरिटी आणि प्रायव्हसी खूप महत्त्वाचे आहे. आणि हे प्रायव्हसी व सिक्युरिटी मजबूत करण्यासाठी व्हॉट्सअँप नवीन नवीन फीचर्स तयार करत आहे. आतापर्यंत तुम्ही जेव्हा व्हॉइस कॉल करत होता तेव्हा तुम्ही तुमचा आयपी ऍड्रेस हाईड करू शकत होता परंतु आता अजून एक नवीन फीचर्स लॉन्च करण्यात आले आहे.  ज्यानुसार तुम्ही आता एखाद्या लिंकला शेअर करताना त्या लिंकच्या प्रीव्ह्यू मधून तुमचा आयपी ऍड्रेस सुद्धा हाईड करू शकता.(whatsapp new features) 

हे चालू करण्यासाठी सर्वात आधी सेटिंग मध्ये जावा त्यानंतर प्रायव्हसी मध्ये जाऊन त्यानंतर सर्वात शेवटी असलेले ऑप्शन “Advanced” मध्ये जावा. त्यानंतर तिथे आलेल्या दोन्ही पर्यायांना बंद करा.

अश्याच नवनवीन ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा.

HD क्वालिटी स्टेटस

आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा इतरांना HD क्वालिटी फोटो वगैरे पाठवू शकत होता परंतु तुम्हाला HD क्वालिटी व्हाट्सअप स्टेटस ठेवता येत नव्हते तर चला जाणून घेऊया HD क्वालिटी स्टेटस व्हॉट्सअँप मध्ये कसा ठेवणार

व्हॉट्सअँप मध्ये एक फीचर आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला मेसेज पाठवू शकता आता प्रथम त्या चॅटला जावा तिथून तुम्हाला जो फोटो व्हॉट्सअँप स्टेटसला ठेवायचा आहे तो फोटो HD क्वालिटी मध्ये सेंड करा. त्यानंतर तो फोटो सेव करा. आणि मग आता तो सेव्ह केलेला फोटो व्हॉट्सअँप स्टेटसला ठेवा. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या स्टेटसला HD फोटोज ठेवू शकता.(whatsapp new features) 

चॅट लॉक

बऱ्याच वेळा आपण आपले काही चॅट प्रायव्हसीच्या कारणाखाली लॉक करून ठेवतो पण बऱ्याच वेळा असे होते की आपण त्या चॅट साठी ठेवलेला पिन किंवा पासवर्ड विसरतो त्यामुळे तो चॅट उघडणे अवघड होऊन जाते. तर हे चॅट अनलॉक करण्यासाठी खालील सेटिंग चा वापर करा.

सर्वप्रथम सेटिंग मध्ये जावा त्यातून प्रायव्हसी मध्ये जावा त्यानंतर लॉक मध्ये जा त्यानंतर तिथे तुम्हाला अनलॉक अँड क्लिअर लॉक चॅट यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तो तुम्हाला फिंगर प्रिंट साठी विचारेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे प्रायव्हेट चॅट अनलॉक करू शकता.(whatsapp new features) 

व्हॉट्सअँप वेब शॉर्टकट कीज

व्हॉट्सअँप वेब चा बरेच जण वापर करतात. तर त्यासाठी काही शॉर्टकट की आल्या आहेत आम्ही तुम्हाला सांगतो उदाहरणासाठी जर तुम्हाला एखादा मेसेज किंवा चॅट सर्च करायचा असेल तर तुम्ही “ctrl+alt+/” या की चा वापर करू शकता. दहा-बारा वेगवेगळे नवीन शॉर्टकट्स की आल्या आहेत त्या मी खाली दिलेल्या आहेत.(whatsapp new features) 

आता मित्रांनो व्हॉट्सअँप तर दर पंधरा-वीस दिवसांनी नवनवीन फीचर्स हे ऍड करत असते. त्यामुळे अशाच नवनवीन फीचर्स व अपडेट साठी आजच आमचा व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करायला विसरू नका

Exit mobile version