Site icon marathimitranews

चेन्नई vs पंजाब | आयपीएल 2024 चेन्नई संघासाठी प्ले ऑफ अगोदर धक्कादायक बातमी, स्टार गोलंदाज टीम मधून बाहेर

चेन्नई vs पंजाब

चेन्नई vs पंजाब | सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२४ मधील सामना क्रमांक ५३ मध्ये यजमान पंजाब किंग्स धर्मशालाच्या एचपीसीए मैदानावर चेन्नई सुपर किंग संघाचा सामना करतील.

यंदाच्या आयपीएल मध्ये त्यांचा हा सलग दुसरा सामना असेल दोन्ही संघांमध्ये झालेल्या शेवटच्या सामना पंजाब संघाने चेन्नईचा पराभव केला होता. चेन्नई संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर हा दुसरा पराभव ठरला होता. दोन्ही संघ सध्या अव्वल चार संघांमधून बाहेर आहेत, प्ले ऑफ मध्ये पात्र होण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

दोन्ही संघांनी आतापर्यंत या आयपीएल हंगामात दहा सामने खेळले आहेत या दहा सामन्यांपैकी चेन्नई व पंजाब संघानी अनुक्रमे पाच व चार सामन्यात विजय मिळवला आहे.

चेन्नई संघाला त्यांच्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर दुसरीकडे पंजाब संघाची सुद्धा हीच स्थिती आहे.

चेन्नई संघ गुणतालिकेत दहा गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर पंजाब संघ आठ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.

चेन्नईचा संघ कर्णधार व सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. परंतु त्याला डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करताना अडचणीचा सामना करावा लागतो. त्याने या हंगामात डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध एकूण ८९ चेंडू खेळ असून पाच वेळा त्यांनी स्वतःची विकेट गमावली आहे. त्यामुळेच पंजाब संघ त्याच्या या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. पंजाब संघ त्यांच्या मागील सामन्यातील संघात कोणताही बदल करण्याची शक्यता नाही.

अधिक वाचा : Google ला टक्कर देण्यासाठी ओपनएआय मायक्रोसॉफ्टच्या मदतीने तयार करणार सर्च इंजिन.

मथीशा पथिराणा याने मधल्या षटकांमध्ये सुरेख गोलंदाजी केली आहे. त्याने या षटकांमध्ये केवळ ५.४६ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत व आठ गडी सुद्धा बाद केले आहेत. त्यामुळे हा युवा वेगवान गोलंदाज पंजाबचे फलंदाज शशांक सिंग व आशुतोष शर्मा यांच्याविरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी निर्णय ठरू शकतो. मुस्तफिझूरच्या मायदेशी परत जाण्यामुळे, पाथीरानाचे पुनरागमन थेट इलेव्हनमध्ये असेल. तर दुखापतग्रस्त दीपक चहरच्या जागी मुकेश चौधरी खेळण्याची अपेक्षा आहे.

तुम्हाला माहिती आहे का:

चेन्नई vs पंजाब Head to Head:

चेन्नई सुपर किंग्स व पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये आयपीएल मध्ये आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. या २९ सामन्यांपैकी पंधरा सामन्यात चेन्नईचा संघ तर उर्वरित चौदा सामन्यात पंजाब संघ विजय ठरला आहे.

या दोन संघांमध्ये एक मे रोजी चेन्नईच्या एम ए चिदंबरम येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ७ गड्यांच्या मोबदल्यात १६२ धावा केल्या होत्या, याच्या प्रत्युत्तर आता पंजाब संघाने हे आव्हान केवळ १७.५ षटकात ३ गडी गमावून पूर्ण केले. ४ षटकांमध्ये केवळ १७ धावा देऊन दोन गडी बाद करणारा हरप्रीत ब्रार याला सामनावीर घोषित करण्यात आले होते.

अधिक वाचा : नवा सेट, कोट्यावधीचा खर्च, मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेला ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ केवळ दोन महिन्यातच बंद

या दोन्ही संघांमध्ये धर्मशाला येथील मैदानावर आत्तापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही सामन्यांपैकी प्रत्येकी एका सामन्यात दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे.

चेन्नई vs पंजाब Pitch Report:

धर्मशाळा येथील खेळपट्टी नेहमीच वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल राहिली आहे. इथे खेळलेल्या अनेक सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने उच्च धावसंख्या उभारली आहे. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला हे आव्हान पार करणे अशक्य ठरले आहे.

आयपीएल सामन्यांच्या आधी येथे ‘हायब्रीड पीच’ बसवण्यात आले आहे. अशाप्रकारे खेळपट्टी बसवण्याची भारतातली पहिलीच वेळ आहे. कन्सिस्टंट बाऊन्स व संपूर्ण सामन्यामध्ये तीच स्थिती ठेवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.

देशातील इतर ठिकाणांप्रमाणेच येथील हवामान आरामदायक राहील. पावसाची शक्‍यता आहे परंतु त्यामुळे खेळात जास्त वेळ व्यत्यय येईल असे नाही.

चेन्नई vs पंजाब सामना कधी होणार:

रविवार, ५ मे २०२३ रोजी दुपारी 3:३० वाजता 

चेन्नई vs पंजाब सामना कुठे होणार:

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला

चेन्नई vs पंजाब सामना थेट प्रक्षेपण:

CSK VS PBKS या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.

चेन्नई vs पंजाब संभाव्य संघ:

CSK: ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथीराना, मुस्तफिजुर रहमान.

Impact Sub: शार्दुल ठाकूर/समीर रिझवी

PBKS: प्रभसिमरन सिंग/शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम करन, जितेश शर्मा, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

Impact Sub: राहुल चहर 

चेन्नई vs पंजाब Fantasy Team

ऋतुराज गायकवाड (c), एमएस धोनी (wk), मोईन अली, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना, सॅम करन (vc), लियाम लिव्हिंगस्टोन, कागिसो रबाडा, राहुल चहर, हर्षल पटेल.

Exit mobile version