दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टायटन्स (GT) गुरुवारी आयपीएल च्या ४०व्या सामन्यात एकमेकांसमोर भिडणार आहेत. हा सामना २४ एप्रिल रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानावर संध्याकाळी ७:३० वाजता होणार आहे.(dc vs gt)
ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने या मोसमात त्यांनी खेळलेल्या आठपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. आणि आयपीएल च्या गुणतालिकेत ते सध्या आठव्या स्थानावर आहेत. मात्र, गेल्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
गुजरात टायटन्स संघाने त्यांनी खेळलेल्या त्यांच्या आठपैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. आणि ते गुणतालिकेत सध्या सहाव्या स्थानावर आहेत. गुजरात संघाने त्यांच्या ५ सामन्यांपैकी २ च सामन्यात विजय मिळवला आहे.
अश्याच ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे CLICK करा.
विरोधी संघाला ८९ धावांवर बाद करण्यापासून ते २६६ धावा स्वीकारण्यापर्यंत, हे दोन्ही दिल्ली च्या संघाने या मोसमात अनुभवले आहे. जरी शेवटच्या सामन्यात त्यांना हैदराबाद संघाकडून गोलंदाजीत मोठ्या प्रमाणात मार पडला असला तरी आजचा सामना त्यांचा गुजरात टायटन्स या संघाविरुद्ध आहे हा तोच संघ आहे ज्यांच्या विरोधात खेळला गेलेल्या शेवटच्या सामन्यात दिल्लीच्या संघाने चांगले प्रदर्शन केले होते.(dc vs gt)
दिल्लीच्या संघासाठी एक सकारात्मक बाब म्हणजे जे फ्रेझर मॅक गर्गचे आगमन ज्याने त्याच्या शेवटचा तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये अभ्यासात के झळकावली आहेत तसेच त्याने शेवटच्या सामन्यांमध्ये दिल्ली संघासाठी सर्वात वेगवान अर्धशतक तर एकूण तिसऱ्याच जलद अर्धशतक केले होते.
दिल्ली च्या फिरकी गोलंदाजांनी तरी चांगले प्रदर्शन केले असले तरी त्यांना त्यांच्या वेगवान गोलंदाजाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.(dc vs gt)
नंबर दुसऱ्या बाजूला असायला गुजरात टायटन्स ला त्यांच्या गतवर्षाच्या कामगिरी सारखी कामगिरी अजून करता आली नाही त्यामुळे त्यांना अव्वल पाच संघांमध्ये स्थान मिळवता आले नाही वरच्या फळीतील मागील व साई सुदर्शन तसेच मधल्या फळीतील राहुल तेवतिया व राशिद खान यांनी केलेले योगदानामुळे गुजरात संघाला फलंदाजीत समतोल राखता आलेला आहे.
गुजरात संघातील मधल्या पळीतील फलंदाज क्रमांक चार पाच आणि सहा या तिघांनी मिळून ३३४ धावा केल्या आहेत ज्या इतर सर्व संघांपेक्षा कमी आहेत. सर्वात कमी धावगती हे सुद्धा गुजरात संघाचीच आहे तसेच त्यांनी सर्वात कमी षटकार सुद्धा मारले आहेत व त्यांना अद्याप २०० धावांचा टप्पा पार करायचा आहे. (dc vs gt)
गुजरात संघासाठी सकारात्मक बाब म्हणजे गुजरात संघाने या हंगामात पावर प्ले मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतले आहेत तसेच त्यांच्या फिरकीपटूंना सर्वाधिक यश मिळाले आहे.
तुम्हाला माहिती आहे का:
- आयपीएल २०२३ पासून, दिल्ली कॅपिटल्स संघाने पॉवरप्लेमध्ये ४३ विकेट गमावल्या आहेत, जे कोणत्याही संघासाठी सर्वात जास्त आहे. पंजाब किंग्ज ४२ विकेट सह दुसऱ्या स्थानावर आहेत.
- या आयपीएल हंगामात पॉवरप्लेमध्ये गुजरात टायटन्सचा रनरेट सर्वात कमी आहे (७.६२). रिद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांच्या जोडीने या हंगामात गुजरात संघासाठी फारसे चांगले काम केले नाही. त्यांनी सहा सामन्यात सलामी केली आहे आणि त्यांची सर्वोच्च भागीदारी ३६ आहे. (dc vs gt)
- दिल्ली कॅपिटल्सच्या वेगवान गोलंदाजांचा एकत्रित इकॉनमी रेट १०.७५ आहे, जो या आयपीएलमधील सर्व संघांमध्ये सर्वाधिक आहे.
DC VS GT HEAD TO HEAD:
आयपीएलमध्ये दिल्ली आणि गुजरात ४ सामन्यात एकमेकाविरुद्ध खेळले असून, या ४ सामन्यांपैकी दिल्लीने २ तर गुजरात संघाने २ वेळा विजय मिळवला आहे.दिल्ली संघाचे दोनही विजय अहमदाबादमध्ये तर पुणे आणि दिल्लीत खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.गुजरात संघाविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सची सर्वोच्च धावसंख्या १६२ आहे तर गुजरात ची दिल्ली संघाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या १७१ आहे.(dc vs gt)
या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात दिल्ली संघाने गुजरात टायटन्स संघाचा दारुण पराभव केला होता. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजानी गुजरात टायटन्सला ८९ धावांत गुंडाळल्यानंतर हे ९० धावांचे आव्हान केवळ ४ गड्यांच्या मोबदल्यात ८.५ षटकातच पूर्ण केले होते. या सामन्याचा सामनावीर ऋषभ पंत ला घोषित करण्यात आले होते.
DC VS GT Pitch Report:
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी थोडी संथ आहे जी फलंदाजांना आव्हान ठरत आहे, परंतु फील्डचा लहान आकार आणि फास्ट आउटफिल्ड याची भरपाई करतात,त्यामुळे मोठ्या धावा उभारल्या जाऊ शकतात.
DC VS GT सामना कधी होणार:
बुधवार २४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७:३० वाजता.
DC VS GT सामना कुठे होणार:
अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
DC VS GT सामना थेट प्रक्षेपण:
DC VS GT या सामन्याचे तुम्ही थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वर किंवा जिओ सिनेमा या ॲपवर पाहू शकता.
संभाव्य संघ:
DC: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.
GT: वृद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, आर साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा.