अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट देणाऱ्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) नेतृत्व करणारे एनसीबीचे उपमहासंचालक (डीडीजी) संजय कुमार सिंग यांनी स्वेच्छानिवृत्ती सेवा (व्हीआरएस) निवडली आहे. संजय कुमार सिंग यांनी “वैयक्तिक कारण” सांगून सेवेतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, सिंग यांनी जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्या अधिकृत निवृत्तीच्या फक्त ८ महिने आधी VRS घेतली आहे.(aryan khan case)
aryan khan case | आर्यन खान ड्रग्स प्रकरण
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीचे प्रमुख असलेले एनसीबीचे उपमहासंचालक (डीडीजी) संजय कुमार सिंग यांनी निवृत्तीच्या केवळ ८ महिने आधी व्हीआरएस घेतला आहे. ओडिशा केडरमधील १९९६ – बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी असलेले संजय सिंग हे सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) दक्षिण-पश्चिम आणि दक्षिणेकडील प्रदेशाचे DDG म्हणून प्रमुख आहेत.(aryan khan case)
एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे एनसीबीच्या मुंबई कार्यालयाचे प्रमुख असताना यांच्याविरुद्धही दाखल झालेल्या दोन ड्रग प्रकरणांची चौकशी करताना कथित अनियमिततेच्या प्रकरणाची सुद्धा ते चौकशी करत आहेत.
संजय सिंग यांनी PTI ला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सेवेतून (व्हीआरएस) निव्वळ “वैयक्तिक कारणास्तव” स्वेच्छानिवृत्ती मागितली होती आणि त्यासाठी त्यांनी २९ फेब्रुवारी २०२४ ला अर्ज केला होता. त्याचा VRS एप्रिल ३० पासून प्रभावी होणार आहे. ते जानेवारी २०२५ मध्ये निवृत्त होणार होते.(aryan khan case)
“मी ३० एप्रिलपर्यंत काम करत राहीन,”अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय सिंग यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (एसआयटी) आर्यन खान आणि इतर पाच जणांना मे २०२२ मध्ये ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात त्यांच्याविरुद्ध “पुरेशा पुराव्यांचा अभाव” दाखवून क्लीन चिट दिली होती.
आर्यन खान आणि इतर ५ जणांना एनसीबीने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईत समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ड्रग्जच्या आरोपाखाली अटक केली होती.जानेवारी २०२१ मध्ये एनसीबीमध्ये रुजू होण्यापूर्वी ते ओडिशाचे एडीजीपी होते. या काळात त्यांनी राज्य पोलिसांच्या अमली पदार्थांविरुद्धच्या टास्क फोर्सचे नेतृत्व केले. ते भुवनेश्वरचे पोलीस आयुक्तही राहिले आहेत.(aryan khan case)
अश्याच ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा.
संजय सिंग यांनी यापूर्वी सीबीआयमध्येही काम केले आहे. संजय सिंग २००८ ते २०१५ दरम्यान सीबीआयमध्ये होते. या काळात त्यांनी अनेक मोठी प्रकरणे हाताळली. ज्यामध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्यावरील भ्रष्टाचाराचा खटला, २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समधील भ्रष्टाचार, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) मधील अनियमितता आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मधील भरती घोटाळा यासारख्या अनेक प्रकरणांचा समावेश होतो.
संजय सिंग यांच्या विषयी थोडक्यात माहिती:
- संजय सिंग हे NCB (नार्कोटिक कंट्रोल ब्युरो) (HQ), नवी दिल्ली येथे भारतीय उपमहासंचालक (OPS) आहेत.
- ओरिसा केडर १९९६ च्या बॅचचे ते भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत.
- ऑक्टोबर १९९९ मध्ये त्यांनी ओडिशा पोलिसात पोलिस अधीक्षक म्हणून आपल्या पोलीसी कामास सुरवात केली. त्यांच्या या कार्यकाळात त्यांची ओडिशातील ड्रग टास्क फोर्स (DTF) चे अतिरिक्त महासंचालक (ADG) म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती.(aryan khan case)
- त्यानंतर त्यांची भुवनेश्वरचे आयुक्त आणि ओडिशा पोलिसांच्या डविन सिटीचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
- संजय सिंग यांनी २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झालेल्या घोटाला प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणूनही काम केले आहे.
