Site icon marathimitranews

Kkr vs dc | श्रेयश अय्यर च्या नेतृत्वात खेळणारा कोलकत्ता संघ आयपीएल २०२४ च्या प्ले ऑफ शर्यतीतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स संघाशी सामना करतील

kkr vs dc

KKR VS DC | सोमवारी श्रेयश अय्यर च्या नेतृत्वात खेळणारा कोलकत्ता संघ आयपीएल २०२४ च्या प्ले ऑफ शर्यतीतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स संघाशी सामना करतील.

ऋषभ पंत च्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली संघाने त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवला असून ते आपले या आयपीएलच्या हंगामातील प्ले ऑफ मधील स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीचे फलंदाज फ्रेझर मॅकगर्ग, अभिषेक पोरेल, शाई होप, स्टब्बस व स्वतः ऋषभ पंत चांगली फलंदाजी करताना दिसून येत आहेत. हे दिल्ली संघाचे टॉप फाईव्ह फलंदाज चांगली फलंदाजी करत आहेत त्यामुळे कोलकत्ता संघाच्या गोलंदाजीसाठी हा एक चिंतेचा विषय असेल.

तर दुसरीकडे गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या कोलकत्ता संघाने त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात पराभव पत्करला आहे. कोलकत्ता संघाचे फलंदाज चांगली फलंदाजी करताना दिसून येत आहेत परंतु गोलंदाजी ही कोलकत्ता संघासाठी डोकेदुखी ठरली आहे.

कोलकत्ता संघ आत्तापर्यंत या आयपीएल हंगामात आठ सामने खेळला असून पाच सामने या संघाने जिंकले आहेत व तीन सामन्यात त्यांना पराभवचा सामना करावा लागला आहे. सध्या ते गुणतालिकेत दहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कोलकत्ता संघाने या आयपीएल हंगामात चांगली सुरुवात केली होती परंतु शेवटच्या काही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तर दुसरीकडे दिल्ली संघाने आतापर्यंत दहा सामने खेळले असून त्यांना पाच सामन्यात विजय तर पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली संघाचे या हंगामातील सुरुवात खराब झाली होती त्यातच त्यांचे महत्त्वाचे फलंदाज दुखापतग्रस्त झाले होते परंतु या सर्वातून सावरत दिल्ली संघाने शेवटच्या पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवला व दहा गुणांसह गुणतालिकेत ते सहाव्या क्रमांकावर आहेत.

अश्याच नवनवीन ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICKकरा.

या आयपीएलच्या हंगामात दिल्लीच्या संघाला मोठ्या प्रमाणात दुखापतींचा सामना करावा लागला आहे तरीही उपलब्ध असलेल्या खेळाडूंच्या जोरावर दिल्लीच्या संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. तर दोन वेळचे विजेते कोलकत्ता आयपीएल हंगामात एक चांगला संघ म्हणून उदयास आले आहेत.

या दोन संघात झालेल्या शेवटच्या सामन्यात दिल्ली संघाने कोलकत्ता संघाला एक कडवी झुंज दिली होती. कोलकत्ता संघाकडे फलंदाजी मध्ये मोठे पर्याय उपलब्ध आहेत त्याचा विपरीत दिल्ली संघाकडे फलंदाजी मध्ये मोजकेच पर्याय आहे.

गोलंदाजी ही कोलकत्ता संघासाठी चिंतेची गोष्ट ठरली आहे त्यातच शेवटच्या सामन्यात त्यांनी दुखापतग्रस्त मिचेल स्टार्क याच्या जागी दुष्मांता चमीरा याला संघात सामील करून घेतले होते परंतु त्यालाही चांगले योगदान देता आले नाही. फिरकी गोलंदाज सुनील नरिन चांगली गोलंदाजी करत आहे. तर दुसरीकडे दिल्ली संघाचे वेगवान गोलंदाज गोलंदाजी करताना चाचपडत आहेत. पण गेल्या काही सामन्यात त्यांनी कसातरी विजय मिळवला आहे.

KKR VS DC HEAD TO HEAD:

आयपीएल मध्ये आत्तापर्यंत हे दोन्ही संघ ३३ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यामध्ये कोलकत्ता संघाने १७ वेळा तर दिल्लीच्या संघाने पंधरा वेळा विजय मिळवला आहे तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

या आयपीएलच्या हंगामात झालेल्या पहिल्या सामन्यात कोलकत्ता संघाने दिल्ली संघ यासमोर २७३ धावांचा डोंगर उभा केला होता या धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ केवळ १६६ धावा करू शकला होता व कोलकत्ता संघाने १०६ धावांनी विजय मिळवला होता.

केवळ ३९ चेंडूत ७ चौकार व ७ षटकार यांच्या साह्याने ८५ धावा करणाऱ्या सुनील नरीन याला या सामन्याचे सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.

KKR VS DC Pitch Report:

ईडन गार्डन्स आत्तापर्यंत या आयपीएलच्या हंगामात फलंदाजीसाठी नंदनवन ठरले आहे. यामध्ये या सामन्याने कोणता बदल होईल असे वाटत नाही. धावांचा पाठलाग करताना ही परिस्थिती फलंदाजीसाठी अधिक अनुकूल होत जाते. जे आपल्याला शेवटच्या सामन्यात दिसून आले होते.

येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात २६१ या मोठ्या धावसंख्येचे आव्हान पंजाब संघाने केवळ १८.४ षटकात पूर्ण केले होते.

KKR VS DC सामना कधी होणार:

सोमवार, २९ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता 

KKR VS DC  सामना कुठे होणार:

ईडन गार्डन्स, कोलकाता

KKR VS DC सामना थेट प्रक्षेपण:

KKR VS DC या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

संभाव्य संघ:

KKR: सुनील नारायण, फिल सॉल्ट, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, दुष्मंथा चमीरा/मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती

DC: जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्रा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे/लिझाद विल्यम्स, खलील अहमद, मुकेश कुमार

Exit mobile version