ताकदवर कोलकत्याच्या विरुद्ध आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर साठी आज करो किंवा मरो(rcb vs kkr)
या मोसमात केवळ एक विजय मिळून गुणतालिकेत तळाच्या स्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी आजचा सामना हा करो किंवा मरो चा असणार आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचा सामना गौतम गंभीर ताकदवर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे.
एका पेक्षा एक सरस खेळाडू संघात असताना सुद्धा केवळ एक विजय मिळवून तळाच्या स्थानी बंगळुरू संघ आहे. विराट कोहलीने सर्वाधिक धावा करून स्वतःकडे ऑरेंज कॅप राखली असली, तरीही इतर खेळाडूंना साजेशी कामगिरी करता आली नाही. दिनेश कार्तिकचा अपवाद वगळता अजूनही इतर फलंदाजांना सूर गवसलेला नाही. बेंगलोरच्या संघाला जर या मोसमामधील आपले आव्हान कायम राखायचे असेल तर त्यांना आजचा सामना जिंकावाच लागेल.(rcb vs kkr)
सहा सामन्यानंतर कोलकत्याचा संघ चार विजयांचं गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर आरसीबी हा संघ सात सामन्यानंतर केवळ एका विजयासह गुणतालिकेच्या तळाशी आहे.
RCB vs KKR head to head:
आरसीबी व केकेआर हे आतापर्यंत एकमेकांविरुद्ध ते ३३ सामने खेळले असून केकेआर या संघाने १९ तर आरसीबी या संघाने १४ सामने जिंकले आहेत आरसीबी विरुद्ध केकेआर चा आतापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम २२२ आहे तर केकेआर चा आरसीबी विरुद्ध चा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा २१३ आहे.
ईडन गार्डन कोलकत्ता येथील मैदानावर आरसीबी व केकेआर यांच्यामध्ये आत्तापर्यंत ११ सामने खेळले गेले असून त्यापैकी सात सामने केकेआर या संघाने जिंकले आहेत या सात सामन्यांपैकी पाच सामने हे केकेआर संघाने प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत.(rcb vs kkr)
अश्याच ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा.
यंदाच्या मोसमातील १० वा सामना याच दोन संघात बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला होता. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता प्रथम फलंदाजी करताना आपल्या निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकत्ता संघाने हे आव्हान तीन गडी गमावून विजय मिळवला होता.
या ठिकाणी खेळले गेलेल्या शेवटच्या केकेआर विरुद्ध आरसीबी सामना शार्दुल ठाकूर ने २९ चेंडूत ६८ धावा तर रिंकू सिंगने ३३ चेंडूत ४६ धावा केल्या होत्या तर केकेआर संघाने २०४ ही धावसंख्या उभारली होती या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ १२३ धावांमध्येच बाद झाला होता.
आरसीबी संघासाठी सर्वात मोठा धोका असेल तो सुनील नरिन चा. या मोसमात त्याने केवळ चेंडूनच नाही तर बॅटने देखील आग ओकली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात त्यांनी आपले T२० मधील पहिले शतक झळकवले आहे. सुनील नारायण यांनी या हंगामात १८७च्या स्टाईल २७६ धावा केल्या आहेत.
तर केकेआर संघासाठी विराट कोहली धावा करताना दिसत आहे या हंगामात पुन्हा एकदा ३६१ धावा करून ऑरेंज कॅप स्वतःकडे ठेवली आहे, तरीही त्याचा मधल्या षटकांमधील स्ट्राईक रेट हा चिंतेचा विषय राहील.(rcb vs kkr)
तुम्हाला माहिती आहे का ??
१) केकेआर चा सलामीच्या फलंदाजीचा रनरेट (११.६६) हा सर्व संघांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तर आरसीबीच्या सलामीवीरांनी दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत (३४३)
२) आरसीबीने आतापर्यंत सात डावात चार खेळाडूंना तिसऱ्या क्रमांकावर खेळवून पाहिले आहे. त्यामध्ये या सर्वांनी मिळून ८१ धावा केल्या आहेत.(rcb vs kkr)
३) दिनेश कार्तिक याने डेथ ओव्हर मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट हा २५२.८६ आहे.
RCB VS KKR Pitch Report:
ईडन गार्डनवर खेळलेल्या शेवटच्या तीन सामन्यात खेळपट्टीने वेगवेगळे गुण दाखवले आहेत. दिवसाखेळला गेलेल्या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले होते तर रात्रीच्या दोन्ही सामन्यात धावांचा पाऊस पडला.
RCB vs KKR सामना कधी होणार:
रविवारी, दुपारी ३:३० पासून
RCB vs KKR सामना कुठे होणार:
ईडन गार्डन, कोलकत्ता
RCB vs KKR थेट प्रक्षेपण:
RCB vs KKR या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.
संभाव्य संघ:
KKR:फिल सॉल्ट, सुनील नारायण, आंगकृष्ण रघुवंशी, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.(rcb vs kkr)
RCB: फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, महिपाल लोमरोर, अल्झारी जोसेफ, विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज(rcb vs kkr)