RCB Vs GT | बेंगलोर कि गुजरात कोणता संघ ठरणार वरचढ ??

RCB Vs GT | आयपीएल मध्ये एका क्षणात काहीही घडू शकते हे आपण पाहिलेले आहे. गेल्या वर्षी याचवेळी बेंगलोर व गुजरात या दोन संघांमध्ये एका वेगळ्या परिस्थितीत सामना झाला होता. त्यावेळी गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता व त्यांनी प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निश्चित केले होते तर दुसरीकडे बेंगलोर संघ प्ले ऑफ मधील सलग चौथ्या वर्षी आपले स्थान निश्चित करण्यापासून केवळ एक विजय दूर होता. तर दुसरीकडे यावर्षी हेच दोन संघ गुणतालिकेत अनुक्रमे आठव्या व दहाव्या क्रमांकावर आहेत.

या आयपीएल हंगामात दुसऱ्या संघाने आतापर्यंत दहा सामने खेळले असून त्यापैकी केवळ चार सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे, तर दुसरीकडे बेंगलोर संघाने सुद्धा दहा सामने खेळले असून केवळ तीन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे.

या दोन्ही संघांनी त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय तर तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

या दोन्ही संघांची शेवटची भेट यावर्षी २८ एप्रिल रोजी झाली होती. गुजरात संघाने २० षटकात ३ बाद २०० धावा केल्या. प्रत्युत्तरात बेंगळुरूने १६ षटकांत लक्ष्याचा पाठलाग करताना नऊ गडी राखून विजय मिळवला. बंगलोर संघासाठी विल जॅक्सने ४१ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला.

राशिद खान साठी शेवटचा सामना खराब ठरला होता. विल जॅक्स व विराट कोहली या दोघांनी मिळून राशिद खानच्या एका षटकात काढलेल्या २९ धावा या आतापर्यंत सर्वाधिक धावा आहेत.

तुम्हाला माहिती आहे का:

  • गुजरात विरुद्धच्या चार सामन्यांमध्ये विराट कोहलीने ५८(५३), ७३(५३), १०१*(६१) आणि ७०*(४४) धावा केल्या आहेत.
  • २०२१ मध्ये पदार्पण केल्यापासून, रजत पाटीदार याने २१९ स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. त्याच्या पेक्षा इतर कोणताही फलंदाज wrist स्पिन्नर विरुद्ध इतक्या वेगाने धावा करत नाही.
  • राशिद खानच्या नावावर १० सामन्यांनंतर केवळ ८ विकेट आहेत, हे त्याचे आयपीएलमधील आतापर्यंतचे सर्वात खराब प्रदर्शन आहे. गेल्या वर्षी याच टप्प्यावर त्याच्या १८ विकेट होत्या. 

RCB VS GT Head to Head:

आयपीएल मध्ये आतापर्यंत या दोन संघांमध्ये चार सामने खेळले गेले आहेत. या चार सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे.

या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात गुजरात संघाने दिलेल्या २०१ धावांचे आव्हान बेंगलोर संघाने केवळ एक गड्याच्या मोबदल्यात व १६ षटकांमध्ये पूर्ण केले होते. ४१ चेंडूमध्ये नाबाद १०० धावांची खेळी करणाऱ्या विल जॅक्स याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.

या दोन्ही संघांमध्ये खेळलेल्या चारही सामन्यात धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी ठरला आहे.एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू या मैदानावर या दोन संघामध्ये एक सामना झाला आहे व त्या सामन्यात गुजरात संघ विजयी ठरला होता.

RCB VS GT Pitch Report:

बेंगलोर चे चिन्नास्वामी स्टेडियम हे नेहमीच फलंदाजीसाठी अनुकूल राहिले आहे. या मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटचे सामन्यात बेंगलोर व हैदराबाद या दोन संघांनी मिळून ५४९ धावा केला होत्या. जी एका T२० सामन्यातील आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे गुजरात व बेंगलोर हा सामना सुद्धा हाई स्कोरिंग अपेक्षित आहे. फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांना खेळपट्टी मधून थोडीफार मदत मिळू शकते.

RCB VS GT सामना कधी होणार:

शनिवार, ४ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता 

RCB VS GT सामना कुठे होणार:

एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

RCB VS GT सामना थेट प्रक्षेपण:

RCB VS GT या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

संभाव्य संघ:

RCB: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल.

Impact Sub: महिपाल लोमरोर/विजयकुमार विशक.
GT: शुभमन गिल, रिद्धिमान साहा/मॅथ्यू वेड, साई सुधारसन, अजमतुल्ला ओमरझाई/विजय शंकर, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, आर. साई किशोर, संदीप वॉरियर, नूर अहमद/स्पेंसर जॉन्सन, मोहित शर्मा.

Impact Sub: दर्शन नळकांडे.

RCB vs GT fantasy team:

वृद्धिमान साहा, दिनेश कार्तिक, फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, शुभमन गिल, साई सुदर्शन (vc), विल जॅक्स (c), कॅमेरॉन ग्रीन, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहित शर्मा.

1 thought on “RCB Vs GT | बेंगलोर कि गुजरात कोणता संघ ठरणार वरचढ ??”

Leave a Comment