Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad | दिल्ली कॅपिटल्स vs सनरायझर्स हैदराबाद : कोण मारणार बाजी ??

आयपीएलच्या २०२४ च्या मोसमातील आज खेळला जाणारा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा ३५ वा सामना आहे.(Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad)

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad

या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदाच सलग दोन विजय मिळवले असून ७ सामन्यात ३ विजय मिळवले असून सहा गुणांसह ते गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेत. तर त्यांच्या विरुद्ध असणारा आजचा संघ सनरायझर्स हैदराबाद पासून यंदाच्या हंगामात नवीन कर्णधार पॅट कमिन्स च्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद या संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले असून त्यापैकी चार सामन्यात त्यांनी विजय मिळवलेला आहे व गुणतालिकेत ते चौथ्या क्रमांकावर आहेत.

दिल्ली कॅपिटल्स हे त्यांच्या घरच्या मैदानावर अर्थातच दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर या मोसमात पहिल्यांदाच खेळणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर विजयाची लय कायम ठेवण्याचे एक मोठे आव्हानच असणार आहे.(Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad)

ईशान शर्मा मुकेश कुमार आणि खलील अहमद या भारतीय वेगवान गोलंदाजाच्या त्रिकूटाने चांगली कामगिरी केली आहे. तर फिरकी गोलंदाज कुलदीप यादव व अक्षर पटेल यांना लय भेटली असल्यामुळे मागील काही सामन्यात त्यांच्या गोलंदाजीत विशेष सुधारणा झाली आहे. फलंदाजी विभागांमध्ये जेक फ्रेझर मॅकगर्ग च्या आगमनाने वरील फळीतील फलंदाजांमध्ये एक ताजा अनुभव भरलेला आहे तर मधल्या फळीतील फलंदाज कडून अजूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. कर्णधार ऋषभ पंत च्या फलंदाजीत सुधारणा दिसून आली आहे. दिल्ली कॅपिटल्स समोरील मुख्य आव्हान म्हणजे त्यांचा प्रमुख फलंदाज चा फॉर्म व फिटनेस आहे.

सनरायझर्स हैदराबाद चे फलंदाज हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुफान फलंदाजी करताना दिसून येत असून अभिषेक शर्मा, ट्रवीस हेड, एडन मार्करम, हेन्री कलासेन हे सर्व फलंदाज चांगल्या लय मध्ये दिसून आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ची धुरा कर्णधार पॅट कमिन्स, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार यांनी चांगल्या प्रकारे सांभाळले आहे परंतु इतर गोलंदाजा कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.(Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad)

दिल्ली कॅपिटल संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सहा गडी राखून पराभव केला होता तर सनरायझर्स हैदराबाद या संघाने शेवटच्या सामन्यात आत्तापर्यंतची t20 सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या उभारून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचा २५ धावांनी पराभव केला होता.

DC VS SRH HEAD TO HEAD:

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबाद हे संघ एकमेकांविरुद्ध २३ सामने खेळले असून यातील ११ सामने हे दिल्ली संघाने जिंकले असून १२ सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघाने विजय मिळवला आहे. दिल्ली या संघाची हैदराबाद संघाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ही २०७ असून तर हैदराबाद या संघाची दिल्ली संघाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या २१९ आहे.मागील सहा सामन्यांपैकी पाच सामने हे दिल्ली संघाने जिंकलेल्या आहेत. (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad)

DC VS SRH pitch report:

अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथील खेळपट्टी पूर्वी संथ व कमी धावसंख्येसाठी ओळखले जात असे, परंतु आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या आधी यामध्ये बदल करण्यात आले असून तिला फलंदाजीसाठी अनुकूल करण्यात आले आहे त्यामुळे मोठ्या धावसंख्येच्या सामन्याची अपेक्षा आहे. (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad)

अश्याच ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा. 

दृष्टीशेपात:

१) सनरायझर्स हैदराबाद या संघाकडे मध्ये खेळण्यासाठी ट्रेविस हेड व अभिषेक शर्मा हे वेगाने धावा करणारे फलंदाज आहेत.ट्रेविस हेड याने या  हंगामात २०७ धावा केल्या असून तर अभिषेक शर्मा याने २०६ धावा केले आहेत.

२) पॅट कमिन्स याने या मोसमात डाव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली असून १४ च्या सरासरीने त्याने पाच विकेट्स मिळवले आहेत तर इकॉनोमी रेट हा फक्त ६.५६ आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल विरुद्ध च्या सामन्यात डेविड वॉर्नर ऋषभ पंत अक्षर पटेल यासारख्या डाव्या हाताच्या फलंदाजांना तो डोकेदुखी ठरू शकतो.(Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad)

३) दिल्लीच्या संघाने सनरायझर्स विरुद्धच्या शेवटच्या पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवला असून एक पराभव हा गेल्याच वर्षी याच मैदानावर आला होता.

DC VS SRH सामना कधी होणार:

शनिवारी 20 एप्रिल संध्याकाळी ७:३० पासून

DC VS SRH सामना कोठे होणार:

अरुण जेटली स्टेडियम दिल्ली

DC VS SRH थेट प्रक्षेपण:

दिल्ली कॅपिटल्स vs सनरायझर्स हैदराबाद या सामन्याची तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.(Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad)

संभाव्य संघ : 

१) दिल्ली कॅपिटल्स:
पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर/सुमित कुमार, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, ऋषभ पंत (c & wk), अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.

२)सनरायझर्स हैदराबाद:
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (wk), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (c), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

Leave a Comment