MI VS SRH | आयपीएल हंगाम २०२४ मधील सामना क्र. ५५ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
मुंबईचा संघ प्ले ऑफ च्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे परंतु शेवट गोड करण्यासाठी ते राहिलेले सर्व सामने जिंकण्याच्या प्रयत्नात असतील. मुंबई संघाने या हंगामात ११ सामने खेळले असून या ११ सामन्यापैकी त्यांना केवळ तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर त्यांनी खेळलेल्या त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यापैकी चार सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.
तर दुसरीकडे राजस्थान संघ हा सामना जिंकून अव्वल चार संघात आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करेल. राजस्थान संघाने दहा सामने खेळले असून या दहा सामन्यांपैकी सहा सामन्यात विजय तर चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांनी त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असणाऱ्या राजस्थान संघाचा केवळ एका धावेने पराभव केला होता. मोक्याच्या क्षणी अचूक गोलंदाजी करणारा भुवनेश्वर कुमार याला सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तर दुसऱ्या बाजूला मुंबई संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर कोलकत्ता संघाने तब्बल बारा वर्षानंतर पराभवाची धूळ चारली आहे. या सामन्यात कोलकत्ता संघाने मुंबईचा २४ धावांनी पराभव केला होता.
MI Vs SRH दोन संघांमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात मोडलेले काही विक्रम:
- प्रथम दहा षटकांमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम: सनरायझर्स संघाने त्यांच्या पहिल्या दहा षटकांमध्ये १४८/२ धावा केल्या होत्या, याआधी हा विक्रम मुंबई संघाच्या नावावर होता.
- हैदराबाद संघासाठी वेगवान अर्धशतक: अभिषेक शर्मा याने १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण करून हा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वीचा विक्रम याच पारी मध्ये ट्रवीस हेड याने १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण करून आपल्या नावावर केला होता.
- सनरायझर्स हैदराबाद साठी सर्वोत्कृष्ट पॉवर प्ले स्कोअर: सनरायझर्स संघाने सहा षटकार ८१/१ धावसंख्या उभारून त्यांचा या आधीचा ७९/० हा विक्रम मोडीत काढला.
MI VS SRH Head to Head:
मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये आत्तापर्यंत २२ सामने झाले असून या २२ सामन्यांपैकी बारा सामन्यात मुंबई संघ तर दहा सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने विजय मिळवला आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या दोन संघांमध्ये आत्तापर्यंत सात सामने झाले असून या सात सामन्यांपैकी पाच सामन्यात मुंबई संघ तर दोन सामन्यात हैदराबाद संघ विजय ठरला आहे.
या दोन संघांमध्ये शेवटचा सामना २७ मार्च रोजी हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये खेळला गेला होता. या सामन्यांमध्ये अनेक विक्रम नोंदवले गेले होते सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा केल्या गेल्या होत्या. तसेच या सामन्यात सर्वाधिक म्हणजेच ३८ षटकार मारले गेले होते.
आणखी वाचा: महिला T20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत या दिवशी होणार सामना
MI VS SRH Pitch Report:
मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे नेहमीच फलंदाजीसाठी अनुकूल राहिले आहे. छोटे मैदान, खेळपट्टी मध्ये असलेला वेग व बाउन्स यामुळे फलंदाजी करताना फलंदाजांना मोठी मदत मिळते.
प्रथम पारीच्या वेळी वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. फिरकी गोलंदाजांना खेळपट्टी मधून मदतीची शक्यता नाही. वानखेडे ची खेळपट्टी ही नेहमीच फलंदाजांसाठी अनुकूल राहिली आहे त्यामुळे येथे नेहमीच हाय स्कोरिंग सामने बघायला मिळतात. या मैदानावर नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा मानला जातो. येथे दव महत्त्वाचा भाग मानला जातो त्यामुळे नाणेफेक जिंकून बहुतांश करणार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतात. व हेच आपल्याला या सामन्यात बघायला मिळू शकते.
MI VS SRH सामना कधी होणार:
सोमवार, ६ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता
MI VS SRH सामना कुठे होणार:
वानखेडे स्टेडियम, मुंबई
आणखी वाचा: प्रसिद्ध वेब सिरीज पंचायत लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला
MI VS SRH सामना थेट प्रक्षेपण:
MI Vs SRH या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.
संभाव्य संघ:
MI: इशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
Impact Sub: नेहाल वढेरा
SRH: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन, नितीश रेड्डी, अब्दुल समाद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
Impact Sub: जयदेव उनाडकट/उमरान मलिक
MI VS SRH Fantasy Team:
रोहित शर्मा (c), इशान किशन (wk), ट्रॅव्हिस हेड सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, एडन मार्कराम (vc), अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन.