redmi note 13pro+ 5g स्पेशल वर्ल्ड चॅम्पियन एडिशन या तारखेला होणार लॉंच स्पेशल वर्ल्ड चॅम्पियन एडिशन या ३० एप्रिलला लॉंच करणार असल्याचे xiaomi ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक पोस्ट करत घोषित केले आहे. शाओमी इंडिया त्यांच्या भारतातील १० व्या वर्धापन दिनानिमित हा स्पेशल एडिशन मोबाइल प्रथमच लॉंच करणार आहे.
शाओमी ३० एप्रिल २०२४ त्यांचा स्पेशल वर्ल्ड चॅम्पियन एडिशन Redmi note 13pro+ 5G लॉन्च करणार आहे. शाओमी त्यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या २०२२ मधील विजयाच्या प्रेरणेने हा मोबाईल लॉन्च करत आहे. शाओमी हा मोबाईल हाय एंड स्पेसिफिकेशन्स व अद्वितीय लूक सोबत हा मोबाईल बाजारात आणत आहे.
Redmi note 13चे यावर्षी जानेवारीमध्ये भारतात अनावरण करण्यात आले होते. यासोबतच redmi note 13pro+ 5g आणि note १३ Pro 5g हे मोबाईल सुद्धा लाँच करण्यात आले होते.
या मोबाईल मध्ये फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून हा मोबाईल अँड्रॉइड १३ आधारित MiUI 14 सह येतो. Note 13 pro 5G मध्ये मीडियाटेक डिमेनसीटी 7200-ultra Soc वापरण्यात आले आहे.तसेच यामध्ये 120w सपोर्ट असलेली 5000 mAh ची बॅटरी सुद्धा देण्यात आली आहे.या मोबाईल मध्ये २०० मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाईल तीन रंग व तीन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन मध्ये लॉन्च करण्यात आला होता.
आता शाओमी कंपनीने Redmi note 13 pro+ 5G world champion edition किंवा afa edition ३० एप्रिल रोजी लॉच करणार असल्याचे त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर जाहीर केले आहे.
अश्याच नवनवीन ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICKकरा.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शाओमी ने याबाबत घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये या नवीन मोबाइल एडिशनचा एक छोटा टीचर सुद्धा देण्यात आला आहे.
वर्ल्ड चॅम्पियन एडिशन निळ्या रंगात असून कॅमेरा भोवती सोनेरी रंग व वरच्या कोपऱ्यात अर्जेंटिना फुटबॉल संघाचा लोगो दिसून येत आहे. चॅम्पियन एडिशन मध्ये सध्याच्या note 13 pro 5G मध्ये असणारे वैशिष्ट्येच असतील असे तज्ञांचे म्हणणे आहे.(redmi note 13pro+ 5g)
Redmi note 13pro+ 5g किंमत
Redmi note 13pro+ 5g ची किंमत भारतात ३१९९९ पासून सुरुवात होते. यामध्ये तीन व्हेरियंट असून ते तीन वेगवेगळ्या कलर मध्ये उपलब्ध आहेत. ते खालीलप्रमाणे
- 8जीबी+256जीबी ३१९९९ रुपये
- 12जीबी+256जीबी ३३९९९ रुपये
- 12जीबी+512जीबी ३५९९९ रुपये एवढी किंमत मोजावी लागते.
हे तिन्ही पर्याय फ्युजन ब्लॅक, फ्युजन पर्पल व फ्युजन व्हाइट पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.
Redmi Note 13 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले – 6.67 फुल-एचडी+ एमोलेड डिस्प्ले
- फ्रंट कॅमेरा – 16-मेगापिक्सेल
- रीयर कॅमेरा – 200-मेगापिक्सेल + 8-मेगापिक्सेल + 2-मेगापिक्सेल
- रॅम – 8जीबी, 12जीबी
- स्टोरेज – 256जीबी, 512जीबी
- बॅटरी क्षमता – 5000mAh
- ऑपरेटिंग सिस्टम – अँन्ड्रॉईड 13
Redmi note 13pro+ 5G स्पेशल वर्ल्ड चॅम्पियन एडिशन किंमत
साधारणपणे स्पेशल एडिशन फोन त्याच्या आधीच्या व्हेरियंट पेक्षा उच्च स्टोरेज मध्ये येतात आणि त्यांची प्राईस सुद्धा जास्त असते त्यामुळेच Redmi note 13pro+ 5g सुद्धा हाच ट्रेंड फॉलो करेल असं वाटतं.
फोटोग्राफी प्रेमींसाठी ट्रिपल कॅमेरा ही एक पर्वणीच आहे त्यामध्ये 200 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा व 2 त्यापेक्षा मायक्रो कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये स्टेरिओ स्पीकर व IR ब्लास्टर यांचा समावेश आहे. डिस्प्ले चा विचार केला असता मोबाईलला गोरीला ग्लास देण्यात आला आहे यासोबतच पाणी आणि धूळ रोखण्यासाठी IP68 रेटिंग देण्यात आले आहे.
Redmi Note 13 Pro+ 5G स्पेशल वर्ल्ड चॅम्पियन एडिशन मध्ये काय वेगळ असेल
Redmi Note 13 Pro+ 5G याबद्दल शाओमी च्या वेबसाइट वरती माहिती देण्यात आली आहे.जी मर्यादित एडिशन हँडसेटचा रिटेल बॉक्स दाखवते. शाओमी कंपनीने शेअर केलेल्या टीझर्सवरून असे दिसून आले आहे की कॅमेरा रिंग्जभोवती सोनेरी ॲक्सेंटसह, मोबाइल निळ्या रंगात येईल. तसेच, यात सोनेरी रंगात AFA चा लोगो असेल.
अलीकडे, Redmi Note 13 Pro+ वर्ल्ड चॅम्पियन एडिशन चे लाइव्ह इमेजेस समोर आले असून, त्यावरून असे दिसते कि मोबाइलच्या मागील बाजूला निळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यांसह ड्युअल-टोन डिझाइन असेल. मागील बाजूचा रंग फिफा विश्वचषक २०२२ जिंकलेल्या अर्जेंटिना फुटबॉल संघाच्या जर्सीसारखी आहे.
Redmi Note 13 Pro+ World Champions Edition हा redmi कंपनीचा पहिला मर्यादित श्रेणी मालिकेतील मोबाइल असेल.जो ते त्यांच्या भारतातील १० व्या वर्धापन दिनानिमित हा स्पेशल एडिशन मोबाइल प्रथमच लॉंच करणार आहेत.
1 thought on “redmi note 13pro+ 5g स्पेशल वर्ल्ड चॅम्पियन एडिशन या तारखेला होणार लॉंच”