GT VS KKR | गुजरात च्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पुन्हा धडकणार रिंकू सिंग नावाच वादळ !! आजचा सामना गुजरात विरुद्ध कोलकाता.

GT VS KKR  | नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेल्या वर्षी या दोन्ही संघामधील मागील सामन्यात एक असा पराक्रम पाहायला मिळाला जो क्रिकेटच्या चमत्कारापेक्षा कमी नव्हता, रिंकू सिंगने शेवटच्या पाच चेंडूंमध्ये पाच षटकार खेचून केकेआरला अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता. म्हणूनच, गुजरात टायटन्सला अशाच अनपेक्षित घटना घडण्याची अपेक्षा आहे.  “नक्कीच, अनेक शक्यता आहेत. आमची योजना आमचा सर्वोत्तम खेळ करण्याची आणि दोन्ही सामने जिंकण्याची आहे. जर आम्ही चांगल्या फरकाने जिंकलो तर तुम्हाला कधीच कळणार नाही,” उमेश यादवने टिप्पणी केली.

चार संघांपैकी एक संघ १४ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची शक्यता असली तरीही, गुजरात टायटन्स, जे जास्तीत जास्त १४  गुण मिळवू शकतात, निःसंशयपणे, त्यांना इतर संघांकडून सुद्धा नशीबाची साथ आवश्यक आहे जेणेकरून इतर सामन्यांचे निकाल त्यांच्या बाजूने लागतील. कोलकाता संघ आधीच पात्र ठरला आहे पण या सामन्या मधून आणखी दोन गुण जोडण्याची आणि पहिल्या दोन संघामध्ये स्थान पक्के करण्याची त्यांना संधी आहे.

गुजरात संघ जरी आतापर्यंत कोलकाता संघावरती वरचढ ठरला असला तरी शनिवारी रात्री श्रेयस अय्यरच्या संघाने मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर प्ले ऑफ मधील स्थान पक्के करणारा पहिला संघ ठरले होते.  

कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी या आयपीएल हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू म्हणजे सलामीवीर – सुनील नरीन आणि फिल सॉल्ट आणि त्यांचे दोन फिरकी गोलंदाज – नरेन आणि वरुण चक्रवर्ती. महत्वाचे म्हणजे  वरुण चक्रवर्ती (१८), हर्षित राणा (१६), सुनील नरीन (१५), आंद्रे रसेल (१५) आणि मिचेल स्टार्क (१२) या त्यांच्या पाच गोलंदाजांनी १२ पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत, अशी सातत्य असलेली कोलकाता ही एकमेव बाजू आहे.

तर दुसरीकडे गुजरात टायटन्स संघाला आयपीएल हंगामाच्या उतारार्धात लय सापडली आहे. कर्णधार शुभमन गिल आणि सहकारी सलामीवीर साई सुदर्शन चांगली प्रदर्शन करत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहित शर्मा हा त्यांचा भरवशाचा वेगवान गोलंदाज फॉर्मात आहे. आणि त्याहून सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे रशीद खान आणि नूर अहमद हे दोन जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत. फॉर्ममध्ये असलेला संघ आणि फॉर्म मध्ये परतणारा संघ यांच्यात चुरशीच्या लढतीची अपेक्षा असेल.

GT VS KKR एकमेकाविरुद्ध (Head-to-Head)

गुजरात टायटन्स व कोलकत्ता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये आत्तापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात गुजरात तर एका सामनात कोलकत्ता संघ विजयी ठरला आहे. या दोन संघांमध्ये या मैदानावर झालेल्या शेवटच्या सामन्यात कोलकत्ता संघाने एका रोमहर्षक सामन्यात गुजरातचा तीन गडी राखून पराभव केला होता. शेवटच्या षटकात ५ षटकार मारणारा रिंकू सिंग या सामन्याचा सामनावीर ठरला होता.

GT VS KKR पीच रिपोर्ट (Pitch Report)

या आयपीएल हंगामात अहमदाबादमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने सहा पैकी चार सामने जिंकले आहेत. दव येथे मोठ्या प्रमाणावर पडते आणि त्यामुळे कर्णधार नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करण्याचे ठरवतात. असे जरी असले तरी, गुजरातने त्यांचा शेवटचा सामना प्रथम फलंदाजी करत आणि प्रचंड धावसंख्या उभारून जिंकला. या हंगामात या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७५ आहे.

GT VS KKR सामना कधी होणार

सोमवार, १३ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता 

GT VS KKR सामना कुठे होणार

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

GT VS KKR सामना थेट प्रक्षेपण

गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

GT VS KKR संभाव्य संघ

GT: शुभमन गिल, साई सुदर्शन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी.

Impact Sub: संदीप वॉरियर/आर साई किशोर.

KKR: फिल सॉल्ट, सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

Impact Sub: वैभव अरोरा.

GT VS KKR महत्वाचे मुद्दे

  • सर्व संघामध्ये गुजरात टायटन्सचा पॉवरप्लेमध्ये धावा करण्याचा रेट सर्वात कमी आहे ७.७२, तर दुसरीकडे कोलकाता नाइट राइडर्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नेट रन रेट ११.०२ आहे.  
  • गुजरातने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वात कमी ६७ षटकार मारले आहेत. तर कोलकाताने जवळपास दुप्पट १२५ षटकार मारले आहेत. 
  • शुभमन गिल टी२० मध्ये नरीन विरोधात १३ चेंडू खेळला असून दोन वेळा तो नरीनला बाद झाला आहे, त्याची सरासरी फक्त ६.५ आहे. पण डेव्हिड मिलरने टी२० मध्ये नरीनविरुद्ध ७२ चेंडूत ९५ धावा केल्या आहेत आणि फक्त एकदा बाद झाला आहे.
  • नितीश राणाची आयपीएलमध्ये राशिद खान विरुद्ध ९५ ची सरासरी आहे, त्याने राशीद विरोधात ७६ चेंडूत ९५ धावा केल्या असून आणि फक्त एकदाच तो बाद झाला आहे.

 

GT VS KKR DREAM TEAM

फिल सॉल्ट, मॅथ्यू वेड, शुभमन गिल(c), साई सुदर्शन, व्यंकटेश अय्यर, सुनील नरीन(vc), आंद्रे रसेल, राहुल तेवतिया, वरुण चक्रवर्ती,  मिचेल स्टार्क, राशिद खान.

Leave a Comment