Rajnikanth | सुपरस्टार रजनीकांत यांच्या लोकेश कनागराजसोबतच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘कुली’ दिग्दर्शकाने केले जाहीर

साउथ सुपरस्टार रजनीकांत त्याच्या बहुप्रतिक्षित आगामी ‘कुली’ चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत, ज्याचा रोमांचक टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ज्याला पाहिल्यानंतर रजनीकांतच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाचा ॲक्शनपॅक टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. रजनीकांतचे चाहते त्याला पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.(Rajnikanth)

Rajnikanth यांच्या या चित्रपटविषयी  थोडक्यात

  • रजनीकांत यांच्या १७१व्या चित्रपटाचे नाव आहे ‘कुली’
  • चित्रपट निर्माते लोकेश कनगराज यांनी चित्रपटाच्या टीझरचे अनावरण केले.
  • शिवकार्तिकेयन मुख्य भूमिकेत असणार आहेत

रिलीज झालेल्या टीझरमध्ये रजनीकांत पुन्हा एकदा त्याच्या दमदार स्टाइलमध्ये आणि नेत्रदीपक ॲक्शन करताना दिसत आहेत. त्याची स्टाईल पाहिल्यानंतर तो ७३ वर्षांचा असल्याचा अंदाज लावणे खूपच अवघड आहे. रिलीज झालेल्या टीझरमध्ये रजनीकांत गुन्हेगारांना लोखंडी साखळ्यांनी नव्हे तर सोन्याच्या साखळ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. टीझरमध्ये त्याचा ॲक्शन अवतार पाहायला मिळत आहे. प्रत्येक दृश्यात त्याची जुनी जादू आजही कायम आहे, ज्याने चाहत्यांना एक वेगळीच नशा चढवली आहे.(Rajnikanth)

टीझरमधील रजनीकांत यांची दमदार ॲक्शन पाहून चाहत्यांना त्यांच्यावरून नजर हटवता येत नाही. रजनीकांतचा असलेला हा ॲक्शनपॅक्ड चित्रपट ‘कुली’ हा दक्षिण चित्रपट दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी दिग्दर्शित केला आहे. या टीझरला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. चित्रपटाच्या रिलीज झालेल्या टीझरवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की हा चित्रपट सोन्याची तस्कर आणि त्याला अडवणाऱ्या नायकावर आधारित आहे. या चित्रपटाचे आधी नाव ‘थलैवर १७१’ होते, कारण हा रजनीकांत यांचा १७१वा चित्रपट आहे. ते नंतर बदलून ‘कुली’ असे करण्यात आले. या चित्रपटाचा टीजर पाहिल्यानंतर चाहत्याना आता हा चित्रपट बघण्याची उत्सुकता लागली आहे.

rajnikanth

रजनीकांत अलीकडेच त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित “लाल सलाम” मध्ये दिसला होता.(Rajnikanth)

अश्याच ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा.

त्याचा आगामी चित्रपट म्हणजे टी जे ज्ञानवेलचा “वेट्टैयान”, ज्यात अमिताभ बच्चन, फहद फासिल, राणा दग्गुबती आणि मंजू वॉरियर हे त्यांचे सह कलाकार असणार आहेत.

लोकेश-रजनीकांत पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत

लोकेश कनगराजच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती. विशेष म्हणजे लोकेश कनागराजसोबत रजनीकांतचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे, ज्यामुळे या चित्रपटातील कलाकार आणि चाहते दोघेही या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्सने केली आहे. याशिवाय शिवकार्तिकेयनही या चित्रपटात मोठ्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या या चित्रपटाच्या उर्वरित कलाकारांबद्दल किंवा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

रिपोर्ट्सनुसार, कुली हा दिग्दर्शक कनागराजच्या फिल्मोग्राफी करियर मधला मानगरम आणि मास्टर नंतरचा तिसरा स्वतंत्र चित्रपट असणार आहे.(Rajnikanth)

‘कुली’चा टीझर पाहण्यासाठी येथे CLICK करा: https://youtube.com/watch?v=6xqNk5Sf5jo

रजनीकांत यांच्या १७१व्या चित्रपटाचे नाव

रजनीकांत यांच्या १७१व्या चित्रपटाचे नाव ‘कुली’ आहे. चित्रपट निर्माते लोकेश कनागराज यांनी पॉवर-पॅक टीझरसह चित्रपटाच्या शीर्षकाचे अनावरण केले. त्यातच, साऊथ मेगास्टार त्याच्या शैलीत गुंडांना सोन्याच्या साखळीने मारहाण आणि मुक्का मारताना दिसत आहे.

चित्रपटाचा टीझर रजनीकांत यांनी त्यांचे चित्रपट मन्नान, उझैपली आणि मुल्लम मलारम यांसारख्या चित्रपटांमधील प्रतिष्ठित भूमिकांना समर्पित आहे ज्यामध्ये त्यांनी कुलीची भूमिका केली होती.(Rajnikanth)

रजनीकांत यांच्या १७१व्या चित्रपटाचे नाव अखेर बाहेर आले आहे. ‘कुली’ शीर्षक असलेल्या या चित्रपटात सुपरस्टार हातावर ‘कुली’ बॅजसह धासु अवतारात दिसत आहे. तो सोन्याच्या साखळीने गुंडांना मारहाण करताना दिसत आहे. टीझर मोनोक्रोम टोनमध्ये रिलीझ करण्यात आला होता, फक्त सोन्याच्या साखळीला त्याचा मूळ रंग कायम ठेवन्यात आला आहे.

मागील महिन्यात २८ मार्च रोजी लोकेश कनागराजने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर चित्रपटातील रजनीकांतचे पोस्टर शेअर केले होते. पोस्टर व्यतिरिक्त, त्याने त्या पोस्ट मध्ये असे लिहिले होते कि, “#Thalaivar171TitleReveal on April 22”

मार्च २०२४ मध्ये, चेन्नई येथे आयोजित पत्रकार परिषदेत, दिग्दर्शक् लोकेश कनागराज यांनी, ‘थलाईवर १७१’ आणि त्याचा आगामी चिटपट ‘कैथी २’ याबद्दल माहिती शेअर केली होती. ते म्हणाले होते कि, “प्री-प्रॉडक्शनचे काम अजूनही सुरू असून. जूनमध्ये चित्रपट रीलीज होईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे एक ते दीड वर्षांचा कालावधी लागेल. ‘थलैवर १७१’ पूर्ण झाल्यानंतर एक महिन्यानंतर आम्ही कार्तीसोबत ‘कैथी २’ चे काम सुरू करेल.(Rajnikanth)

‘कुली’ हा लोकेश कनागराज आणि रजनीकांत यांचा पहिला एकत्र प्रयोग आहे. या चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्सने केली आहे. हा चित्रपट सप्टेंबर २०२३ मध्ये लाँच करण्यात आला होता.(Rajnikanth)

या चित्रपटात शिवकार्तिकेयन महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. तथापि, इतर कलाकार आणि क्रू बद्दल अधिकृत घोषणा केली जाईल असे बोलले जात आहे. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि स्टंट डायरेक्टर अंबुमणी आणि अरिवुमणि ही जोडी या क्रूचा एक भाग आहेत.

Leave a Comment