CSK vs SRH | आज आयपीएलच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना पॅट कमिन्सच्या हैद्राबाद संघाशी

CSK vs SRH | आज आयपीएलच्या ४६ व्या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना पॅट कमिन्सच्या हैद्राबाद संघाशी होणार आहे.

आतापर्यंत या आयपीएलच्या हंगामात चेन्नई संघाने ८ सामने खेळले असून त्यापैकी त्यांना ४ सामन्यात विजय तर ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नई संघाला त्यांनी खेळलेल्या त्यांच्या शेवटच्या ५ सामन्यापैकी ३ सामन्यात पराभव पत्करावा लागलेला आहे.

त्यांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात लखनऊ संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर ६ गडी राखून पराभव केला आहे.चेन्नईचा संघ गुणतालिकेत सध्या ६व्या क्रमांकावर आहे.

तर दुसऱ्या बाजूला हैद्राबाद संघ या हंगामात चांगला खेळ करताना दिसत आहेत. हैदराबाद संघाने या हंगामात ८ सामने खेळले असून त्यापैकी ५ सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे, व ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. हैद्राबाद संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात बंगलोर संघाने त्यांना घरच्या मैदानावर पराभूत केले होते

या दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ५ गडी गमावून १६५ धावा केल्या होत्या,प्रत्युत्तरात हैद्राबाद संघाने हे आव्हान १८.१ षटकांमध्ये च पूर्ण केले होते. १२ चेंडूत ३७ धावा करणारा अभिषेक शर्मा या सामन्याचा सामनावीर ठरला होता.

या आयपीएलच्या हंगामात सर्वच संघांनी मोठ्या धावसंख्या उभारल्या आहेत. ज्यामध्ये हैद्राबाद संघ आघाडीवर आहे. हैद्राबाद चे सलामीवीर ट्राविस हेड व अभिषेक शर्मा यांनी पॉवरप्ले मध्ये आक्रमक सुरुवात केली आहे. ज्यामुळे त्यांच्या संघाला प्रत्येक सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले आहे.

अश्याच नवनवीन ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICKकरा.

यावर्षी चेन्नईचा संघ नवीन कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळत आहे. त्यांनी घरच्या मैदानावर आतापर्यंत ३ सामन्यात विजय मिळवला आहे.

चेन्नई at चेपौक

चेन्नईचे मैदान जे फिरकी गोलंदाजांसाठी ओळखले जाते,परंतु अद्याप पर्यंत चेन्नई संघाला या हंगामात त्यांचा फायदा उचलता आला नाही. ज्यामुळे त्याचा दबाव त्यांच्या इतर गोलंदाजांवर आला आहे.

या हंगामात चेन्नई संघाने येथे आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. या ४ सामन्यापैकी ३ सामन्यात चेन्नई संघ विजयी ठरला आहे तर केवळ एका सामन्यात त्यांना लखनौ संघाने त्यांना पराभूत केले आहे.

पहिल्या सामन्यात चेन्नईने बेंगलोर संघाचा ६ गडी राखून पराभव केला होता,त्यानंतर झालेल्या सामन्यात गुजरात संघाचा ६३ धावांनी चेन्नई संघाने पराभव केला. तिसऱ्या सामन्यात त्यांनी कोलकाता संघाचा ७ गडी राखून पराभव केला. ४थ्या v इथे खेळलेल्या शेवटच्या सामन्यात चेन्नई संघाला लखनऊ संघाकडून ६ गडी राखून पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्याचा सामनावीर म्हणून शतकवीर मार्कस स्टोईनिस ला घोषित करण्यात आले होते.

तुम्हाला माहिती आहे का:

  • सनरायझर्स हैदराबाद संघाने एम ए चिदंबरम स्टेडियमवर कधीही चेन्नई सुपर किंग्स संघाला पराभूत केले नाही.
  • टी नटराजनने या मोसमात डेथ ओवर्स मध्ये ९.३० सरासरीने गोलंदाजी केली आहे आणि या षटकामध्ये ७ विकेट्सही घेतल्या आहेत.

CSK vs SRH HEAD TO HEAD:

आयपीएल मध्ये आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्स हे संघ एकमेकांविरुद्ध २० सामने खेळले आहेत. यापैकी चेन्नई संघाने १४ सामन्यात तर हैदराबाद संघाने ६ सामन्यात विजय मिळवला आहे.

हैदराबाद संघाविरुद्ध चेन्नई संघाची सर्वोच्च धावसंख्या २२३ आहे.तर हैदराबाद संघाची चेन्नई विरुद्ध १९२ ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

हैदराबाद व चेन्नई या संघांनी चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर आतापर्यंत ४ सामने खेळले असून या चारही सामन्यात चेन्नई संघाने विजय मिळवला आहे.येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात चेन्नई संघाने हैद्राबाद संघाचा ७ गडी राखून पराभव केला होता.

CSK vs SRH Pitch Report:

या ठिकाणी खेळलेल्या मागील सामन्यांच्या आधारे, खेळपट्टी गोलंदाजांना, विशेषतः फिरकीपटूंना अनुकूल असेल अशी अपेक्षा आहे. यामुळे फलंदाजांसाठी एक महत्त्वपूर्ण आव्हान ठरू शकते. 

CSK vs SRH सामना कधी होणार:

रविवार २७ एप्रिल, २०२४ संध्याकाळी ७:30 वाजता.

CSK vs SRH  सामना कुठे होणार:

एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

CSK vs SRH सामना थेट प्रक्षेपण:

CSK vs SRH  या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

संभाव्य संघ:

CSK: ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मोईन अली, एमएस धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

SRH: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.

Leave a Comment