- ३१ जानेवारी २०१० रोजी त्यांची पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोनती झाली.
- जानेवारी २०२१ मध्ये संजय कुमार सिंग केंद्रीय एजन्सीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. त्यानंतर त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये उपमहासंचालक (DDG) म्हणून नियुक्ती झाली.(aryan khan case)
- नोव्हेंबर २०२१ मध्ये, आर्यन खान ड्रग प्रकरणात त्यांनी NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची जागा घेतली. आर्यन खानच्या प्रकरणासोबतच अन्य पाच प्रकरणे संजय सिंग यांच्याकडे वर्ग करण्यात आली.
काय आहे आर्यन खान ड्रग्स प्रकरण:
आर्यन खानला एनसीबीच्या पथकाने २ ऑक्टोबरच्या २०२१ च्या रात्री मुंबईतील क्रूझ शिप टर्मिनलमधून पकडले होते. आर्यन खानसोबत त्याचा मित्र अरबाज मर्चंटलाही एनसीबीने अटक केली होती. या ड्रग्ज प्रकरणात एकूण ८ जणांना अटक करण्यात आली होती. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती अशी माहिती एनसीबीने दिली आहे. आर्यन खान या पार्टीत सहभागी होणार होता.तर त्याचा मित्र अरबाज मर्चंटच्या शूजमधून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. मात्र, एनसीबीला आर्यनजवळ कोणतेही ड्रग्स सापडले नाही.(aryan khan case)
आर्यन काही दिवस एनसीबीच्या ताब्यात होता. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा जामीन अर्ज २ वेळा फेटाळण्यात आला आणि त्यानंतर त्याची रवानगी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. त्यानंतर शेवटी २८ ऑक्टोबरला आर्यनला जामीन मिळाला.आर्थर रोड जेलमध्ये तब्बल २८ दिवस राहिल्यानंतर आर्यन खानची सुटका करण्यात आली होती.
NCB विषयी थोडक्यात माहिती:
अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, १९८५ जो १४ नोव्हेंबर १९८५ पासून अंमलात आला, या कायद्याअंतर्गत भारत सरकारने १७ मार्च १९८६ रोजी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोची स्थापना केली.
या तरतुदीच्या अधीन, केंद्र सरकारच्या पर्यवेक्षण आणि नियंत्रणाच्या अधीन असलेली ही संस्था केंद्र सरकारच्या अधिकारांचा आणि कार्यांचा वापर करते.(aryan khan case)
सध्या अंमलात असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय करार आणि प्रोटोकॉल अंतर्गत बेकायदेशीर ड्रग्स वाहतुकीच्या विरोधात उपाययोजनांच्या संदर्भात दायित्वाची अंमलबजावणी करणे हे या संस्थेचे प्रमुख कार्य आहे.
ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीस प्रतिबंध व त्यावर सार्वत्रिक कारवाई करण्यासाठी परदेशातील संबंधित अधिकारी आणि संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थांना सहाय्य करणे हे सुद्धा या संस्थेचे कार्य आहे.
अंमली पदार्थांच्या गैरवापराशी संबंधित बाबींच्या संदर्भात इतर संबंधित मंत्रालये, विभाग आणि संस्थांनी केलेल्या कारवाईचे समन्वय साधने.(aryan khan case)
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ही ड्रग्ज आणि अंमली पदार्थ विरोधी भारतातील सर्वोच्च समन्वय संस्था आहे. ही त्याच्या झोन आणि सब-झोनद्वारे अंमलबजावणी एजन्सी म्हणून देखील कार्य करते. झोन आणि सब-झोन्स अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ जप्ती, अभ्यास ट्रेंड, मोडस ऑपरेंडी, गुप्त माहिती गोळा आणि प्रसारित करतात आणि सीमाशुल्क, राज्य पोलीस आणि इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींच्या जवळच्या सहकार्याने हे काम करतात.
NCB चे ब्रीदवाक्य
बुद्धिमत्ता, अंमलबजावणी, समन्वय
NCB चे मिशन
ड्रग्सचा गैरवापर आणि अवैध वाहतूक प्रतिबंधित आणि लढा
NCB चे ध्येय
अमली पदार्थमुक्त समाजासाठी प्रयत्न करा