LSG vs MI | भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियम येथे लखनऊ सुपर जायंट्स व मुंबई इंडियन्स या संघांमध्ये सामना रंगणार आहे.
लखनऊ संघाने आतापर्यंत या आयपीएलच्या हंगामात नऊ सामने खेळले असून पाच विजय व चार पराभव यासह ते गुणतालिकेत दहा गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. लखनऊ संघाला त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे मुंबई संघ यावर्षी नवीन कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. मुंबई संघाने आतापर्यंत या हंगामात नऊ सामने खेळण्यास त्यांना केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे, तर शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.
लखनऊ संघाला त्यांच्या फलंदाजी गोलंदाजी मधील चुकांमुळे या हंगामातील प्ले ऑफ मध्ये खेळण्याच्या शक्यतांना धक्का बसला आहे, परंतु काही सामने त्यांनी एक हाती जिंकले आहेत. काही अनपेक्षित पराभवांमुळे त्यांना गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
दीपक हुड्डा व निकोलस पुरन या मधल्या फळीतील फलंदाजांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे परंतु लखनऊ संघासाठी वेगवान गोलंदाजी अजूनही चिंतेची बाब आहे.
अश्याच नवनवीन ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICKकरा.
राजस्थान विरुद्धच्या शेवटचा सामन्यात लखनऊ संघाच्या ३ वेगवान गोलंदाजानी एकत्रित मिळून ११ षटकांमध्ये १३४ धावा दिल्या होत्या. वेगवान गोलंदाज मयांक यादव जखमी असल्यामुळे कर्णधार के ल राहुलकडे सुद्धा कमी पर्याय उपलब्ध आहेत.
काहीही असले तरी लखनऊ संघाला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी अजूनही संधी उपलब्ध आहेत. दुसरा बाजूला मुंबई संघाला अनेक सामन्यात उच्च धावसंख्या उभारून सुद्धा पराभावाचा सामना करावा लागला आहे. फलंदाजीक्रमातील विसंगतीमुळे मुंबई संघ वाईट ते अती वाईट या स्थितीत गेला आहे. तर जसप्रीत बुमराहाचा अपवाद वगळता इतर गोलंदाज गोंधळलेले दिसून आले आहेत. त्यामुळे फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही गोष्टी मुंबई संघासाठी चिंतेच्या विषय आहेत.
हंगाम सुरू होण्यापूर्वी, मुंबई संघ फिरकी गोलंदाजांची कमी असूनही मजबूत संघापैकी एक दिसत होता. असो, परंतु त्याचे परफॉर्मन्समध्ये रुपांतर झाले नाही आणि त्यामागील एक मोठे कारण म्हणजे त्यांच्या परदेशी वेगवान गोलंदाजांचा विकेटसाठीचा संघर्ष.दुसऱ्या बाजूला लखनऊ संघ गुणतालिकेत चांगल्या स्थितीत आहे मुंबई विरुद्ध विजय मिळवल्यास ते दुसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतात. घरच्या मैदानावर खेळण्याच्या फायद्या शिवाय मयंक यादव यांच्या पुनरागमनामुळे लखनऊ संघ अधिक मजबूत झाला आहे.
लखनऊ संघाचा ट्रॅक रेकॉर्ड मुंबईपेक्षा खूप चांगला आहे, परंतु पाच वेळा आयपीएल चॅम्पियन यांना कधीच नाकारता येत नाही. परिस्थिती आणि संघाची ताकद पाहता, मुंबई संघ उद्या विजय मिळवेल.
LSG vs MI HEAD TO HEAD:
लखनऊ व मुंबई या संघात आतापर्यंत चार सामने झाले असून यामध्ये लखनऊ संघाचा वरचष्मा दिसून आला आहे. या चार सामन्यांपैकी तीन सामन्यात लखनऊ संघाने बाजी मारली आहे तर केवळ एका सामन्यात मुंबई संघ विजय ठरला आहे.
या हंगामातील या दोन्ही संघांमध्ये हा पहिला सामना आहे. मुंबई संघाविरुद्ध लखनऊ संघाची १९९ ही सर्वोच्च धावसंख्या आहे तर १८२ ही मुंबई संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे.
या दोन संघांमध्ये शेवटचा सामना मागील हंगामात Eliminator सामन्यात झाला होता. मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १८२ धावा केल्या होत्या, त्याच्या प्रत्युत्तरात लखनऊ संघ केवळ १०१ धावामध्ये सर्वबाद झाला होता. ३.३ षटकात केवळ ५ धावा देऊन ५ गडी बाद करणारा आकाश मधवाल याला सामनावीर घोषित करण्यात आले होते.
LSG vs MI Pitch Report:
लखनऊच्या एकना स्टेडियम मधली खेळपट्टी ही संथ असून ती सामान्यतः कमी धावसंख्येसाठी ओळखली जाते. या हंगामात आत्तापर्यंत येथे झालेल्या सामन्यात फिरकी गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसून आले आहेत.
LSG vs MI सामना कधी होणार:
मंगळवार, ३० एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता
LSG vs MI सामना कुठे होणार:
भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
LSG vs MI सामना थेट प्रक्षेपण:
LSG vs MI या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.
संभाव्य संघ:
LSG: क्विंटन डी कॉक, केएल राहुल, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर
Impact : अमित मिश्रा, अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौथम, युधवीर सिंग चरक, मणिमरण सिद्धार्थ
MI: रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
Impact: सूर्यकुमार यादव, नमन धीर, शम्स मुलानी, देवाल्ड ब्रेविस, कुमार कार्तिकेय